
'मी आणि समाज कधीच मागे सरकणार नाही'; मनोज जरांगे पाटलांचा निर्धार
छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांच्याकडून वेळोवेळी आंदोलन, उपोषण करण्यात येत आहे. त्यावरच आता मनोज जरांगे यांनी भाष्य केले आहे. मोडी लिपी वाचण्यासाठी आणि बनवण्यासाठी आम्ही सरकारकडे 63 नावं पाठवली आहेत. सरकारला नोंदी सापडत नव्हत्या. आम्ही दिलेल्या नावांना आता पूर्ण अधिकार देण्यात यावेत. तसेच मी आणि समाज कधीच मागे सरकणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘ज्यांची मोडी वाचक म्हणून निवड झाली आहे, त्यांनी समाजासाठी काम करावं. जे काम करत नाहीत, त्यांची नियुक्ती सरकारने रद्द केली तरी चालेल. हैदराबाद गॅझेटचा सुधारित जीआर काढण्यात यावा. मराठवाडा पूर्वी आरक्षणात होता. सर्व केसेस मागे घ्याव्यात, त्याची प्रक्रिया सुरू करावी. कोल्हापूर, सातारा, औंधचा जीआर काढून त्याची प्रक्रिया पूर्ण करा. त्याबद्दल माहिती नाही. त्याबद्दल माहिती घेतो.
ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलनाला तुमचा पाठिंबा आहे का? यावर जरांगे म्हणाले, ‘आमचा इकडेच फेस पडला. शेतकऱ्याचं काय, ते सांगा. तुम्ही बांधावर येताय आणि लवकर रडत आहेत, त्यांचं काय? काय बघितलं तुम्हाला? एक लाख रुपये हेक्टरी, पाणी प्यायला नाही, पीक होरपळले आहेत. यांच्या स्लॅबवर स्विमिंग पूल आहेत, शेतकरी फासावर लटकला, कुटुंब उघड्यावर पडलं. प्रत्येक शेतकरी आंदोलन हातात घेणार आहे. ज्यांचं जगणं आयुष्यभर आरामात आहे, त्यांचं जगणं मुश्किल होईल’, असा इशारा दिला.
मी आराम करणार नाही
आराम करणार नाही. शेतकऱ्याच्या बांधावर जायचं आहे. दसऱ्यासाठी नारायण गडावर सगळेजण दर्शनाला या. सगळेजण दसऱ्याच्या दिवशी गडावर दर्शनासाठी या. मराठवाडा, खानदेश, विदर्भ, पुणे, पश्चिम महाराष्ट्र सगळे बांधून या. दसरा मेळावा छोटाच होणार आहे; मात्र आमंत्रण देणं ही आमची जबाबदारी आहे. दर्शनासाठी या, असे ते म्हणाले.