पुणे: पुणे महापालिका आयुक्त व पुणे पोलीस आयुक्त यांनी शहरातील वाहतुक बाबत आजच्या कार्यशाळेत सादरीकरण केले. यात पुणे शहरातील वाहतुकीचा वेग हा प्रति तास 19 कि.मी. इतका आहे. तर कधी तो प्रतितास 12 कि.मी. होत असल्याचे सांगितले. परंतु महानगरात वाहतुकीचा वेग हा प्रतितास 30 कि.मी. पर्यंत हवा आहे. त्यादृष्टीने येत्या डिसेंबर, २०२६ पर्यंत हा वेग ३० कि.मी. प्रतितास कसा नेता येईल यासाठी काही उपाययोजना नियोजित केल्या आहेत. टप्प्या टप्प्याने शहरातील ३५ बॉटल लेक, मिसिंग लिंक काढून यातून पुण्यातील वाहतुक सुरळीत करण्यासाठी कार्यवाही केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
यशदा येथील कार्यशाळेनंतर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, शहरातील वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी रस्त्याखालून भुयारी मार्गांचे नेटवर्क करणे आवश्यक आहे. सध्या पुणे शहरात केवळ ६ टक्के मार्ग हा भुयारी मार्ग आहे. त्यामुळे त्यामुळे पुणे महापालिकेने भुयारी मार्गांचे नेटवर्क करण्याबाबत सूचना देण्यात आली आहे. पुणे शहरात आज २ हजार बसेस आहे, तर पुढील दोन वर्षात त्या ६ हजार पर्यंत नेण्याबाबत चर्चा झाली. या सर्व गोष्टी योग्य प्रकारे आपण केल्या तर पुण्यातील वाहतुक सुरळीत होण्यास मदत होईल. दरम्यान पिंपरी चिंचवड येथील रस्ते मोठे असल्याने या ठिकाणी रॅपिट वाहतुक व्यवस्था तयार करण्याबाबत सूचना करण्यात आली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
पुणे शहराचा व पुणे महानगर परिसरातील वाहतुकीसाठी कॉम्परेसिटीव्ह मोबिलिटीव्ह प्लॅन पुढील ३० वर्षाचा विचार करून तसे नियोजन करण्यात आले आहे. हा तीन टप्प्यात आहे. जवळपास २२०० किलोमीटरचा परिसर ग्रहित धरून हा प्लॅन तयार करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात ६२ हजार कोटी रूपयांची गुंतवणुक करावी लागणार आहे. तर संपूर्ण प्रकल्पासाठी १ लाख ३० कोटी रूपये खर्च करून पुढील ३० वर्षासाठी तो तयार करण्यात येणार आहे.
यामध्ये सार्वजनिक वाहतुक, मेट्रो, बस सेवासह सर्व वाहतुक सेवांचे ध्येय ठेवले आहे. यात पहिल्या टप्प्यात सार्वजनिक वाहतुक ३० टक्क्यांपर्यंत नेण्याचे व दुसरया टप्प्यात ती वाहतुक ५० टक्क्यांपर्यंत नेण्याचे उदिष्ठ आहे. याकरिता कुठल्याही व्यक्तीला ५०० मीटर अंतरात सार्वजनिक वाहतुक व्यवस्था उपलब्ध झाली पाहिजे असे नियोजन करण्यात आले आहे. यापुढे रिंग रोड, भुयारी मार्ग, ग्रेड सेपरेटर अशा प्रकारे हा प्रकल्प तयार केला आहे. यात पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका, पीएमआरडीएसह राज्य सरकारने काय करायचे याची आखणी केली गेली आहे. यापुढे कोणतेही काम केले गेले तरी या मोबिलीटी प्लॅनप्रमाणेच केले पाहिजे असे नियोजन करण्यात आले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.