जालना जिल्ह्यातील अंबड नगरपरिषद निवडणूक प्रचारासाठी झालेल्या सभेत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मतदारांना उज्ज्वल भविष्यासाठी कमळाचे बटन दाबण्याचे आवाहन केले.
विरोधात राहून लोकांचे प्रश्न सोडवता येत नाही, मोर्चे काढता येतात, आंदोलनं करता येतात. आता गेले तीन-चार वर्षे इथे अधिकारीच टिकत नाही. माझ्याकडे प्रत्येक अधिकारी तीन वर्षे टिकतो.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रशासनाच्या तयारीचा जिल्हाधिकारी रोहन घुगे व जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी धरणगाव येथे भेट देऊन यापुर्वीच आढावा घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान, पैठण यांच्या वतीने शुक्रवार (२८), शनिवार (२९) नोव्हेंबर रोजी पैठण तालुक्यातील आपेगाव येथे पहिले जिल्हा वारकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात…
अंबड नगरपालिका निवडणुकीत जुन्या निष्ठावंत भाजपाच्या कार्यकर्त्यांची नाराजी कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निष्ठावंतांना डावलले जात असल्याचा आरोप केला जात आहे.
प्रेमप्रकरणात अडथळा ठरत असल्याने वहिनीच्या मदतीने भावाने भावावर कुऱ्हाडीने वार करून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह गोणीत भरला. त्यात दगड टाकून तो मृतदेह दुचाकीवर नेऊन तलावातील पाण्यात फेकण्यात आला.
आज जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची व इच्छुक उमेदवारांची बैठक स्थानिक स्वराज्य निवडणूक प्रभारी व जालनाचे प्रभारी भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली आहे.
आमदार संतोष दानवे यांनी अधिकाऱ्यांना सोबत जाऊन तांदूळवाडी व जैनपूर कठोरा या भागात रविवारी पाहणी दौरा करून त्यांनी तातडीने पंचानामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर पैठण येथे महायुती तसेच महाविकास आघाडीमधील गोंधळ शिगेला पोहोचला आहे. तर काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून येत असल्याने यंदाची नगपपालिका निवडणूक चांगलीच रंगणार आहे.
जालन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस. परतीच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. खरीप पिकाचीही वाट लागली आहे. यंदाचा पाऊस बराच लांबला असून शेतकऱ्यांचे जीव मेटाकुटीला आले आहेत
एस टी कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणा दाखवत साडेतील लाखांच्यावर ऐवज मालकाला परत केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे एक प्रकारे माणुसकीचा विजय झाला आहे. नक्की काय घडले जाणून घ्या