MNS Raj Thackeray Stuck in a traffic jam in Pune news update
Raj Thackeray in Pune traffic : पुणे : पुण्यातील वाहतूक कोंडी हा आता जोरदार चर्चेचा विषय बनला आहे. याचा सामान्य नागरिकांना तर रोज सामना करावा लागत आहे. नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे नदीपात्रातील रस्ता बंद असल्याने मध्यवर्ती भागामध्ये वाहनांची मोठी गर्दी होत आहेत. त्याचबरोबर गणेशोत्सवामुळे खरेदीसाठी देखील अनेकजण हे पुण्यामध्ये येत आहेत. त्याचबरोबर जागोजागी मंडप घातले गेल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होत आहे. याचा फटका आता राजकीय नेत्यांना देखील बसू लागला आहे. पुण्यामध्ये मनसे नेते राज ठाकरे यांचा ताफा वाहतूक कोंडीमध्ये अडकला असल्याचे दिसून आले आहे.
राजकीय नेत्यांसाठी अनेकदा पोलीस प्रशासनाकडून रस्ता करुन दिला जातो. मात्र मनसे नेते राज ठाकरे यांनी पुण्यातील वाहतूक कोंडीचा सामना केला. पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये असणाऱ्या सोन्या मारुती चौकापासून फडके हौद पर्यंतचा रस्ता पार करताना राज ठाकरे वाहतूक कोंडीमध्ये अडकले. अवघ्या पाच मिनिटांचा हा रस्ता पार करताना राज ठाकरे यांना तब्बल 25 मिनिटे लागली. हा भाग शहरातील मध्यवर्ती भागामध्ये असून जवळच रविवार पेठ बाजारपेठ आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुण्यातील रविवार पेठ बाजारपेठांमध्ये गणपतीच्या सजावटीचे सामान घेण्यासाठी मोठी गर्दी होत असते. अगदी लांबून लोक या भागांमध्ये खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे या परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी नेहमीच होताना दिसून येते. याचा सामान्य लोकांना मोठा फटका बसल्याचे दिसून येते. यामध्ये आता मनसे नेते राज ठाकरे हे देखील अडकले होते. मात्र राज ठाकरे यांच्या व्हीआयपी ताफ्यामुळे नागरिकांना देखील त्रास सहन करावा लागला. अनेक लोक एकाच जागी ताटकळत उभे राहिले होते.
मनसे नेते राज ठाकरे हे पुण्यातील रविवार पेठेत असणाऱ्या फडके हौद चौकात मनसे कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या मूर्ती तुमची किंमतही तुमचीच या कार्यक्रमासाठी आले होते. यावेली राज ठाकरेंना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसलेला पाहायला मिळाला आहे. शनिवार असल्याने पुणे शहरातील पेठांमध्ये पुणेकरांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती त्यामुळे या सर्व भागात मोठी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली.
महाराष्ट्रसंंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मनसे नेते राज ठाकरे यांनी यापूर्वी अनेकदा मुंबईच्या वाहतूक कोंडीवर प्रश्न उपस्थित होते. राज ठाकरे स्वतः नेहमीच मुंबई आणि पुण्यातील रस्ते, वाहतूक आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर भाष्य करत असतात. दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी मुंबईतील वाहतूक कोंडीवर आणि पार्किंगवर पर्याय देणारा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सादर केला आहे. यामध्ये मैदानाच्या खाली पार्किंग व्यवस्था उभारणे तसेच तरुणांना वाहतूकीच्या शिस्तीचे पालन करायला लावणे असे उपाय यामध्ये सुचवण्यात आले होते. त्यानंतर आता राज ठाकरे यांना पुण्यातील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे.