'हरीचे नाम घेता, भवसिंधु तरे'! राज्यावरील संकटे दूर कर, बळीराजाला सुखी ठेव; CM फडणवीसांचे विठुरायाला साकडे
पंढरपूर: आज भल्या पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न झाली. आषाढी शुद्ध एकादशीनिमित पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते महापूजा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पांडुरंगाकडे राज्यावरील संकटे दूर होऊदेत, शेतकऱ्यांचे भले व्हावे, चांगले काम करण्याची ताकद द्यावी असे साकडे पांडुरंगाला घातले.
रुप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥
बहुता सकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥
सर्व सुखाचें आगरु । बापरखुमादेविवरु ॥🚩देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त आज पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी पत्नी अमृता व कन्या दिवीजा यांच्यासमवेत… pic.twitter.com/b1XxjzRZ1r
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 6, 2025
मुख्यमंत्री फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या सोबत नाशिक जिल्ह्यातील कैलास दामू उगले आणि पत्नी कल्पना उगले यांना शासकीय महापूजेचा मान मिळाला. उगले कुटुंब गेले १२ वर्षांपासून नियमितपणे वारी करत आहेत. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न झाली. आषाढी एकादशीनिमित पंढरपूरमध्ये लाखो वारकरी दाखल झाले आहेत.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
वारीच्या माध्यमातून देव आणि भ यांच्यातील अंतर कमी होते. ही पर्वणी अत्यंत आनंददायी आहे. श्री विठ्ठलाच्या पूजेनंतर मला खूप समाधान वाटले. राज्याची काळजी घ्यावी, आम्हाला शेतकऱ्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण आणण्यासाठी ताकद द्यावी, असे मी माऊलींकडे प्रार्थना केली.
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ या उपक्रमाचा समारोप