प्लास्टिक फुलांबाबत फडणवीस मोठ्या निर्णयाच्या तयारीत? १०५ आमदारांच्या सह्यांचे पत्र...; नेमका विषय काय?
मुंबई: राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकार लवकरच एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. राज्यात लवकरच प्लास्टिक फुलांवर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यत होणाऱ्या बैठकीत याबाबत नरिणय होऊ शकतो असे सांगितले जात आहे.
सणा-सुदीला आपण सजावट करण्यासाठी किंवा अन्य कोणत्याही कार्यक्रमात आपण प्लॅस्टिकच्या फुलांचा वापर करत असतो. या प्लास्टिक फुलांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे या प्लास्टिक म्हणजेच कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याची मागणी शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पाटील यांनी केली. रोहित पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली होती.
रोहित पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन करत प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्याची मागणी केली. त्या निवेदनाला रोहित पाटील यांनी १०५ आमदारांच्या सह्यांचे पात्र देखील जोडले होते. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी लवकरच यासंदर्भात भारत गोगावले आणि पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत बैठक लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याचे समजते आहे.
राज्यात प्लास्टिक फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बाजारात प्लॅस्टिकच्या फुलांची कमी दरात विक्री होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. प्लास्टिक पिशवीच्या वापरावर ज्या प्रमाणे सरकारने बंदी आणली त्याच प्रमाणे प्लॅस्टिकच्या फुलांवर बंदी घातल्यास शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे, असे आमदार रोहित पाटील यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस धक्का-तंत्र वापरणार? कॅबिनेटमध्ये मोठे फेरबदल होणार?
गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे बहुमत प्राप्त झाले. महायुतीचे सरकार स्थापन झाले. देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळात मोठे बदल करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धक्का-तंत्राचा वापर करण्याची शक्यता आहे. याचा फटका मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना बसण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात महायुती म्हणजेच भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आहे. मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना डच्चू मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
महाराष्ट्र्र सरकारच्या कॅबिनेटमध्ये मोठे फेरबदल होण्याचा अंदाज आहे. यामध्ये अनेक मंत्र्यांना आपली खुर्ची सोडावी लागू शकते. तसेच नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सगळ्या देशाचे राज्याचे लक्ष आता मुख्यमंत्री काय करणार याकडे लागले आहे. मंत्रिमंडळात होणारे फेरबदल हे केवळ भाजपसाठी असे सांगितले जात होते. मात्र मात्र आता ते कदाचित शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांबाबत देखील असण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.