Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indira Nagar SRA Project Scam: SRA यादीत मृत अन् अल्पवयीन व्यक्तींची नावे!; दुर्योधन कदम यांचे खळबळजनक आरोप

Indira Nagar SRA Project Scam : साईचंद्र एसआरए प्रकल्पाशी संबंधित विकासक विवेक पाटील, सतीश अगरवाल आणि झिशान सय्यद यांच्या कार्यपद्धतीवर कदम यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नागरिकांना धमकावून व दबाव टाकून घरे खाली करून घेतली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 13, 2026 | 05:40 PM
Chinchwad, PCMC News, SRA Scam, Crime News, Local News, Maharashtra News,

Chinchwad, PCMC News, SRA Scam, Crime News, Local News, Maharashtra News,

Follow Us
Follow Us:
  • चिंचवड इंदिरानगर SRA प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि अपात्र लाभार्थ्यांच्या समावेशाचा आरोप.
  • ३५-४० वर्षे जुन्या पात्र रहिवाशांची नावे वगळून मृत व अल्पवयीन व्यक्तींचा नियमबाह्य समावेश.
  • विकासक विवेक पाटील, सतीश अगरवाल व झिशान सय्यद यांच्यावर नागरिकांना धमकावल्याचा आरोप.
Indira Nagar SRA Project Scam: चिंचवड येथील इंदिरानगर झोपडपट्टी पुनर्वसन (SRA) प्रकल्पात मोठ्या प्रमाणात अनियमितता, गैरव्यवहार आणि पात्र झोपडीधारकांची दिशाभूल होत असल्याचा गंभीर आरोप इंदिरानगर झोपडपट्टी पुनर्वसन विकास संस्थेचे अध्यक्ष दुर्योधन कदम यांनी केला आहे. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून दोषी विकासकांना काळ्या यादीत टाकावे आणि संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी संस्थेचे कायदेशीर सल्लागार ॲड. अजित बोराडे उपस्थित होते.

कदम म्हणाले की, इंदिरानगर परिसरात गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या अनेक पात्र झोपडीधारकांची नावे पुनर्वसनाच्या पात्रता यादीतून वगळण्यात आली आहेत. दुसरीकडे काही अपात्र व बाहेरील व्यक्तींचा संशयास्पद पद्धतीने समावेश करण्यात आला आहे. सर्वेक्षण प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असून नागरिकांच्या हरकती आणि आक्षेपांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. काही मृत व अल्पवयीन व्यक्तींच्या नावांचाही नियमबाह्य समावेश झाल्याचा आरोप त्यांनी केला.

Savitribai Phule Pune University: पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात तरुणांचा राडा; चतुःशृंगी पोलिसांकडून नोटीस जारी

साईचंद्र एसआरए प्रकल्पाशी संबंधित विकासक विवेक पाटील, सतीश अगरवाल आणि झिशान सय्यद यांच्या कार्यपद्धतीवर कदम यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नागरिकांना धमकावून व दबाव टाकून घरे खाली करून घेतली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. अनेक झोपडीधारकांना पर्यायी निवासव्यवस्था तसेच ठरलेले भाडे वेळेवर मिळत नाही. काही नागरिकांकडून ५०० रुपयांच्या मुद्रांकपत्रावर करार करून घेण्यात आले असले तरी त्यांना एसआरए अधिकाऱ्यांकडून मान्यता मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आवश्यक परवानग्या आणि बांधकामाच्या ठिकाणी माहितीफलक नसल्याबाबतही त्यांनी आक्षेप घेतला.

या प्रकरणी दुर्योधन कदम यांच्या वतीने संस्थेचे कायदेशीर सल्लागार ॲड. अजित बोराडे यांनी पुणे एसआरए प्राधिकरणाला कायदेशीर नोटीस बजावली आहे. पात्रता यादीची फेरतपासणी, संशयास्पद लाभार्थ्यांची चौकशी, सर्वेक्षण नोंदी उपलब्ध करून देणे आणि नागरिकांच्या हरकतींवर सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली आहे. चौकशीत गैरव्यवहार सिद्ध झाल्यास संबंधित विकासकांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. तसेच पात्र नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करून आवश्यक असल्यास नवीन विकासकाची नियुक्ती करावी, अशी मागणी कदम यांनी केली. योग्य कार्यवाही न झाल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला.

राज्यातील तुरुंगांमध्ये क्षमतेच्या 140 टक्के कैदी; 60 तुरुंगांमध्ये 38 हजारांहून अधिक कैदी

“आमचा पुनर्वसनाला विरोध नाही. मात्र गेल्या अनेक दशकांपासून राहणाऱ्या मूळ झोपडीधारकांना डावलून अपात्र व्यक्तींना लाभ दिला जात असेल, तर तो अन्याय सहन करणार नाही. नागरिकांना धमकावून घरे खाली करून घेण्याचे प्रकार थांबले पाहिजेत. प्रत्येक पात्र झोपडीधारकाला हक्काचे घर मिळेपर्यंत आमचा लढा सुरू राहील.”

– दुर्योधन कदम, अध्यक्ष, इंदिरानगर झोपडपट्टी पुनर्वसन विकास संस्था

“झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात प्रत्येक पात्र नागरिकाच्या हक्कांचे संरक्षण होणे आवश्यक आहे. इंदिरानगरमधील रहिवाशांनी उपस्थित केलेल्या तक्रारी गंभीर असून त्यांची एसआरए प्राधिकरणाने निष्पक्ष चौकशी करावी. चौकशीत नियमांचे उल्लंघन किंवा गैरव्यवहार सिद्ध झाल्यास दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. पुनर्वसन प्रकल्प पूर्ण व्हावा, मात्र त्यासाठी कोणत्याही पात्र झोपडीधारकावर अन्याय होता कामा नये.”

– ॲड. अजित बोराडे, कायदेशीर सल्लागार, इंदिरानगर झोपडपट्टी पुनर्वसन विकास संस्था

 

 

 

Web Title: Chinchwad indira nagar sra project scam duryodhan kadam demands action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 05:40 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.