Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘…तर आगामी निवडणुकीत सुपडासाफ करू’; आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा

'मराठा समाजाची दशा आणि दिशा' यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, एकेकाळी पाच एकर शेती असलेला शेतकरी आज गळ्याला आला आहे. त्यामुळे पुढील पिढीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आतापासूनच नियोजन करणे गरजेचे आहे'.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 17, 2026 | 11:28 AM
'...तर आगामी निवडणुकीत सुपडासाफ करू'; मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा

'...तर आगामी निवडणुकीत सुपडासाफ करू'; मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा

Follow Us
Follow Us:
  • मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २०२९ च्या निवडणुकीबाबत इशारा दिला.
  • मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा ‘सुपडासाफ’ करण्याचा इशारा.
  • सिल्लोड तालुक्यातील चिंचपूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण.
छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करून समाजाला छळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा २०२९ च्या निवडणुकीत सुपडासाफ झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

सिल्लोड तालुक्यातील चिंचपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न, समाजाची सद्यःस्थिती, तरुणांचे भविष्य आणि राजकीय परिस्थितीवर परखड भाष्य केले. ‘मराठा समाजाची दशा आणि दिशा’ यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, एकेकाळी पाच एकर शेती असलेला शेतकरी आज गळ्याला आला आहे. त्यामुळे पुढील पिढीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आतापासूनच नियोजन करणे गरजेचे आहे’.

तसेच मराठा समाजातील तरुणांनी व्यसनांच्या आहारी न जाता पूर्णपणे व्यसनमुक्त राहावे. व्यसनांपासून दूर राहून शिक्षणाला प्राधान्य द्यावे, उच्च शिक्षण घेऊन अधिकारी व्हावे, तसेच चांगले उद्योग-व्यवसाय उभारावेत, असे आवाहन त्यांनी केले.

पाठीशी खंबीर उभे राहावे

समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण रात्रंदिवस लढा देत आहोत. या लढ्यात समाजाने खंबीरपणे आपल्या पाठिशी उभे राहावे, चांगले काम करणाऱ्यांना संपविले जात आहे. सत्य बोलणे आणि प्रामाणिक राहणे हाच आता गुन्हा ठरत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

500 कोटींच्या आरोपीची चौकशी करण्याची मागणी

सभेत बोलताना जरांगे पाटील यांनी ५०० कोटी रुपयांच्या कथित आरोपांचा उल्लेख केला. या प्रकरणाची चौकशी करा,’ असे आव्हान त्यांनी दिले. एका कथित चित्रफितीचा संदर्भ देत ते म्हणाले, ‘ही चित्रफीत आर्टिफिशियल इंटेलिजन्सने (AI) तयार केलेली नाही, तर ती खरी आहे. त्याची चौकशी करा आणि दोषींवर कारवाई करा; नाहीतर, या प्रकरणात तुमचा हात आहे हे समजेल. आणि तो कोणीही असो, त्याला सोडणार नाही,’ असा थेट इशारा त्यांनी दिला.

FAQ

1. मनोज जरांगे पाटील यांनी कोणता इशारा दिला?
मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा २०२९ च्या निवडणुकीत सुपडासाफ झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

2. मनोज जरांगे पाटील कुठे बोलत होते?
सिल्लोड तालुक्यातील चिंचपूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते.

3. जरांगे पाटील यांनी कोणत्या विषयांवर भाष्य केले?
मराठा आरक्षण, समाजाची सद्यःस्थिती, तरुणांचे भविष्य आणि राजकीय परिस्थितीवर त्यांनी भाष्य केले.

Web Title: Then we will wipe you out in upcoming elections says manoj jarange nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 11:28 AM

Topics:  

  • Maharashtra Political News
  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

Amit Shah in Pune: अजितदादांच्या अर्धपुतळ्याचे अमित शाह यांच्या हस्ते अनावरण | Navarashtra
1

Amit Shah in Pune: अजितदादांच्या अर्धपुतळ्याचे अमित शाह यांच्या हस्ते अनावरण | Navarashtra

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.