Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weather Update : मुंबईत गुलाबी थंडी ‘एक्झिट’च्या दिशेने, कुलाबा–सांताक्रूझमध्ये किमान तापमानात वाढ

Mumbai Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण कमी जाणवू लागले आहे. परिणामी कमाल आणि किमान तापमानात वाढ होताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात हवामान अंशतः ढगाळ राहील.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 02, 2026 | 11:16 AM
मुंबईत गुलाबी थंडी ‘एक्झिट’च्या दिशेने, कुलाबा–सांताक्रूझमध्ये किमान तापमानात वाढ

मुंबईत गुलाबी थंडी ‘एक्झिट’च्या दिशेने, कुलाबा–सांताक्रूझमध्ये किमान तापमानात वाढ

Follow Us
Close
Follow Us:
  • कुलाबा–सांताक्रूझमध्ये किमान तापमानात वाढ
  • आर्द्रतेमुळे हिवाळ्याचा प्रभाव कमी
  • गार हवा कमी होत दमट वातावरण जाणवू लागले
राम खांदारे, मुंबई: मुंबईत यंदाच्या हिवाळ्याची अखेरची पानं उलटू लागल्याचे संकेत मिळू लागले आहेत. कुलाबा आणि सांताक्रूझ वेधशाळांमधील कमाल–किमान तापमानातील वाढ आणि वाढती आर्द्रता पाहता, शहरात थंडीचा प्रभाव लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. मुंबईत थंडीची ‘एक्झिट’ आहे का असे वाटत असतानाच भारतीय हवामानशास्त्र विभाग मुंबई कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या मते थंडी जाणार नसून तूर्तास वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे थंडी जाणवत नाहीय. आणखी चार ते पाच दिवसांनी पुन्हा दोन्ही तापमान खाली येणार असल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

दरम्यान कुलाबा येथे कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस तर शनिवारी पहाटे किमान तापमान २२.८ अंशांवर नोंदविण्यात आले असून आर्द्रता तब्बल ९० टक्क्यांपर्यंत नोंदवली गेली. परिणामी, सकाळ–संध्याकाळची गार हवा कमी होत दमट वातावरण जाणवू लागले असून घर व कार्यालयांतील पंखे आणि एसी पुन्हा सुरू झाल्याचे चित्र आहे. तर सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३३.४ अंश सेल्सिअस इतके उच्चांकावर गेले असून शनिवारी पहाटे किमान तापमान २१.७ अंशांवर स्थिरावले आहे. येथेही आर्द्रता ९१ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने हिवाळ्यात अपेक्षित असलेली गारठ्याची भावना जवळपास नाहीशी झाली आहे. यंदा हिवाळ्यात अपेक्षित असलेले १८–१९ अंशांपर्यंत घसरणारे किमान तापमान फार काळ टिकले नाही.

भौमितिक आकारांतून आयुष्य मांडणारे ‘काळाघोडा’चे प्रवेशद्वार! प्लास्टिकचा पुनर्वापर करत पर्यावरणीय संदेश

30 जानेवारीच्या पहाटे मुंबई शहरात किमान तापमान २२.८ अंश तर उपनगरात २२.० अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. मात्र, भारतीय हवामानशास्त्र विभागाने थंडी पूर्णपणे संपली असे ठामपणे म्हणता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. एका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पश्चिमी विक्षोभ (वेस्टर्न डिस्टर्बन्स) पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असून ४ ते ६ फेब्रुवारीदरम्यान किमान तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअसपर्यंत किंचित वाढू शकते. मात्र २ फेब्रुवारीच्या सुमारास तापमानात थोडी घट होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे सध्या तरी मुंबईत हिवाळ्याची पूर्ण एक्झिट झाली आहे, असे म्हणता येणार नाही. तरीही वाढती आर्द्रता आणि किमान तापमानातील सातत्यपूर्ण वाढ पाहता, मुंबईकरांसाठी थंडीचा प्रभाव आता शेवटच्या टप्प्यात असल्याचे स्पष्ट होत आहे.

वेस्टर्न डिस्टर्बन्स थंडीच्या ‘एक्झिट’ला अडथळा ठरतोय का?

उत्तर भारतात सक्रिय होणाऱ्या वेस्टरन डिस्टर्बन्सचा अप्रत्यक्ष परिणाम मुंबईसह पश्चिम किनारपट्टीवर जाणवतो. या प्रणालीमुळे उत्तर भारतात ढगाळ वातावरण व पर्जन्यस्थिती निर्माण होते, परिणामी थंड वारे दक्षिणेकडे सरकतात. त्यामुळे मुंबईत किमान तापमानात तात्पुरती घट किंवा स्थिरता येऊ शकते. फेब्रुवारीच्या सुरुवातीला अपेक्षित असलेला हा प्रभाव हिवाळ्याच्या पूर्ण एक्झिटला काही दिवसांचा अडथळा निर्माण करू शकतो. मात्र, आर्द्रतेत वाढ झाल्याने गारठ्याची तीव्रता कमीच राहण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis on NCP Merger:  राष्ट्रवादीने आमच्याशी चर्चा करावी…; विलीनीकरणाच्या चर्चांवर फडणवीस स्पष्टचं बोलले

Web Title: Mumbai weather update marathi increase in maximumminimum temperatures at colaba and santa cruz observatories

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 11:16 AM

Topics:  

  • imd
  • maharashtra
  • Weather Update

संबंधित बातम्या

Weather Update: नागरिकांनो सावधान! २२ ते २५ एप्रिल दरम्यान ‘या’ जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’; प्रशासन सतर्क
1

Weather Update: नागरिकांनो सावधान! २२ ते २५ एप्रिल दरम्यान ‘या’ जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’; प्रशासन सतर्क

Dharashiv News : मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या संपाचा धाराशिवमध्ये परिणाम; शासकीय कामकाज ठप्प
2

Dharashiv News : मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या संपाचा धाराशिवमध्ये परिणाम; शासकीय कामकाज ठप्प

Pratap Sarnaik: रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य; अंमलबजावणीसाठी सरकारची हालचाल, मंत्री प्रताप सरनाईक यांची बैठक
3

Pratap Sarnaik: रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य; अंमलबजावणीसाठी सरकारची हालचाल, मंत्री प्रताप सरनाईक यांची बैठक

Dharashiv News: धारूर शिवारात अवकाळीचा तडाखा; आमदार कैलास पाटील यांच्याकडून नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी
4

Dharashiv News: धारूर शिवारात अवकाळीचा तडाखा; आमदार कैलास पाटील यांच्याकडून नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.