जालना: जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक. १० लाखांची लाच घेतांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. पालिकेच्या बांधकामाचे बिल अदा करण्याच्या बदल्यात कंत्राटदाराकडून लाच स्वीकारत असतांना एसीबीने कारवाई केली. या प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी त्यांच्या मोतीबाग येथील शासकीय निवासस्थानी झडती घेत आहेत. या कारवाईने सर्वांचे लक्ष लागले आहे.
काय प्रकरण?
प्रयथमिक माहितीनुसार, जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी बांधकामाचे बिल अदा करण्यासाठी कंत्राटदाराकडून १० लाखांची लाच घेतल्याची माहिती समोर आली आहे. महानगर पालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतल्याचे म्हंटले जात आहे. या प्रकरणात पालिका आयुक्तांच्या मोती बाग येथील शासकीय निवास स्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी घराची झडती घेत असून त्यांच्या विरोधात गुहा दाखल करण्याची कारवाई सुरु असल्याची माहिती आहे.
तक्रारदार कंत्राटदार
या प्रकरणात तक्रारदार हा कंत्राटदार होता. या कंत्राटदाराचे बिल अडकले होते. त्या बिलाच्या संदर्भात पालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी दहा लाखाची लाच मागितली. या संदर्भात कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात पालिका आयुक्त खांडेकर रंगेहात लाच स्विकारताना सापडले. तक्रारदाराकडून दहा लाख स्वीकारताना त्यांना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात अटक केली आहे. त्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या मोतीबाग येथे अधिाकारी झडती घेत असून पुढील कारवाई सुरु आहे.
जळगावात रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा, पोलिसांनी विधीसंघर्षित बालकासह ६ जणांना केलं जेरबंद
जळगाव जिल्ह्यातून मुक्ताईनगर व वरणगाव शिवारातील पेट्रोल पंपावर गेल्या आठवड्यात सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. विशेष म्हणजे हा पेट्रोल पंप केंद्रीयमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीचा असल्याने पोलिसांनी तातडीने आपली तपासाची चक्रे फिरवत सशस्त्र दोराड्याप्रकरणी पोलिसांनी आता सहा जणांची टोळी जेरबंद केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
९ ऑक्टोबर रोजी मुक्ताईनगर येथील रक्षा टोफ्युअल, कर्की फाटा येथील मनुभाई आशीर्वाद आणि वरणगावजवळील तळवेल फाटा येथील सय्यद पेट्रोल पंपावर बनदुकींचा धाक दाखवत दरोडा टाकण्यात आला होता. आरोपींनी रोख रक्कमसह मोबाईल आणि सीसीटीव्ही डीव्हीआर असा एकूण 1 लाख 33 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता जळगाव पोलिसांच्या गुन्हे शाखेने विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पथकांनी नाशिक व अकोला येथे छापे टाकून ६ जणांच्या टोळीला ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सचिन भालेराव, पंकज गायकवाड, हर्षल व देवेंद्र बावस्कर, प्रदुम्न विरघट आणि एक विधी संघर्षित बालक असे आहे. सध्या सर्व आरोपीची मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे.