Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sambhajinagar News : जिल्ह्यातील ४ हजार ३३ शाळांचे मूल्यांकन; ८ शाळांना राज्यस्तरीय स्पर्धेची संधी

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ४ हजार ३३ शाळांनी ‘स्वच्छ आणि हरित विद्यालय रेटिंग’ उपक्रमांतर्गत मूल्यांकन नोंदविले आहे. यामधून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आठ शाळांची निवड केली जाणार असून, त्यात ग्रामीण भागातील सहा आणि शहरी भागातील दोन शाळांचा समावेश असेल.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 02, 2026 | 03:11 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • राज्यस्तरीय नामांकनासाठी केवळ चार आणि पाच स्टार 
  • आरोग्यविषयक सुविधा आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना प्राधान्य 
  • १ ते ७ नोव्हेंबरदरम्यान राज्यस्तरीय नामांकन 
Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर शाळांमध्ये स्वच्छता, सुरक्षित पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांची सुविधा आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘स्वच्छ आणि हरित विद्यालय रेटिंग’ उपक्रमांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आठ शाळांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ४ हजार ३३ शाळांनी या उपक्रमांतर्गत मूल्यांकन नोंदविले असून, सध्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून या शाळांची ऑनलाइन व ऑफलाइन पडताळणी सुरू आहे. यामध्ये ग्रामीण भागातील सहा आणि शहरी भागातील दोन शाळांची निवड केली जाणार आहे. राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने स्वच्छ एवं हरित विद्यालय रेटिंग उपक्रमाच्या जिल्हास्तरीय मूल्यांकन आणि मानांकनासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील शाळांचे मूल्यांकन, प्रत्यक्ष तपासणी आणि पात्र शाळांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

 

या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्य अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. शाळांमधील सुरक्षित पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, हात धुण्याची व्यवस्था, मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन, घन व ओला कचरा व्यवस्थापन, शाळेची देखभाल, विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती, हरित उपक्रम आणि दिव्यांगांसाठी अनुकूल सुविधा या निकषांच्या आधारे तपासणी केली जात आहे.

राज्यस्तरीय नामांकनासाठी केवळ चार आणि पाच स्टार

ऑनलाइन नोंदविलेली माहिती आणि प्रत्यक्ष शाळेतील सुविधांची पडताळणी करून गुणांकन निश्चित केले जाणार आहे. मूल्यांकन अहवाल, उपलब्ध सुविधा, छायाचित्रे, संबंधित पुरावे आणि शाळांचे अभिलेख तपासल्यानंतर पात्र शाळांची निवड केली जाईल. जिल्हास्तरावर किमान तीन स्टार मानांकन आणि संबंधित गटात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या शाळांचा विचार केला जाणार आहे. मात्र, राज्यस्तरीय नामांकनासाठी केवळ चार आणि पाच स्टार मानांकन प्राप्त शाळाच पात्र ठरणार आहेत.

Buldhana: २४०० हेक्टरवर चारा लागवडीचे नियोजन, ८ प्रकल्पांवर चारा लागवड; पशुसंवर्धन विभागचा पुढाकार

आरोग्यविषयक सुविधा आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना प्राधान्य

“स्वच्छ एवं हरित विद्यालय रेटिंग मूल्यांकन आणि पडताळणी पारदर्शक पद्धतीने केली जात आहे. शाळांमधील स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्यविषयक सुविधा आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना प्राधान्य दिले जात आहे. गुणवत्तापूर्ण सुविधा असलेल्या पात्र शाळांची निकषांनुसार निवड करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नामांकन पाठविण्यात येईल, या उपक्रमातून जिल्ह्यातील शाळांचा दर्जा उंचावण्यास मदत होईल. असे शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग अश्विनी लाठकर यांनी सांगितले.

१ ते ७ नोव्हेंबरदरम्यान राज्यस्तरीय नामांकन

जिल्हास्तरीय मूल्यांकन, पडताळणी आणि मानांकनाची प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर निवडलेल्या आठ शाळांचे राज्यस्तरीय नामांकन १ ते ७ नोव्हेंबरदरम्यान ऑनलाइन पोर्टलवर सादर केले जाणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.

Washim: ‘श्री बालाजी’च्या १५ आजी-माजी संचालकांना नोटीस; ५ नोव्हेंबर रोजी होणार सुनावणी, साखर कारखान्यातील गैरकारभार प्रकरण

 

Web Title: Chhatrapati sambhajinagar clean green school rating 2026 sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation
  • Chhatrapati Sambhajinagar Politics
  • sambhaji nagar news

संबंधित बातम्या

Sambhajinagar News : अतिक्रमण कारवाईला न्यायालयाचा हिरवा कंदील; रोशन गेट प्रकरणात ५० लाखांच्या नुकसानभरपाईच्या याचिकेला धक्का
1

Sambhajinagar News : अतिक्रमण कारवाईला न्यायालयाचा हिरवा कंदील; रोशन गेट प्रकरणात ५० लाखांच्या नुकसानभरपाईच्या याचिकेला धक्का

Groundwater Recharge Project : सेलू पंचायत समितीचा जलसंवर्धनाचा आदर्श उपक्रम! चार रिचार्ज पिटमधून १६ लाख लिटर पाण्याचे पुनर्भरण
2

Groundwater Recharge Project : सेलू पंचायत समितीचा जलसंवर्धनाचा आदर्श उपक्रम! चार रिचार्ज पिटमधून १६ लाख लिटर पाण्याचे पुनर्भरण

Sambhajinagar News : रात्री १२ वाजेपर्यंत फाईल स्वीकारण्याची प्रक्रिया तिजोरीत १०८ कोटींचा महसूल, गुंठेवारीसाठी नागरिकांची झुंबड
3

Sambhajinagar News : रात्री १२ वाजेपर्यंत फाईल स्वीकारण्याची प्रक्रिया तिजोरीत १०८ कोटींचा महसूल, गुंठेवारीसाठी नागरिकांची झुंबड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.