
" जनसामान्यांचे आधारस्तंभ, लोकहितासाठी ...": फडणवीसांनी केले Gopinath Munde ना अभिवादन, पहा Video
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती
राज्यात भाजपचे संघटन वाढवण्यात मोठा वाटा
मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले विनम्र अभिवादन
CM Devendra Fadnavis: भाजपचे दिवंगत नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. महाराष्ट्रात भाजप पक्ष आणि त्याचे संघटन वाढवण्यात गोपीनाथ मुंडे यांचा मोठा वाटा होता. दरम्यान लोकनेते, कुशल संघटक स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत अभिवादन केले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊयात.
गोपीनाथ मुंडे यांनी राज्यात भाजपचे संघटन वाढवण्यास प्रचंड मेहनत घेतली. भाजपल भडजी आणि शेठजीचा पक्ष म्हणून हिणवले जायचे. मात्र ही प्रतिमा बदलण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी मोठे कार्य केले. गपीनाथ मुंडे यांची ग्रामीण भागातील जनतेवर पकड होती. कष्टकरी, शेतकरी, उसतोड कामगार यांच्यासाठी मुंडे यांनी अविरत कार्य केले. मातीशी नाळ जोडलेला नेता म्हणून त्यांची ओळख होती.
मुख्यमंत्री फडणवीस यांची पोस्ट काय?
लोकहितासाठी झटणारे लोकनेते, जनसामान्यांचे आधारस्तंभ, कुशल संघटक, माजी केंद्रीय मंत्री, आमचे प्रेरणास्थान गोपीनाथरावजी मुंडे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
राज्याच्या राजकारणात असे अनेक नेते होऊन गेले, की ज्यांनी विरोधकांची देखील मने जिंकली. यामध्ये भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा देखील समावेश आहे. भाजपला घराघरात पोचवण्यासाठी अतोनात संघर्ष केला आहे. प्रदेशाध्यक्ष झाल्यावर देखील त्यांनी संघटन वाढवण्यासाठी मेहनत घेतली.
2014 मध्ये महाराष्ट्रातील शिवसेना भाजप युती तुटली तेव्हा गोपीनाथ मुंडे यांची उणीव सर्वांना जाणवली. शिवसेना भाजप युती अभेद्य आणि मजबूत राखण्यात त्यांचा मोठा सहभाग, वाटा होता. गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन या जोडीने महाराष्ट्र राजकारणात प्रवेश केला आणि भारतीय जनता पक्षाला राज्यभर पोहोचवण्याच काम केले. त्यांच्या मेहनतीने आज भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तेत असल्याचे दिसून येत आहे. तळागाळापर्यंत पक्ष पोचवण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी अविरत मेहनत केली. त्यामुळेच गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष आणि 100 पेक्षा जास्त जागा जिंकणारा एकमेव पक्ष ठरल्याचे पाहायला मिळाले.