Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: स्मार्ट मीटरमुळे घरगुती ग्राहकांची ‘चांदी’! ७ महिन्यांत २ कोटींची सवलत; महावितरणचा मोठा खुलासा

स्मार्ट वीजमीटर बसवण्याबाबत काही लोकांमध्ये गैरसमज आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून स्मार्ट वीजमीटर बसविण्यास विरोध होत आहे. यावर महावितरणने स्मार्ट वीजमीटरचे फायदे सांगत गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 26, 2026 | 03:45 PM
स्मार्ट मीटरमुळे घरगुती ग्राहकांची 'चांदी'! (Photo Credit- X)

स्मार्ट मीटरमुळे घरगुती ग्राहकांची 'चांदी'! (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • स्मार्ट मीटरमुळे घरगुती ग्राहकांची ‘चांदी’!
  • ७ महिन्यांत २ कोटींची सवलत
  • महावितरणचा मोठा खुलासा
Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर स्मार्ट मीटर बसवलेल्या परिमंडलातील २ लाख २० हजार ६६५ घरगुती ग्राहकांना दिवसा वीजवापरावर त महिन्यांत जवळपास दोन कोटींची सवलत वीजबिलात मिळाली असल्याची माहिती महावितरणने दिली आहे. स्मार्ट वीजमीटर बसवण्याबाबत काही लोकांमध्ये गैरसमज आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून स्मार्ट वीजमीटर बसविण्यास विरोध होत आहे. यावर महावितरणने स्मार्ट वीजमीटरचे फायदे सांगत गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी ग्राहकांनी महावितरण आणि संबंधित एजन्सीला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केले आहे.

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी निश्चित केलेल्या वीजदरामध्ये घरगुती ग्राहकांना दिवसाच्या वीज वापरामध्ये प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपया सवलत जाहीर केली आहे. त्यानुसार घरगुती ग्राहकांना टीओडीप्रमाणे वीजदरात सवलत मिळण्याचा प्रत्यक्ष फायदा १ आहे. जुलैपासून सुरू झाला महावितरणकडून हे स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहेत. या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर परिमंडलात दोन लाख २० हजार ६६५ घरगुती ग्राहकांना जुलै २०२५ ते जानेवारी २०२६ या सात महिन्यांच्या वीजबिलात १ कोटी ९८ लाख ९२ हजार ७३४ रुपयांची टीओडी सवलत मिळाली आहे.

छत्रपती संभाजीनगर शहर मंडलातील ५७ हजार १९० ग्राहकांना ७९ लाख ३४ हजार १३८ रुपये, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडलातील १ लाख ११ हजार ४९८ ग्राहकांना ७९ लाख ८७ हजार ८३१ रुपये तर जालना मंडलातील ५२ हजार १७ग्राहकांना ३९ लाख ७० हजार ७६५ रुपये सवलत मिळाली आहे. ग्राहकांना अचूक व वेळेत वीजबिल देण्यास उपयुक्त ठरणारे अत्याधुनिक टीओडी वीजमीटर प्री-पेड नसून, पोस्टपेड आहेत. पूर्वीप्रमाणेच वीजवापरानंतरच ग्राहकांना वीजबिले मिळणार आहेत. टाईम ऑफ डे प्रणालीनुसार बीज वापराच्या कालावधीनुसार दर आकारणी केली जाते.

