Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sambhajinagar Crime News : पेढ्यातून गुंगीकारक पदार्थ दिला अन् अत्याचार; खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगरातील कर्णपुरा परिसरात ५० लाखांची लॉटरी लागल्याचे सांगून पेढ्यातून गुंगीकारक पदार्थ दिल्याचा आणि ३२ वर्षीय विवाहितेवर अत्याचार, आरोपीने खासगी फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची तसेच पती आणि दोन मुलांना जीवे मारण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याचा आरोप.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 16, 2026 | 04:00 PM
Woman Allegedly Raped After Being Drugged With Sweets Over Lottery Claim ( auto_awesome Did you mean: Woman Allegedly Raped After Being Drugged With Sweets For Lottery Claim 73 लॉटरी लागल्याचे सांगून मिठाईतून गुंगीचे औषध दिल्यानंतर महिलेवर कथित बलात्कार auto_awesome Did you mean: Woman Allegedly Raped After Being Drugged With Sweets For Lottery Claim 73 लॉटरी लागल्याचे सांगून मिठाईतून गुंगीचे औषध दिल्यानंतर महिलेवर कथित बलात्कार )

Woman Allegedly Raped After Being Drugged With Sweets Over Lottery Claim ( auto_awesome Did you mean: Woman Allegedly Raped After Being Drugged With Sweets For Lottery Claim 73 लॉटरी लागल्याचे सांगून मिठाईतून गुंगीचे औषध दिल्यानंतर महिलेवर कथित बलात्कार auto_awesome Did you mean: Woman Allegedly Raped After Being Drugged With Sweets For Lottery Claim 73 लॉटरी लागल्याचे सांगून मिठाईतून गुंगीचे औषध दिल्यानंतर महिलेवर कथित बलात्कार )

Follow Us
Follow Us:
  • पाच ते सात मिनिटांत पीडिता बेशुद्ध झाली  
  • टीव्ही फोडला, अॅक्टिव्हाही घेऊन गेला 
  • अखेर गुन्हा दाखल
Sambhajinagar Crime News :  छत्रपती संभाजीनगरात मध्ये धकादायक बातमी समोर येतेय. ५० लाख रुपयांची लॉटरी लागल्याच्या आनंदात पेढा खाऊ घालण्याचा बहाणा करून त्यातून गुंगीकारक पदार्थ देत ३२ वर्षीय विवाहितेवर चलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर पती व दोन मुलांना जीवे मारण्याची तसेच खासगी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेवर वारंवार अत्याचार करण्यात आला.

ही घटना २४ ऑगस्ट ते २५ ऑक्टोबर दरम्यान कर्णपुरा परिसरात घडली. मयूर दिलीपचंद कासलीवाल (३५, रा. एन-२, सिडको) असे पीडितेवर अत्याचार करणाऱ्याचे नाव असून त्याच्याविरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकरणात ३२ वर्षीय पीडित विवाहीतेने फिर्याद दिली. त्यानुसार, पीडिता या पती व दोन मुलांसह राहते. दोन ते तीन वर्षापूर्वी मुलांचे आधारकार्ड काढण्यासाठी ती एन-२ सिडको येथील प्रो मयूर मल्टी सर्व्हिसेस येथे गेली होती, त्यावेळी आधारकार्ड काढून देणाऱ्या मयूर कासलीवाल याच्याशी तिची ओळख झाली. त्यानंतर तो अधूनमधून फोन करून संपर्कात होता. २४ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास पीडिता घरी एकटी असताना मयूर दुचाकीवर (एमएच २० बीएफ २७०५) तेथे पोहोचला.

पाच ते सात मिनिटांत पीडिता बेशुद्ध झाली

तुझ्या पायगुणामुळे मला ५० लाख रुपयांची लॉटरी लागली, असे सांगत त्याने आनंदाच्या निमित्ताने पेढा खाऊ घातला. पेढा खाल्ल्यानंतर अवघ्या पाच ते सात मिनिटांत पीडिता बेशुद्ध झाली. काही वेळाने शुद्धीवर आल्यानंतर ती घरातील पलंगावर विवस्त्र अवस्थेत होती, तर आरोपीही तिच्या शेजारी विवस्त्र अवस्थेत असल्याचे तिच्या लक्षात आले. गुंगीकारक पदार्थ देऊन आपल्यावर अत्याचार झाल्याचे तिला समजले.

घटनेनंतर पीडितेने पोलिसांत तक्रार करण्याचे सांगितले असता आरोपीने पती व मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच, त्याच्यासोबतचे फोटो व व्हिडिओ पतीला दाखविण्याची आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या पीडितेने पोलिसात तक्रार दिली नाही. याचा फायदा घेत आरोपीने पीडितेचा पती घरी नसताना मुलांना जीवे मारण्याची व फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार पीडितेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचे फिर्यादीत नमुद आहे.

Nanded Farmer Suicide : नांदेडमध्ये शेतकरी शंकर क्षीरसागर यांची दुर्दैवी आत्महत्या,दसऱ्याआधी घडली घटना

टीव्ही फोडला, अॅक्टिव्हाही घेऊन गेला

२५ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आरोपी पुन्हा पीडितेच्या घरी आला. यावेळी तिने त्याला यापुढे घरी येऊ नकोस, पोलिसांत तक्रार करणार असल्याचे सुनावले. त्यावर संतप्त झालेल्या आरोपीने घरातील टीव्ही फोडला. जाताना पीडितेची मोपेड वापरण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगत तो दुचाकी घेऊन गेला. तक्रार केल्यास जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही त्याने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

अखेर गुन्हा दाखल

२५ ऑक्टोबर रोजी रात्री पती घरी आल्यानंतर त्यानी मयूर भेटल्याचे सांगितले, मयूरने पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा दावा केल्याचे त्यांनी सांगितल्यावर पीडितेने घडलेला संपूर्ण प्रकार पतीला सागितला, पतीने धीर दिल्यानंतर तिने छावणी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Amravati News: भाववाढीच्या प्रतीक्षेत कापूस घरातच! सोयाबीनची आवकही घटली; ४ दिवसांत दरात झाली घसरण

Web Title: Chhatrapati sambhajinagar woman sexual assault lottery sweet blackmail crime sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • chhatrapati sambhaji nagar Crime. Harrassment
  • sambhaji nagar news
  • Sexual Assault Case

संबंधित बातम्या

Sambhajinagar News : पावसाच्या खंडाचा खरिपाला मोठा फटका; संभाजीनगर जिल्ह्याची पैसेवारी ४५.७२ पैशांवर
1

Sambhajinagar News : पावसाच्या खंडाचा खरिपाला मोठा फटका; संभाजीनगर जिल्ह्याची पैसेवारी ४५.७२ पैशांवर

POCSO Campaign 2026 : बाल लैंगिक शोषण करणाऱ्यांना थेट इशारा ! मुंबई मेट्रोच्या डब्यांमध्ये झळकले पॉक्सो जनजागृतीचे पोस्टर्स
2

POCSO Campaign 2026 : बाल लैंगिक शोषण करणाऱ्यांना थेट इशारा ! मुंबई मेट्रोच्या डब्यांमध्ये झळकले पॉक्सो जनजागृतीचे पोस्टर्स

 Doctor Assault News: “उपचारात निष्काळजीपणाचा आरोप करत रुग्णालयाची तोडफोड!” डॉक्टर अन् सुरक्षा रक्षक रक्तबंबाळ
3

 Doctor Assault News: “उपचारात निष्काळजीपणाचा आरोप करत रुग्णालयाची तोडफोड!” डॉक्टर अन् सुरक्षा रक्षक रक्तबंबाळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.