Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“छत्रपती संभाजीनगर दंगलीमागे भाजपा आणि एमआयएमची मिलीभगत…”, चंद्रकांत खैरे यांचा गंभीर आरोप, काय म्हणाले खैरे?

ही दंगल घडवून आणली असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी (Chandrakant Khaire) केला आहे. तसेच पुढे बोलताना खैरे म्हणालेत की, “छत्रपती संभाजीनगर दंगलीमागे भाजपा आणि एमआयएमची मिलीभगत आहे”, यामुळं ऐन सणासुदीच्या तोंडावर दंगल घडवून आणली जात आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Mar 30, 2023 | 01:04 PM
“छत्रपती संभाजीनगर दंगलीमागे भाजपा आणि एमआयएमची मिलीभगत…”, चंद्रकांत खैरे यांचा गंभीर आरोप, काय म्हणाले खैरे?
Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर– रामनवमीच्या आदल्या दिवशी म्हणजे (बुधवारी) रात्री किराडपूर परिसरात दोन गटांत मोठी वाद झाला. संभाजीनगर (Sambhaji nagar) नामांतरावरुन शहरात गेल्या काही काळापासून निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम अखेरीस बुधवारी रात्री पाहायला मिळाला. रामनवमीच्या तयारीसाठी युवक एकत्र जमा झालेले होते. या वादातून काही वेळात दंगल पेटल्याची माहिती देण्यात येते आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले. मात्र अनियंत्रित झालेल्या जमावानं पोलिसांवरही (Police) हल्ला केल्याची माहिती आहे. पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करुन काही गाड्या जाळल्याचीही माहिती आहे. या दगडफेकीत दोन पोलिसांसह 6 जण जखमी झाल्याची माहिती आहे. रात्री उशिरा सुरु झालेला हा प्रकार पहाटे 3.30 वाजेपर्यंत सुरु होता. दरम्यान, यानंतर पोलीस एक्शन मोडमध्ये आले असून, पोलिसांना कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या राड्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंनी (Chandrakant Khaire) या राड्यावर काही गंभीर आरोप केले आहेत.

दंगलीमागे भाजपा-एमआयएमची मिलीभगत?

दरम्यान, ही दंगल घडवून आणली असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी (Chandrakant Khaire) केला आहे. तसेच पुढे बोलताना खैरे म्हणालेत की, “छत्रपती संभाजीनगर दंगलीमागे भाजपा आणि एमआयएमची मिलीभगत आहे”, यामुळं ऐन सणासुदीच्या तोंडावर दंगल घडवून आणली जात आहे. आज राम नवमी आहे, तर मुस्लीमांचा पवित्र रमजान महिना सुरु आहे. त्यामुळं ही दंगल घडवून आणण्यास भाजपा व एमआयएम जबाबदार असल्याचा गंभीर आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. तसेच इम्तियाज जलीलने नौटंकी करु नये असं देखील चंद्रकांत खैरेंनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

पोलिसांच्या कारवाईनंतर या परिसरात तणावपूर्ण शांतता असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. दरम्यान या सर्व घटनेवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. संभाजीनगरमध्ये घडलेली घटना दुर्दैवी आहे. आता तिथे शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु काही लोकं याठिकाणी भडकाऊ प्रतिक्रिया देत असून, परिस्थिती आणखी चिघळली पाहिजे यासाठी प्रयत्न करत असल्याचे फडणवीस म्हणाले आहे.

शांतता पाळण्याचं पोलिसांचे आवाहन…

दरम्यान, संभाजीनगरमध्ये काल रात्री नागरिक व पोलिसांमध्ये झालेला हा राड्यामुळं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच रामनवमीच्या दिवशी दंगल किंवा दोन गटात हाणामारी होऊ नये, यासाठी पोलीस सतर्क झाले आहेत. दरम्यान, छत्रपती संभाजीनंगर शहरात पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. सोशल मीडियावरील कोणत्याही धार्मिक भडकावू संदेशावर विश्वास ठेवू नका. किंवा त्याला बळी पडू नका, असं पोलीस आयुक्तांनी सर्वपक्षीयांना आवाहन केलं आहे. तसेच ज्यांनी हे कृत्य केलं त्यांना शोधून अटक करणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी म्हटलं आहे. तसेच अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असं पोलीस म्हणालेत.

वादाचे कारण काय?

रामनवमीच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. किराडपुऱ्यातही रामनवमीचा उत्साह होता. रात्री 11.30 च्या सुमारास किराडपुऱ्यातील राम मंदिराजवळ दोन गटांत वाद झाला. त्यातून बाचाबाची आणि शिविगाळ झआली. त्यानंतर घोषणाबाजी सुरु झाली. त्यानंतर एका गटानं मंदिरावर दगडफेक करण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे. काही जण या गोंधळात मंदिरात गेले, त्यांच्यावरही हल्ला करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.

Web Title: Collusion of bjp and mim behind chhatrapati sambhajinagar riots chandrakant khaire serious allegation what did khaire say

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2023 | 01:04 PM

Topics:  

  • BJP
  • Chandrakant Khaire

संबंधित बातम्या

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
1

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?
2

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब
3

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा
4

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.