राज्यात कर्जमाफी कधी होणार? CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
विधानसभा निवडणूक प्रचारात महायुतीने अनेक आश्वासने दिली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचंही आश्वासन देण्यात आलं होतं. निवडणूक महायुतीला मोठं यश मिळालं, मात्र अद्याप शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. दरम्यान आज पुण्यात जागतिक योग दिनानिमित्त वारकरी भक्तीयोग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कर्जमाफीवरही भाष्य केलं.
कदमवाकवस्ती पालखी स्थळावर मुक्काम प्रमुख अक्षय दोमाले तळ ठोकून; निर्मळ वारीसाठी पूर्ण प्रयत्न
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत दिलं होतं. ते आश्वासन विसरला का अशा चर्चा सुरु असल्याचा प्रश्न पत्रकारांनी फडणवीसांना विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना फडणीस म्हणाले की, कर्जमाफी बाबत मी सविस्तर सांगितले आहे, कर्जमाफी कधी करायची यासंदर्भात काही नियम आहेत. कर्जमाफी करण्याची एक पद्धत आहे, या सरकारनं दिलेला एकही शब्द फिरवला जाणार नाही, योग्यवेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
योग दिनाबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, योग जगभरात पोहोचवण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलं. आज अनेक ठिकाणी योग दिन साजरा केला जात आहे. पुण्यात आज वारकरी बंधूंसोबत योगा करण्यात आला. एकाच वेळी 700 ठिकाणी योगा करण्यात आल्याचं ते म्हणाले.
आमच्या वारीचं आणि पालखीचं तत्व आनंददायी आहे, अशा प्रकारचं काही घडलं असेल तर भविष्यात घडू नये यासाठी आम्ही प्रयत्न करू. तुम्ही पण मनावर घेऊ नका, असं देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याच्या भवानीपेठेत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या मुक्कामादरम्यान आळंदी संस्थानाच्या सेवेकरांकडून माध्यमांना मिळालेल्या चुकीच्या वागणुकीवर प्रतिक्रिया दिली.
पालखी निघणार पुढच्या प्रवासाला…; पुण्यातील मध्यवर्ती भागापासून हडपसरपर्यंत ‘हे’ मार्ग राहणार बंद
दरम्यान आळंदीत कोणत्याही परिस्थितीत कत्तलखाना होऊ देणार नाही, असं त्यांनी सांगितलं. शिवाय राज्यातील धरणातील पाण्याची पातळी आणि पावसाच्या पाण्याबाबत आम्ही लक्ष ठेवून आहोत. धरणांमधील पाण्याचा विसर्ग कधी करायचा, कधी कमी करायचा, याबाबत शेजारील राज्यांशी सरकारचं बोलणं सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. पहिल्या सहाशेमध्ये आल्याबंद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अभिनंदनही त्यांनी यावेळी केलं.