आई शप्पथ सांगतो! दिल्लीत ताजमहल पेक्षा भव्य शिवस्मारक उभारणार; CM देवेंद्र फडणवीसांची दिल्लीत गर्जना
आग्राच्या लाल किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जंयती साजरी करण्यात आली. यावेळी आग्र्यात छत्रपतीचं स्मारक उभारण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ज्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं ती जागा उत्तर प्रदेश सरकारनं दिली तर त्या जागेवर भव्य स्मारक उभारणार आणि हे स्मारक इतकं भारी असेल की ताज महालपेक्षा जास्त पर्यटक छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक पाहायला येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
…’ये’ ताकत हमारे छत्रपति शिवाजी महाराज की थी! (‘शिवजन्मोत्सव संपूर्ण भारतवर्ष का 2025’ कार्यक्रम | आगरा | 19-2-2025)#UttarPradesh #Agra #ChhatrapatiShivajiMaharaj pic.twitter.com/9W94TmQujK — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 19, 2025
औरंगजेबानं ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना नजर कैद केलं होतं. त्याच लाल महालात गेल्या ३ वर्षांपासून शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. याच किल्ल्यात मुघल बादशाह औरंगजेबानं लाल महालात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता. त्यावेळी महाराजांनी भर दरबारात मुघल बादशाहाला सुनावलं. सैरभैर झालेल्या औरंगजेबानं महाराजानां नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले. महाराज राजा रामसिंगच्या कोठीत महाराज ९९ दिवस राहिले. छत्रपतींना ठेवण्यात आलेली कोठी आणि परिसर सध्या मीना बाझार म्हणून ओळखला जातो.
हमारे पुरखे छत्रपति शिवाजी महाराज एवं छत्रपति संभाजी महाराज हैं! (‘शिवजन्मोत्सव संपूर्ण भारतवर्ष का 2025’ कार्यक्रम | आगरा | 19-2-2025)#UttarPradesh #Agra #ChhatrapatiShivajiMaharaj pic.twitter.com/JZC5606U04 — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 19, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी योगी सरकारकडे त्या मीना बाजारची जागा भव्य स्मारकासाठी देण्याची केली आहे. योगी सरकार आता ही जागा देऊन महाराजांचा सन्मान करणार का हे पाहणं महत्वाचं आहे. महाराजांचं ताजमहालपेक्षा भव्य स्मारक झालं तर महाराष्ट्रातील शिवप्रेमींसाठी यापेक्षा मोठी कौतुकाची गोष्ट नाही. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या महाराजांच्या महत्त्वाकांक्षी सागरी स्मारकाचं काय झालं? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.