Vaijapur News: वैजापुरात पाण्यावरून वादंग; ‘बोरदहेगाव’तून पाणी सोडण्यास विरोध केल्यानंतर स्थगितीचा निर्णय

औद्योगिकनंतर घरगुती ग्राहकांना प्रथमच स्वस्त वीज दरासाठी टीओडीप्रमाणे आकारणी सुरू झाली आहे. महावितरणकडून २०२५ ते २०३० या पाच वर्षांसाठी घरगुती ग्राहकांसाठी टाईम ऑफ डे (टीओडी) नुसार स्वस्त वीजदराचा प्रस्ताव आयोगाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार आयोगाने घरगुती ग्राहकांसाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वापरलेल्या विजेसाठी प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपया सवलत मंजूर केली आहे. यात १ जुलै २०२५ ते मार्च २०२६ मध्ये ८० पैसे, २०२६-२७ मध्ये ८५ पैसे, २०२७-२८ व २०२८-२९ मध्ये ९० पैसे तर २०२९-३० मध्ये १ रुपये प्रतियुनिट सवलत मिळणार आहे. टीओडी मीटर घरगुती ग्राहकांकडे बसविणे आवश्यक असल्याचे महावितरणने म्हटले आहे.

कुठलाही आर्थिक भुर्दंड नाही

हे मीटर मोफत बसवण्यात येत असून, ग्राहकांना कुठलाही आर्थिक भुर्दंड बसणार नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. यात मानवी हस्तक्षेपाला अजिबात वाव नाही. टीओडी मीटर असल्याशिवाय घरगुती ग्राहकांना दिवसा वीजवापराची सवलत मिळू शकणार नाही. त्यामुळे ग्राहकांच्या दृष्टीने टीओडी मीटर आवश्यकच असल्याचे महावितरणने म्हटले आहे.

ऑटोमॅटिक रीडिंगमुळे अचूक बिले

नव्या तंत्रज्ञानाच्या मीटरचे रीडिंग ऑटोमेटिक होत असल्याने अचूक बिले मिळून घरातील विजेचा वापर दर तासाला संबंधित ग्राहकांना मोबाईलवर पाहता येत आहे. त्याद्वारे ग्राहकांचे वीजवापरावरही थेट नियंत्रण राहत आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीजग्राहक घरातील प्रामुख्याने वॉशिंग मशीन, ओव्हन, गिझर, एअर कंडिशनर व इतर उपकरणांचा मोठा वापर करतात. त्यात टीओडी मीटरमुळे ग्राहकांचा मोठा आर्थिक फायदा होत आहे.

संभाजीनगर जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया ७ दिवसांपासून ठप्प; गोरगरीब रुग्णांचे हाल, खासगी रुग्णालयांची लुटमार

Web Title: Smart meters bring silver to household customers discount of rs 2 crore in 7 months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

ऐतिहासिक सुवर्णक्षण! जेव्हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाथांच्या पैठणला आले होते; ७५ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा
1

ऐतिहासिक सुवर्णक्षण! जेव्हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाथांच्या पैठणला आले होते; ७५ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा

छत्रपती संभाजीनगरसाठी खुशखबर! १ मेपासून नव्या योजनेचे पाणी मिळणार; ‘या’ ५ जलकुंभांतून होणार पुरवठा
2

छत्रपती संभाजीनगरसाठी खुशखबर! १ मेपासून नव्या योजनेचे पाणी मिळणार; ‘या’ ५ जलकुंभांतून होणार पुरवठा

Chhatrapati Sambhajinagar: उन्हाळ्याच्या सुट्टीत शिक्षकांना शासकीय कामांचा विळखा! जनगणना आणि प्रशिक्षणावरून शिक्षक समिती आक्रमक
3

Chhatrapati Sambhajinagar: उन्हाळ्याच्या सुट्टीत शिक्षकांना शासकीय कामांचा विळखा! जनगणना आणि प्रशिक्षणावरून शिक्षक समिती आक्रमक

Chhatrapati Sambhajinagar: अग्निशमन दलाला हायटेक बूस्टर! पालकमंत्री संजय शिरसाट यांचा पुढाकार; १५.७८ कोटींची यंत्रणा दाखल
4

Chhatrapati Sambhajinagar: अग्निशमन दलाला हायटेक बूस्टर! पालकमंत्री संजय शिरसाट यांचा पुढाकार; १५.७८ कोटींची यंत्रणा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.