Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कौतुकास्पद! एस. टी. सुरक्षारक्षकाची प्रामाणिकता; साडेतीन लाखांच्या लालसेवर माणुसकीचा विजय

एस टी कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणा दाखवत साडेतील लाखांच्यावर ऐवज मालकाला परत केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे एक प्रकारे माणुसकीचा विजय झाला आहे. नक्की काय घडले जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 01, 2025 | 12:28 PM
जालन्यातील महत्त्वाची घटना

जालन्यातील महत्त्वाची घटना

Follow Us
Close
Follow Us:
  • वैजापूर बसस्थानकातील घटनेने दिला संदेश
  • साडेतीन लाखाचा ऐवज केला परत 
  • एस.टी. सुरक्षकारक्षकाचा प्रामाणिकपणा 

वैजापूर-जालनाः आजच्या धावपळीच्या, गर्दीच्या आणि तितक्याच स्वकेंद्रित होत चाललेल्या जगात, ‘माणुसकी’ आणि ‘प्रामाणिकपणा’ हे शब्द केवळ पुस्तकातच उरलेत की काय? असा प्रश्न पडतो. पण याच जगात असे काही निस्वार्थ लोक आहेत, जे आपल्या साध्या पण खऱ्या कृतीतून माणुसकी अजूनही जिवंत असल्याचा ठाम विश्वास देतात. असाच एक थक्क करणारा आणि तितकाच अभिमानास्पद प्रसंग वैजापूर येथील एस.टी. बसस्थानकात घडला, जिथे एका सामान्य सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मोहावर मात करीत आपल्या अतुलनीय प्रामाणिकपणाचा परिचय दिला. एस. टी. सुरक्षा रक्षक बी. आर. तडवी यांनी तब्बल साडेतीन लक्ष रुपयांचे सोन्याचे दागिने असलेली एक बेवारस बॅग तिच्या मूळ मालकाला परत करून आदर्श निर्माण केला आहे.

२९ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास वैजापूर बसस्थानक परिसरात सुरक्षा रक्षक बी. आर. तडवी गस्त घालत होते. त्यावेळी बसस्थानकातील बाकावर एक बेवारस बंग त्यांच्या नजरेस पडली, संशयास्पद वस्तू समजून त्यांनी ती बंग तात्काळ उचलून एस.टी. नियंत्रक कार्यालयात जमा केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. दरम्यान, सुमारे दोन तासांनंतर प्रवासी गणेश देविदास जानराव हे बसस्थानकात आले आणि त्यांनी आपली बेंग हरवल्याचे सांगत चौकशी सुरू केली. त्यावेळी सुरक्षा रक्षक तडवी यांच्या लक्षात आले की, तीच बॅग त्यांनी नियंत्रक कार्यालयात जमा केली होती.

जालन्यात काँग्रेस पक्षाची ताकद वाढली! ‘या’ नेत्यांनी सपकाळांच्या उपस्थितीत केला प्रवेश

सोन्याचे दागिने, महत्वाच्या वस्तू केल्या परत

तत्काळ संबंधित प्रवाशाला एस.टी. नियंत्रकांच्या कार्यालयात नेले, तेथे ओळखा पडताळणीची प्रक्रिया पार पाडण्यात आली. प्रवासी जानराव यांनी बेंगेचे अचूक वर्णन दिल्याने ती त्यांचीच असल्याचे निश्चित झाले. या प्रामाणिक कृतीबद्दल वैजापूर एस.टी. आगाराचे प्रमुख किरण धनवटे यांनी सुरक्षारक्षक बी. आर. तडवी यांचे विशेष कौतुक केले. याप्रसंगी एस. टी. चे टी. आय. भदाणे, कोकाटे, गरुड, जाधव, गंगवाल, ठाकूर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

उपस्थित सर्वांनी तडवी याच्या कामगिरीचे अभिनंदन करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. या घटनेमुळे एस.टी. विभागातील कर्मचा-यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांकडूनही तडवी यांच्या प्रामाणिकतेबद्दल प्रशंसेचा वर्षाव होत आहे. आज ज्या काळात हरवलेली वस्तू मिळण्याची शक्यता कमी असते, त्या काळात बी. आर. तडवी यांनी दाखवलेला प्रामाणिकतेचा आदर्श समाजासाठी प्रेरणादायी आहे. एसटी आगाराच्या अधिका-यांच्या उपस्थितीत बंग उघडण्यात आली असता, त्यात तब्बल साडेतीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि अन्य काही महत्त्वाच्या वस्तू असल्याचे दिसून आले.

Jalna Crime: जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर 10 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक; शहरात खळबळ

Web Title: Commendable s t security guard s honesty humanity triumphs over greed of three and a half lakhs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 12:28 PM

Topics:  

  • Jalna
  • jalna news

संबंधित बातम्या

जालन्यात शेतकरी मेटाकुटीला,  परतीच्या पावसाची सरासरी 100 मि.मी. पेक्षा जास्त
1

जालन्यात शेतकरी मेटाकुटीला, परतीच्या पावसाची सरासरी 100 मि.मी. पेक्षा जास्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.