Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“निवडणुका पुढे नेणे…, पुढच्या निवडणुकीत असं…”, निवडणूक आयोगाच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली तीव्र नाराजी

नगरपालिका, नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलण्यात आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाने कोर्टाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढला आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 02, 2025 | 01:31 PM
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली तीव्र नाराजी (फोटो सौजन्य-X)

निवडणूक आयोगाच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली तीव्र नाराजी (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:
  • सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर
  • निवडणुक आयोगाच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीसांची प्रचंड नाराजी
  • निवडणुकांचे निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर करण्याचे निर्देश
Nagarparishad Election Result On Devendra Fadnavis : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पहिला टप्प्या आज (2 डिसेंबर) ला महाराष्ट्रात मतदान होत आहे. या राजकीय लढाईत सुमारे १ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावत असताना निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय समोर आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केवळ मतमोजणी पुढे ढकलली नाही तर आचारसंहितेची अंमलबजावणी तारीखही वाढवली आहे.

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आता २१ डिसेंबर रोजी जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. काही नगरपरिषदांच्या खटल्यांमध्ये न्यायालयीन सुनावणी प्रलंबित असल्याने राज्यातील सुमारे २० नगरपरिषदांचे मतदान पुढे ढकलण्यात आले होते. आता या निवडणुका २० डिसेंबर रोजी होतील. याचिकेत सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर करावेत अशी मागणी करण्यात आली होती, अन्यथा २० नगरपरिषदांच्या निकालांवर परिणाम होऊ शकतो. सर्व पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आज झालेल्या सर्व नगरपालिका निवडणुकांचे निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर करण्याचे निर्देश दिले.

मोठी बातमी! 2 डिसेंबरची मतमोजणी रद्द, निकालाची नवीन तारीख जाहीर, हायकोर्टाचा मोठा निर्णय

२० डिसेंबर रोजी निवडणुका संपल्यानंतर अर्धा तास एक्झिट पोल जाहीर करता येतील. २० डिसेंबरपर्यंत आचारसंहिताही लागू राहील. ज्या ठिकाणी निवडणुका रद्द करण्यात आल्या आहेत, तिथे उमेदवारांना पूर्वी दिलेली निवडणूक चिन्हे अबाधित राहतील, असे न्यायालयाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाच्या याच निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहत आहे. पण पहिल्यांदाच घोषित निवडणुका पुढे जात आहेत. त्याचे निकाल पुढे जात आहेत. मला वाटते की एकूण पद्धत योग्य नाही. पण उच्च न्यायालयाचे विभागीय खंडपीठ स्वायत्त आहे, त्याचा निर्णय सर्वांना स्वीकारावा लागेल. निवडणूक आयोग स्वायत्त आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कठोर परिश्रम करणारे, प्रचार करणारे उमेदवार निराश होतात आणि यंत्रणेच्या अपयशामुळे त्यांची काही चूक नसताना या गोष्टी होणे योग्य नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

राज्यात निवडणूक आयोगाला आणखी अनेक निवडणुका घ्यायच्या आहेत. निवडणूक आयोगाने संपूर्ण प्रक्रियेत सुधारणा आणल्या पाहिजेत. किमान पुढील निवडणुकीत तरी असे होणार नाही, हे बघितले पाहिजे. या सगळ्याबाबत माझं मत असं आहे की, मी या सगळ्याला चूक म्हणणार नाही. पण जो काही कायदा आहे चुकीचा अर्थ लावण्यात आला.

निवडणूक आयोगाचे वकील कोण आहेत याची मला माहिती नाही. पण त्यांच्याबद्दल पूर्ण आदराने मी म्हणतो की, त्यांनी कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. मी इतक्या वर्षांपासून निवडणुका पाहत आहे, मी देखील नियम बघीतले आहेत. मी अनेक वकिलांचा सल्ला घेतला आहे. पण निवडणूक आयोगाकडून चुकीचा अर्थ लावण्यात आला. ज्याठिकाणी सगळ्या गोष्टी पालन झाले आहे, अशा ठिकाणी कोर्टात गेलं तर कोर्टाने त्याला दिलासाही दिला नाही. मात्र, केवळ कोर्टात गेला म्हणून त्याठिकाणी निवडणुका पुढे नेणं कुठल्याच तत्त्वाच बसत नाही. पण मी यावर अधिक बोलणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी असेही म्हटले की २८४ पैकी फक्त २४ ठिकाणी निवडणुका घ्यायच्या आहेत, त्यामुळे सर्व मते पुढे करणे योग्य वाटत नाही.

भाजपवर टीका करुन शहाजी बापू पाटील फसले? चौकशीचा ससेमिरा अन् विरोधकांचे टीकास्त्र

Web Title: Cm fadnavis fumes postponing elections is against all principles expresses strong displeasure over poll schedule change

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 01:31 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • maharashtra
  • Maharashtra Local Body Election

संबंधित बातम्या

Anjali Damania : “शिंदेंनीं मालवणला दोन बॅग मधून काय आणले? पैसे होते?” अंजली दमानियांचा सवाल
1

Anjali Damania : “शिंदेंनीं मालवणला दोन बॅग मधून काय आणले? पैसे होते?” अंजली दमानियांचा सवाल

Maharashtra Local Body Election : कोल्हापूरच्या निवडणुकीमध्ये मिठाचा खडा? कागलमध्ये मतदान केंद्रावर पोलीस अन् तृतीयपंथीचा वाद
2

Maharashtra Local Body Election : कोल्हापूरच्या निवडणुकीमध्ये मिठाचा खडा? कागलमध्ये मतदान केंद्रावर पोलीस अन् तृतीयपंथीचा वाद

भाजपवर टीका करुन शहाजी बापू पाटील फसले? चौकशीचा ससेमिरा अन् विरोधकांचे टीकास्त्र
3

भाजपवर टीका करुन शहाजी बापू पाटील फसले? चौकशीचा ससेमिरा अन् विरोधकांचे टीकास्त्र

Nagarparishad Election Result: मोठी बातमी! 2 डिसेंबरची मतमोजणी रद्द, निकालाची नवीन तारीख जाहीर, हायकोर्टाचा मोठा निर्णय
4

Nagarparishad Election Result: मोठी बातमी! 2 डिसेंबरची मतमोजणी रद्द, निकालाची नवीन तारीख जाहीर, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.