जालन्यात एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. शेतीच्या कामासाठी शिवारात गेलेल्या शेतकरी कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शिवारात विद्युत तारेचा स्पर्श होऊन पित्यासह दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे.
वर्धा जिल्ह्यातही पाऊस बरसला आहे. जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. विजांच्या कडकडाटासह आणि वादळासह झालेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. ग्रामीण भागांमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले.
मी आता मुंबईत विजयाचा गुलाल घेऊनच जाणार. मी कधीही कोणतेही वाईट काम केले नाही. माझ्या विरोधात खोटं नाटक करून बदनामी करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. पण गरज पडल्यास जीव गेला तरी चालेल, मी समाजाशी गद्दारी करणार नाही
जालना जिल्ह्यातील धुळे-सोलापूर महामार्गावर बारसवाडा फाट्याजवळ रविवारी मध्यरात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली.
प्रामुख्याने येणाऱ्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना मुबलक दरात बी बियाणे खते उपलब्ध करून द्या तसेच शेतकऱ्यांच्या अडीअडचणीवर विशेष करून लक्ष द्यावे अशा सूचना यावेळी यांनी जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
या प्रकारामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. हा घोटाळा किती मोठा आहे आणि यामागे कोणकोण सामील आहेत, हे पुढील तपासातून स्पष्ट होणार आहे.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी बीड हत्या प्रकरणावरुन पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. वाल्मिक कराडला मारहाण झाल्याच्या प्रकरणावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या औरंगजेबाच्या कबर वादाला हिंसक वळण लागले आहे. सोमवारी (17 मार्च) संध्याकाळी नागपूरच्या महाल परिसरात दोन गटांमध्ये हिंसक हाणामारी झाली.
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वाळसा-वडाळा गावातील ज्ञानेश्वर भिका आहेर या 30 वर्षीय विवाहित व्यक्तीने लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.
राज्यामध्ये पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यावरुन त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.
बीड हत्या प्रकरणामुळे राजकारण तापले आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असला तरी देखील सहआरोपी करण्याची मागणी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.