राज्यसभेच्या निवडणुकीत (Rajya Sabha Election) भाजपचा (BJP) विजय झाला आहे. भाजपचे तीन उमेदवार विजयी झाल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. ‘अकेला देवेंद्र क्या करेगा’, असं वक्तव्य महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणुकीच्या आधी केलं होतं. त्या वक्तव्याला आता चित्रा वाघ यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
‘अकेला देवेंद्र क्या करेगा’, असं म्हणणाऱ्यांना विजयानंतर करेक्ट कार्यक्रम असं म्हणत चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उत्तर दिलं आहे. हा भाजपचा शानदार विजय आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. पुण्याच्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. अनिल बोंडे, धनंजय महाडिक आणि पीयुष गोयल यांचा विजय हा देवेंद्र फडणवीस यांना चमत्कार आहे. त्यांच्याशिवाय हे शक्य नव्हतं, असंही त्या म्हणाल्या.
करेक्ट कार्यक्रम….अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणणार्यांना दणदणीत उत्तर….????@Dev_Fadnavis #DevendraFadnavis #bjp pic.twitter.com/TLyDJtZ8Lk
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 11, 2022
आघाडी सरकारसोबत असलेल्या आमदारापैकी काही आमदार फोडण्यात भाजपला यश आलं. भाजपच्या १०६ मतांशिवाय अधिक १७ मतं मिळवणं कठिण होतं. मात्र यामध्ये भाजपला यश आलं, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
[read_also content=”पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यात हिंसाचार उसळला, पोलीस आणि आंदोलकांमध्ये चकमक https://www.navarashtra.com/india/violence-erupted-in-west-bengal-howrah-district-with-clashes-between-police-and-protesters-291178/”]
चित्रा वाघ यांनी ट्विटरवर देखील प्रतिक्रिया शेअर केली आहे. त्यात देवेंद्र फडणवीसांचा एक फोटो आहे आणि अशी वाक्य लिहिली आहेत की, “कोई काफी अकेला है, और अकेला ही काफी है…जंग मे जीत के आने के लिए काफी है, वह जमाने के लिए अकेला ही काफी है, हमारी हकीकत को ख्वाब समझने वाले, वो हमारी निंद उडाने के लिए एक ही काफी है…”, असं त्यांनी शेअर केलेल्या पोस्टरवर लिहिलं आहे.