Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sambhajinagar News : पावसाच्या खंडाचा खरिपाला मोठा फटका; संभाजीनगर जिल्ह्याची पैसेवारी ४५.७२ पैशांवर

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जूनपासून पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या सुधारित पैसेवारीनुसार, जिल्ह्यातील १,३५४ गावांची सरासरी पैसेवारी ४५.७२ पैसे नोंदवली गेली.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 15, 2026 | 02:28 PM
Drought confirmed in Sambhajinagar district ( संभाजीनगर जिल्ह्यात दुष्काळावर शिक्कामोर्तब ) फोटो सौजन्य AI

Drought confirmed in Sambhajinagar district ( संभाजीनगर जिल्ह्यात दुष्काळावर शिक्कामोर्तब ) फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • २२६ गावांपैकी ४ गावे जायकवाडी प्रकल्पात संपादित  
  • नजरअंदाज पैसेवारी 
  • २७ गावांची पैसेवारी नाही 
Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरात जूनपासून पावसाने ओढ दिल्याने आणि पिकांच्या वाढीच्या अवस्थेतच पावसाने मोठा खंड दिल्याने जिल्ह्यातील खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. याची नोंद घेत, जिल्ला प्रशासनाने खरीप हंगामाची सुधारित पैसेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील सर्व १,३५४ गावांची सरासरी पैसेवारी ४५.७२ पैसे निघाली असून, यामुळे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाले आहे. सुरुवातीची नजर पैसेवारी ५० पेक्षा जास्त होती. आता अधिकृत पैसेवारीमुळे सरकारी सवलती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनाने यापूर्वीच पर्जन्यतूट आणि इतर घटकांचा विचार करून जिल्ह्यात प्रथम टप्प्यातील दुष्काळ जाहीर बेला होता.

आता महसूल विभागाने केलेल्या पैसेवारीच्या मोजणीतूनही उत्पन्नात मोठी घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात खरिपाचे पेरणी क्षेत्र ७ लाख ९९ हजार ५९४ हेक्टर आहे. त्यापैकी यंदा ७ लाख ५४ हजार ९५२ हेक्टरवर पेरणी झाली होती. मात्र, जून महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने पेरण्या लांबल्या. त्यानंतर सर्वदूर पाऊस झालाच नाही. २७ गावांत पैसेवारीची मोजणी केली नाहीछत्रपती संभाजीनगर तालुक्यातील १९ आणि पैठण तालुक्यातील ४ गावे महापालिका व पालिका हद्दीत समाविष्ट असल्याने त्यांची पैसेवारी जाहीर करण्यात आलेली नाही.

२२६ गावांपैकी ४ गावे जायकवाडी प्रकल्पात संपादित

गंगापूर तालुक्यातील एकूण २२६ गावांपैकी ४ गावे जायकवाडी प्रकल्पात संपादित झाल्याने, तेथील उर्वरित २२२ गावांचीच पैसेवारी जाहीर करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तालुकानिहाय स्थितीजिल्ह्यात खरिपासाठी १,३५४ गावांत पैसेवारी मोजली. सर्व गावांची सरासरी पैसेवारी ४५.७२ पैसे निघाली आहे. वैजापूर, खुलताबाद आणि कन्नड या तीन तालुक्यांमध्ये सर्वांत कमी ४४.०० पैसेवारी नोंदवली गेली आहे. गंगापूर तालुक्यात सर्वाधिक ४८.७ पैसेवारी नोंदवली आहे. खरीप, रब्बी हगांमांत पैसेवारी मोजण्याची प्रत्यक्ष पद्धतपीक कापणी प्रयोगः सरपंच, शेतकरी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांच्या समक्ष निवडलेल्या प्लॉटमधील पिकाची कापणी व मळणी करून ओल्या धान्याचे वजन केले जाते. हे धान्य उन्हात वाळवून त्याचे वजन मोजले जाते, यावरून पिकाचे हेक्टरी सरासरी उत्पन्न काढतात.

कुकडीच्या हक्काच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक; ‘डिंबे-माणिकडोह’ बोगद्यासाठी 23 नोव्हेंबरपासून तीव्र आंदोलनाचा इशारा

नजरअंदाज पैसेवारी

हंगामाच्या मध्यावर पिके शेतात उभी असताना तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक शिवारात जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी करतात. पावसाचे प्रमाण, पिकांची वाढ आणि कीड-रोगांचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन ‘नजरअंदाज पैसेवारी’ निश्चित केली जाते.

२७ गावांची पैसेवारी नाही

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील १९ आणि पैठण तालुक्यातील ४ गावे महापालिका व पालिका हद्दीत समाविष्ट असल्याने त्यांची पैसेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. गंगापूर तालुक्यातील एकूण २२६ गावांपैकी ४ गावे जायकवाडी प्रकल्पात संपादित झाल्याने, तेथील उर्वरित २२२ गावांचीच पैसेवारी जाहीर करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

Amravati News: आमगावात विदेशी पाहुण्या पक्ष्यांचे आगमन! ५० प्रजातींचे पक्षी; स्थलांतरित पक्ष्यांचा चार महिने मुक्काम

Web Title: Chhatrapati sambhajinagar kharif paisewari 45 72 drought 2026 sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 02:28 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • Jayakwadi Dam
  • Revenue Department
  • sambhaji nagar news

संबंधित बातम्या

Sambhajinagar News : अनाथ मुले अन् वृद्धांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद; ३८४ जणांसोबत साजरी केली दिवाळी
1

Sambhajinagar News : अनाथ मुले अन् वृद्धांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद; ३८४ जणांसोबत साजरी केली दिवाळी

Pune Revenue Dept Action: पुण्यातील बांधकाम क्षेत्रात मोठी खळबळ! महंमदवाडीतील नामांकित गृहप्रकल्पांवर महसूल विभागाचा बडगा
2

Pune Revenue Dept Action: पुण्यातील बांधकाम क्षेत्रात मोठी खळबळ! महंमदवाडीतील नामांकित गृहप्रकल्पांवर महसूल विभागाचा बडगा

 Doctor Assault News: “उपचारात निष्काळजीपणाचा आरोप करत रुग्णालयाची तोडफोड!” डॉक्टर अन् सुरक्षा रक्षक रक्तबंबाळ
3

 Doctor Assault News: “उपचारात निष्काळजीपणाचा आरोप करत रुग्णालयाची तोडफोड!” डॉक्टर अन् सुरक्षा रक्षक रक्तबंबाळ

Diwali Fire Incidents: “आनंदाचा सण ठरला जीवघेणा!” शहरात फटाक्यांच्या आतषबाजीत ५५ हून अधिक जण जखमी; ३० ठिकाणी आगीचा तांडव!
4

Diwali Fire Incidents: “आनंदाचा सण ठरला जीवघेणा!” शहरात फटाक्यांच्या आतषबाजीत ५५ हून अधिक जण जखमी; ३० ठिकाणी आगीचा तांडव!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.