Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मधुकरराव पिचड यांच्या निधनाने आदिवासी समाजासाठी अहोरात्र झटणारा, कर्मसिद्धांताचा उपासक गमावला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड त्यांच्याप्रती शोकसंवेदना व्यक्त केली आहे. .भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आदिवासी मंत्री मधुकरराव पिचड यांचे आज वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले.

  • By नारायण परब
Updated On: Dec 06, 2024 | 10:05 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

ज्येष्ठ राजकारणी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या निधनाने आदिवासी समाजासाठी अहोरात्र झटणारा आणि कर्मसिद्धांताचा उपासक आपण गमावला आहे, अशी शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आदिवासी मंत्री मधुकरराव पिचड यांचे आज ब्रेनस्ट्रोकने वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले.

आपल्या शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणाले की,  मधुकरराव पिचड यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषदेपासून राजकारणाची सुरुवात करत प्रदीर्घ काळ त्यांनी राज्य विधिमंडळात प्रतिनिधीत्व केले. मंत्री,  विरोधी पक्षनेते, अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या. समाजात वावरताना अगणित लोकांचे आयुष्य त्यांच्यामुळे उजळले. जीव ओतून काम करताना त्यांनी कार्यकर्त्यांचे मोठे जाळे उभे केले. आदिवासींच्या प्रश्नांसाठी सातत्याने ते आग्रही असायचे. आर्थिक मागासांसाठी त्यांनी शिक्षणाच्या मोठ्या सुविधा उभारल्या. आदिवासींमध्ये उच्चशिक्षणाची पायाभरणी त्यांनी केली. अकोले तालुक्यात जलसिंचनासाठी त्यांनी केलेले काम मोठे होते. सहकाराच्या क्षेत्रातही त्यांनी छाप उमटवली. त्यांच्या निधनाने कर्मसिद्धांताचा उपासक आपण गमावला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकियांच्या दु:खात मी सहभागी आहे.

मुख्यमंत्र्यांसहित अनेक राजकीय क्षेत्रातील आणि इतर क्षेत्रातील लोकांनीही मधुकरराव पिचड यांना श्रध्दांजली अर्पित केली आहे.

मधुकरराव पिचड यांची राजकीय कारकीर्द

मधुकरराव पिचड यांनी पंचायत समिती ते जिल्हा परिषदेपासून राजकारणाची सुरुवात केली. ते अहिल्यानगरमधील अकोले मतदारसंघातून 1980 साली पहिल्यांदा विधानसभेवर आमदार झाले होते. त्यानंतर 2014 पर्यंत तब्बल 35 वर्षे त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 1991 साली ते आदिवासी विकास खात्याचे कॅबिनेट मंत्री झाले. त्यानंतर त्यांच्याकडे इतर खात्यांची जबाबदारी देण्यात आली होती. 1995 ते 1999 याकाळात ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते.  शरद पवार यांचे विश्वासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केली त्यावेळी मधुकरराव पिचड यांनी महाराष्ट्रामध्ये पक्षाच्या बांधणीकरिता अत्यंत महत्वाची भूमिका बजावली. केवळ आदिवासी समाजाचे नेते म्हणूनच नाही तर पक्षाचे प्रमुख नेते म्हणून त्यांनी पक्षामध्ये आपले स्थान निर्माण केले. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी कार्य केले. 1999 ते 2003 या दरम्यान ते आदिवासी विकास मंत्री होते तसेच 2013 ते 2014 या कालावधीतही त्यांनी या खात्याचे मंत्री म्हणून कार्य केले.

2019 मध्ये त्यांनी आणि त्यांचे पूत्र वैभव पिचड यांच्यासह भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. हा प्रवेश शरद पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला गेला. 2021 पासून  त्यांचे पुत्र वैभव पिचड हे भाजपमध्ये आदिवासी मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री म्हणून कार्यरत आहेत.

Web Title: Chief minister devendra fadnavis paid tributes to senior leader mudhakarrao pichad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2024 | 09:39 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • maharashtra

संबंधित बातम्या

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी
1

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित
2

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले
3

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
4

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.