Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pandharpur Crime: पंढरपुरातील मायलेकाच्या दुहेरी हत्येचा अखेर उलगडा; 8 महिन्यांनंतर आरोपी गजाआड

पंढरपूर येथे मायलेकाच्या निर्घृण दुहेरी हत्येचा आठ महिन्यांनंतर उलगडा झाला. डिजिटल तपास, फोन रेकॉर्ड्स आणि खबऱ्याच्या मदतीने आरोपींना अटक करण्यात आली असून चोरीचा बनाव करून पोलिसांची दिशाभूल केल्याचेही समोर आले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 14, 2026 | 02:37 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • भर वस्तीत 10 मिनिटांत आई-मुलाची क्रूर हत्या.
  • CCTV पुरावे नसतानाही डिजिटल तपासातून धागेदोरे मिळाले.
  • चोरीचा बनाव करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न.
  • आरोपी राजस्थानला पळाल्यानंतर अटक.
पंढरपूर: पंढरपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मायलेकाची निर्घृण दुहेरी हत्या करण्यात आल्याचे समोर आले होते. या प्रकरणाचा तपास तब्बल आठ महिन्यापासून सुरु होता. अखेर या प्रकरणाचा उलगडा करण्यात आला आहे. IPS अधिकारी प्रशांत डगळे यांनी या हत्येचा उलगडा अवघ्या एका महिन्यात केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घ्या.

नागरगावात कार-ट्रकचा भीषण अपघात; बाप-लेकींसह मामाचा जागीच मृत्यू

नेमकं प्रकरण काय आहे?

पंढरपूर शहरातील लखन संजय जगताप या तरुणाची भर वस्तीतील त्याच्या घरात गुसून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. त्याच्यावर तब्बल १६ वार करण्यात आले. त्याच्यावर वार करताना त्याच्या आईने पहिले आणि आई सुरेखालाही नऊ वार करून ठार मारण्यात आले. अवघ्या दहा मिनिटांत हे दुहेरी हत्याकांड करून आरोपी फरार झाले होते.

कसा केला तपास?

या प्रकरणात घटनास्थळी कोणताही CCTV पुरावा उपलब्ध नव्हता. तपासाचे ठोस धागेदोरे मिळत नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे होते. सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी सुरुवातीपासून तपासाला नव्याने सुरुवात केली. तब्बल दीड हजार फोन कॉल्स आणि इंटरनेट रेकॉर्ड्स तपासून पाहण्यात आले. याच डिजिटल तपासातून संशयाची साखळी तयार होत गेली.

सुरुवातीला गोंधळात टाकले नंतर

हत्येसाठी गवत कंपन्यांच्या मशीनच्या पायांपासून खास हत्यार तयार करण्यात आले होते. पोलिसांना गोंधळात टाकण्यासाठी आरोपींपैकी एक विशाल शिंदे नाईक याने स्वतःच पोलीस ठाण्यात फोन करून खुनाची माहिती दिली होती. हत्येनंतर घरातील ५५ इंची टीव्ही आणि काही साहित्य नेले होते. मात्र हा चोरीचा प्रकार नसून पोलिसांचा दिशाभूल करण्यासाठी मुद्दाम चोरीचा बनाव केल्याचे तपासात समोर आले.

या हत्याकांडात एका अल्पवयीन मुलाने आरोपींना मदत केल्याचेही समोर आले. हत्येच्या वेळी पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीशी पोलिसांच्या खबऱ्याने मैत्री करून त्याच्याकडून महत्वाची माहिती मिळवली. यानंतर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. या दुहेरी हत्याकांडात विशाल शिंदे नाईक याने अथर्व शिंदे नाईक यांच्या मदतीने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे.

आरोपी हत्येनंतर राजस्थानला रवाना

आरोपी हे हत्या केल्यांनतर राजस्थानला कामासाठी गेल्याचे तपासात निष्पन्न झाले. हत्येच्या वेळी विशालचा मोबाईल फोन सुमारे एक तास बंद होता. फोन बंद करण्यापूर्वी त्याने सहआरोपी अथर्वशी संपर्क साधल्याचे ठोस पुरावे पोलिसांच्या हाती लागले. याच आधारावर दोघांनाही अटक करण्यात आली.

आरोपी अटकेत

हत्या केल्यानंतर अधिक चौकशीत आरोपींनी चोरी केलेला ५५ इंची टीव्ही आणि हत्येसाठी वापरलेले हत्यार चंद्रभागा नदीपात्रात फेकल्याची कबुली दिली. पोलिसांनी चंद्रभागेतून हे साहित्य जप्त केले आहे. आरोपी आणि जगताप कुटुंबीय हे शेजारी राहत होते. त्यांच्यातील वैमनस्य हेच खुनामागील प्रमुख असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दोघांना नायायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. IPS अधिकारी प्रशांत डगळे यांनी अवघ्या एका महिन्यातच संपूर्ण हत्येचा उलगडा केला आहे.

Kolhapur Crime: पैशांच्या वादातून संताप अनावर; दगडी वरवंट्याने माजी सैनिक वडिलांची मुलानेच केली हत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या केव्हा उघडकीस आली?

    Ans: घटनेनंतर आठ महिन्यांनी सखोल तपासातून उलगडा झाला.

  • Que: तपासात महत्त्वाचा पुरावा कोणता ठरला?

    Ans: फोन कॉल रेकॉर्ड्स, इंटरनेट डेटा आणि खबऱ्याची माहिती निर्णायक ठरली.

  • Que: आरोपींनी पोलिसांची दिशाभूल कशी केली?

    Ans: घरातून साहित्य चोरीला गेल्याचा बनाव करून तपास चुकीच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Pandharpur crime the double murder of mayleka in pandharpur is finally solved accused arrested after 8 months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 02:37 PM

Topics:  

  • crime
  • pandharpur
  • Pandharpur crime

संबंधित बातम्या

आषाढी वारी संपताच अतिक्रमणांचे कमबॅक! पंढरपूर नगरपालिकेचा नुसताच दिखावा; फेरीवाल्यांनी पुन्हा रस्ते व्यापले
1

आषाढी वारी संपताच अतिक्रमणांचे कमबॅक! पंढरपूर नगरपालिकेचा नुसताच दिखावा; फेरीवाल्यांनी पुन्हा रस्ते व्यापले

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
2

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
3

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
4

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.