Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“…अशा परिस्थितीत AI महत्वाचे ठरू शकते”; कृषी क्षेत्राबाबत Devendra Fadnavis यांचे भाष्य

पंतप्रधान मोदी यांनी एआय माडेल विश्वासार्ह डेटा, सुशासन आणि लोकांशी असलेले उत्तरदायित्व यावर आधारित असायला हवे. विश्वासाशिवाय शेतीशी निगडीत विविध सेवा आपण देऊ शकणार नाही, असे फडणवीस म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 20, 2026 | 08:32 PM
“…अशा परिस्थितीत AI महत्वाचे ठरू शकते”;  कृषी क्षेत्राबाबत Devendra Fadnavis यांचे भाष्य
Follow Us
Follow Us:

जागतिक स्तरावर महाराष्ट्राच्या महाॲग्री एआय धोरणाचा परिचय
सर्वांगीण समृध्दी आणण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील
भारत मंडपम् येथे सुरू आहे  एआय इम्पँक्ट समिट -२०२६

नवी दिल्ली: कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे जाण्याची क्षमता, महिला सक्षमीकरणासह सर्वांगीण समृध्दी आणण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. आर्टीफिशीअल इंटेलिजन्सचा वापर ही बाब केवळ प्रदर्शने आणि चर्चेपुरती मर्यादीत न राहता ती मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचण्याची गरजही मुख्यमंत्र्यांनी प्रतिपादित केली.

नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे सुरू असलेल्या इंडिया एआय इम्पँक्ट समिट -२०२६ मधील ‘एआय इन अँग्रिकल्चर’ या विषयावरील चर्चासत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.  नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी  भारत सरकार, जागतिक संशोधन संस्था, गुंतवणूकदार यांच्याशी महाराष्ट्र सरकार सहकार्य करण्यासाठी तयार असल्याचे  मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Devendra Fadnavis : “हवामान बदल कृती कार्यक्रमाला मुंबई क्लायमेट वीकमुळे मिळणार वेग”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

सध्या जगभरात शेतीसमोर अनेक आव्हाने आहेत. त्यामुळे अन्न सुरक्षिततेवर ताण आला आहे.  अनिश्चित वातावरण, घसरणारी पाणी पातळी, जमिनीचा खालावणारा दर्जा, पुरवठा साखळीतील अडथळे आणि जागतिक मार्केटमधील अनिश्चितता यांचा या आव्हानांमध्ये समावेश आहे. अशा परिस्थितीत आर्टीफिशीअल इंटेलिजन्स महत्वाची भूमिका पार पाडू शकते, असे सांगून फडणवीस  म्हणाले, जगातील अनेक देशांसाठी कृषी विषय केवळ आर्थिक विषयाशी नि्गडीत नाही. कृषी विषय अन्न सुरक्षितता, सामाजिक सुरक्षितता, आर्थिक स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय सुरक्षेचा विषय आहे. यामुळे भारताने याबाबत फार पूर्वीच विचार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या इंडिया एआय मिशनमध्ये कृषी क्षेत्राचा प्रामुख्याने विचार केला आहे. यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर , सेवापुरवठा, समावेशकता यांचा विचार केला गेला आहे.

🔸 CM Devendra Fadnavis presided over the exchange of a Letter of Intent (LoI) between the Government of Maharashtra and OpenAI at the 'India AI Impact Summit 2026' in New Delhi, ushering in a new era of AI-driven governance and innovation. Highlights of the collaboration:
✅ AI… pic.twitter.com/7HJw61N1mn
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 20, 2026

फडणवीस म्हणाले, “भारतातील सुमारे निम्मी लोकसंख्या प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या कृषी क्षेत्राशी निगडीत आहे. पण यापैकी फार कमी लोकांना बदलते हवामान, शेतीसाठी आवश्यक असणारे निविष्ठाचे दर, शेतमालाचे बाजारभाव, वित्तपुरवठा याबाबत  माहिती उपलब्ध आहे. सध्याच्या व्यवस्थेला गतीने माहिती पुरवण्यात आणि आवश्यक माहिती देण्यात काही मर्यादा आहेत. यावर आर्टीफिशीअल इंटेलिजन्सच्या सहाय्याने मात करू शकतो. आर्टीफिशीअल  इंटेलिजन्स शेतीसाठी आवश्यक असणारी बँकवर्ड आणि फाँरवर्ड लिंकेजची माहिती देऊ शकते. यामध्ये वातावरणातील बदल, जलसिंचन, खतपुरवठा, बाजारभावातील फेरबदल आणि पुरवठा साखळी याबाबत माहिती देऊ शकते.”

“नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भविष्यात…”: Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला विश्वास

आर्टीफिशीअल इंटेलिजन्स जादूची कांडी नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी एआय माडेल विश्वासार्ह डेटा, सुशासन आणि लोकांशी असलेले उत्तरदायित्व यावर आधारित असायला हवे. विश्वासाशिवाय शेतीशी निगडीत विविध सेवा आपण देऊ शकणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Web Title: Cm devendra fadnavis said in ai impact summit 2026 agricultural sector bharat mandpam new delhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 07:07 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • Artificial intelligence
  • CM Devendra Fadnavis

संबंधित बातम्या

‘मिसिंग लिंकवर प्रश्न विचारला तर राजकारण?’ राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल; सभेत केली मिमिक्री
1

‘मिसिंग लिंकवर प्रश्न विचारला तर राजकारण?’ राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल; सभेत केली मिमिक्री

राज्य शासनाचा ऐतिहासिक निर्णय; प्रशासकीय रचना, संचालक मंडळ आणि भागधारकांना मंजुरी, वारकरी सेवेला मिळणार नवे बळ
2

राज्य शासनाचा ऐतिहासिक निर्णय; प्रशासकीय रचना, संचालक मंडळ आणि भागधारकांना मंजुरी, वारकरी सेवेला मिळणार नवे बळ

मुंबईसाठी सरकारचा मेगा मास्टर प्लॅन! 13 हजार कोटींचा पूरनियंत्रण आराखडा, 825 अब्ज डॉलर जीडीपीचे लक्ष्य; फडणवीसांची मोठी घोषणा
3

मुंबईसाठी सरकारचा मेगा मास्टर प्लॅन! 13 हजार कोटींचा पूरनियंत्रण आराखडा, 825 अब्ज डॉलर जीडीपीचे लक्ष्य; फडणवीसांची मोठी घोषणा

‘मुख्यमंत्री फडणवीस सर्वात खोटारडी व्यक्ती, धनगर आरक्षण, मराठा आरक्षण, वेगळा विदर्भावरही खोटेपणाचा कळस’ – हर्षवर्धन सपकाळ
4

‘मुख्यमंत्री फडणवीस सर्वात खोटारडी व्यक्ती, धनगर आरक्षण, मराठा आरक्षण, वेगळा विदर्भावरही खोटेपणाचा कळस’ – हर्षवर्धन सपकाळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.