Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाबळेश्वरमध्ये जाणवतीये थंडीची लाट; सातारा जिल्ह्यात पारा चांगलाच घसरला…

मुंबईमध्ये दोनच दिवसांपूर्वी सकाळी दाट धुक्याचा थर पाहायला मिळाला. मुंबईचे हवामान सूर्यप्रकाश आणि स्वच्छ राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शहरातील तापमान सध्या 28.95 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 12, 2024 | 08:37 AM
राज्यात थंडीचा जोर कायम; मध्य महाराष्ट्रसह 'या' भागांत पावसाचा अंदाज

राज्यात थंडीचा जोर कायम; मध्य महाराष्ट्रसह 'या' भागांत पावसाचा अंदाज

Follow Us
Close
Follow Us:

सातारा : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. थंडीची चाहूलही लागत आहे. त्यातच सातारा जिल्ह्यात तापमानाचा पारा पुन्हा घसरला आहे. महाबळेश्वरमध्ये 15.4 अंश सेल्सिअस तर साताऱ्यात 16.1 अंश सेल्सिअस इतके तापमान खाली आले आहे. दरम्यान, महाबळेश्वरमध्ये गुलाबी थंडीची मजा घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.

हेदेखील वाचा : Sharad Pawar : ‘म्हणून मोदींना ते पाप करता आलं नाही’: जामनेरमधून शरद पवारांची घणाघाती टीका

बाजारपेठमध्ये गर्दी फुलली असून, पर्यटक वेण्णा लेक बोटिंगचा देखील आनंद लूटत आहेत. दोन दिवसांपासून हवेत गारठा वाढला आहे. साताऱ्याचा पारा १६.१ अंशापर्यंत तर महाबळेश्वरचा पारा १५.४ अंशाखाली आल्याने हुडहुडी वाढली आहे. मुंबईतही कमाल तापमाना घट झाली असून, शहरात थंडीची चाहुल लागली आहे. दरम्यान, दिवाळी संपली असली तरी दिवाळीत वाजलेले फटाके आणि त्यामुळे निर्माण झालेले प्रदुषण मुंबई शहरात आजही कायम आहे. परिणामी, हवा गुणवत्ता निर्देशांक काहीसा धोकादायक स्थितीकडे वाटचाल करताना दिसत आहे.

मुंबईमध्ये दोनच दिवसांपूर्वी सकाळी दाट धुक्याचा थर पाहायला मिळाला. मुंबईचे हवामान सूर्यप्रकाश आणि स्वच्छ राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शहरातील तापमान सध्या २८.९५ अंश सेल्सिअस असून, कमाल तापमान ३०.४९ अंश सेल्सिअस आणि किमान २६.९९ अंश सेल्सिअसपर्यंत राहील, अशी शक्यता आहे.

हवेतील आर्द्रता पातळी ५० टक्के आहे आणि वारे ५० किमी/ताशी वेगाने वाहत आहेत. सूर्योदय ६:४३ वाजता होता आणि सूर्यास्त ६:०१ वाजता नियोजित आहे. प्राप्त माहितीनुसार, ११ नोव्हेंबर २०२४ रोजी सोमवारी मुंबईत तापमान २७.०६ अंश सेल्सिअस ते ३०३७ अंश सेल्सिअस दरम्यान राहिले.

मुंबईतील AQI 195

मुंबईतील एक्यूआय 195 असून, जो हवेची गुणवत्ता मध्यम असल्याचे दर्शवितो. मुले आणि वृद्धांसह श्वसनाच्या समस्या असलेल्या रहिवाशांना दीर्घकाळ घराबाहेर राहणे टाळण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

पारा @ 15.4 अंश सेल्सिअस

यंदा थंडीची तीव्रता वाढण्याची चिन्हे आहेत. दरवर्षी दसऱ्यानंतर थंडी पडू लागते आणि दिवाळीत थंडीचा कडाका जाणवतो. मात्र यावर्षी वातावरणातील बदल, लांबलेला परतीचा पाऊस यामुळे अभ्यंगस्नानाला थंडीची तीव्रता कमीच होती. दिवाळीच्या तोंडावर दोन दिवस हवेत गारठा जाणवला. मात्र, पुन्हा तापमानात वाढ झाली. सध्या पहाटेच्यावेळी थंडीने हुडहुडी भरत आहे.

हेदेखील वाचा : राज्यावर दुहेरी संकट! आज किमान तापमान 12 अंशांवर, 3 दिवस पाऊस आणि थंडीचं सावट

Web Title: Cold wave felt in mahabaleshwar nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2024 | 08:37 AM

Topics:  

  • Climate Change
  • Maharashtra Weather
  • maharashtra weather news

संबंधित बातम्या

शेती आणि संस्कृती फुलवणारा ‘होलोसीन’ काळ संपतोय? पृथ्वी आता विनाशाच्या उंबरठ्यावर
1

शेती आणि संस्कृती फुलवणारा ‘होलोसीन’ काळ संपतोय? पृथ्वी आता विनाशाच्या उंबरठ्यावर

राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; 2 एप्रिलपर्यंत…
2

राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; 2 एप्रिलपर्यंत…

अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादकांना मोठा फटका; आधीच मजुरांची टंचाई अन् आता पाऊस
3

अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादकांना मोठा फटका; आधीच मजुरांची टंचाई अन् आता पाऊस

काळजी घ्या ! राज्यातील अनेक भागांत उष्णतेचा बसतोय तडाखा; 2.50 लाखांपेक्षा अधिक उष्माघाताचे रुग्ण
4

काळजी घ्या ! राज्यातील अनेक भागांत उष्णतेचा बसतोय तडाखा; 2.50 लाखांपेक्षा अधिक उष्माघाताचे रुग्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.