Devendra Fadnavis: आळंदीत कत्तलखाना होणार की नाही? फडणवीस म्हणाले, "... मी स्वतः आदेश दिलेले आहेत"
पुणे: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात वारकऱ्यांसह योग केला. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील आणि राजेश पांडे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आळंदीत कत्तलखाना होणार की नाही, पुण्यात पत्रकारांशी देण्यात आलेली खराब वागणूक यावर भाष्य केले.
पुण्यातून बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी सर्वप्रथम सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा देतो.” आळंदी ट्रस्टच्या काही विश्वस्तांनी पत्रकारांना खराब वागणूक दिल्याचे तसेच पोलिसांना देखील दमदाटी केल्याचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, “आम्ही पुन्हा अशा गोष्टी होणार नाहीत यासाठी काळजी घेऊ. अनेकदा टेंशनमध्ये अशा गोष्टी घडत असतात. विश्वस्तांची नेमणूक सरकार नाही ज्युडीशिअल अधिकाऱ्यांच्या मार्फत केल्या जातात.”
कर्जमाफीच्या निर्णयावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “कर्जमाफी करण्यासाठी काही नियम आहेत, काही पद्धती आहेत. या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही. त्याबाबतचा योग्य निर्णय सरकार घेईल.”
🕘 8.53am | 21-6-2025📍Pune.
LIVE | Media Interaction#Maharashtra #Pune https://t.co/Y8P8dS75SI
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 21, 2025
आळंदीच्या विकास आराखड्यात एक कत्तलखान्यासाठी एक आरक्षण दाखवण्यात आलेले आहे. आळंदीत कत्तलखान्याबाबत प्रश्न विचारला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आळंदीचा विकास आराखडा आहे त्यामध्ये एक आरक्षण कत्तलखान्याकरता दाखवण्यात आलेले आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये आळंदीत कत्तलखाना करता येणार नाही. स्वतः कत्तलखाना वगळण्याचे मी स्वतः आदेश दिलेले आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये आळंदीत कत्तलखाना करून देणार नाही.”