Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पातून ५ महत्त्वाच्या रस्त्यांचा विकास; १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर

Chhatrapati Sambhajinagar Smart City: पाच प्रमुख रस्त्यांच्या सुधारणेसाठी १५ कोटी मंजूर. तसेच, नागरिकांसाठी 'क्लीन स्ट्रीट' मोबाइल ॲप आणि स्मार्ट पार्किंग सिस्टीम ला मंजुरी मिळाली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 05, 2025 | 03:38 PM
छत्रपती संभाजीनगरमधील ५ प्रमुख रस्त्यांसाठी १५ कोटी, 'क्लीन स्ट्रीट ॲप'ला मंजुरी Photo Credit - Ai

छत्रपती संभाजीनगरमधील ५ प्रमुख रस्त्यांसाठी १५ कोटी, 'क्लीन स्ट्रीट ॲप'ला मंजुरी Photo Credit - Ai

Follow Us
Close
Follow Us:
  • वाहतूक कोंडी, स्वच्छतेवर ‘स्मार्ट’ उपाय!
  • छत्रपती संभाजीनगरमधील ५ प्रमुख रस्त्यांसाठी १५ कोटी,
  • ‘क्लीन स्ट्रीट ॲप’ला मंजुरी
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): शहराला आधुनिक पायाभूत सुविधा (Infrastructure) आणि डिजिटल तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी ‘औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’च्या संचालक मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. संभाजीनगर शहरातील वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यांची क्षमता वाढवण्याची गरज आणि स्वच्छतेच्या प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या निर्णयांना या बैठकीत मंजुरी देण्यात आली, ज्यामुळे स्मार्ट सिटी प्रकल्प आता नव्या टप्प्यात प्रवेश करत असल्याचे संकेत मिळाले आहेत.

अधिकाराऱ्यांची उपस्थित

बैठकीला अध्यक्षा विनीता सिंघल, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, मनपा आयुक्त व स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, स्वतंत्र संचालक भास्कर मुंडे व उल्हास गवळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जोगदंड, मुख्य वित्तीय अधिकारी उत्तम चव्हाण यांसह इतर अधिकारी उपस्थित होते.

हे देखील वाचा: रेल्वे प्रवाशांवर चोरट्यांचा ‘डल्ला’! नांदेड स्टेशन गुन्हेगारीत अव्वल, भुसावळ दुसऱ्या तर छत्रपती संभाजीनगर तिसऱ्या स्थानी

‘क्लीन स्ट्रीट ॲप’ला मंजुरी

स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या ‘क्लीन स्ट्रीट’ (Clean Street) मोबाइल ॲपला संचालक मंडळाने औपचारिक मंजुरी दिली आहे.

  • ॲपचा उपयोग: या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना परिसरातील अस्वच्छतेचे फोटो अपलोड करून तक्रार थेट नोंदवता येणार आहे. यामुळे संबंधित विभागाला त्वरित कारवाई करण्याची सूचना मिळेल.
  • वाहतूक नियंत्रण: वाहतूक आणि पार्किंगच्या सतत वाढणाऱ्या समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी इंटिग्रेटेड स्मार्ट पार्किंग मॅनेजमेंट सिस्टीम (Integrated Smart Parking Management System) ला देखील मंजुरी देण्यात आली.

५ प्रमुख रस्त्यांच्या सुधारणेसाठी १५ कोटी

शहरातील वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रमुख मार्गाची क्षमता वाढविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर संचालक मंडळाने पाच महत्त्वाच्या रस्त्यांच्या व्यापक सुधारणा योजनेसाठी तत्त्वतः मान्यता दिली. या कामांसाठी स्मार्ट सिटी निधीतून अंदाजे १५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. महानुभाव आश्रम ते नक्षत्रावाडी (पैठण रोड), सिडको बसस्टँड ते हसूल टी-पॉइंट (जळगाव रोड) यांसह अन्य गर्दीच्या मार्गाचा यात समावेश आहे. संबंधित रस्त्यांसाठी विस्तृत प्रकल्प अहवाल (DPR) तयार करून कामांना लवकर गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर

संचालक मंडळाच्या या बैठकीत घेतलेल्या निर्णयामुळे शहरातील वाहतूक, स्वच्छता आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रात सकारात्मक बदल दिसून येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर करून नागरिकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने स्मार्ट सिटी प्रशासनाने महत्त्वाची पाऊले उचलल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

हे देखील वाचा: पुण्यात बनावट गुटख्याच्या कारखान्यावर पोलिसांचा छापा; एक कोटींचा मुद्देमाल जप्त

Web Title: Development of 5 important roads through smart city project fund of rs 15 crore approved

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 03:36 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Smart City

संबंधित बातम्या

रेल्वे प्रवाशांवर चोरट्यांचा ‘डल्ला’! नांदेड स्टेशन गुन्हेगारीत अव्वल, भुसावळ दुसऱ्या तर छत्रपती संभाजीनगर तिसऱ्या स्थानी
1

रेल्वे प्रवाशांवर चोरट्यांचा ‘डल्ला’! नांदेड स्टेशन गुन्हेगारीत अव्वल, भुसावळ दुसऱ्या तर छत्रपती संभाजीनगर तिसऱ्या स्थानी

Chhatrapati Sambhajinagar: गुन्हा दाखल होऊनही गौण खनिजावर माफियांचा डल्ला! डोंगर पोखरण्याचे काम सुरूच, प्रशासन कुठे?
2

Chhatrapati Sambhajinagar: गुन्हा दाखल होऊनही गौण खनिजावर माफियांचा डल्ला! डोंगर पोखरण्याचे काम सुरूच, प्रशासन कुठे?

घराचे स्वप्न पूर्ण होणार! ‘या’ तारखेला तब्बल ११,१२० घरांसाठी जाहिरात; म्हाडा लॉटरीप्रमाणे निवड
3

घराचे स्वप्न पूर्ण होणार! ‘या’ तारखेला तब्बल ११,१२० घरांसाठी जाहिरात; म्हाडा लॉटरीप्रमाणे निवड

Chh.Sambhajinagar :  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पैठणमधील सभेवर सर्वसामान्यांचे मत काय ?
4

Chh.Sambhajinagar : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पैठणमधील सभेवर सर्वसामान्यांचे मत काय ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.