Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangali News: आर. आर. पाटलांनी माझा केसाने गळा कापला; सिंचन घोटाळ्यावर भाष्य करत अजित पवारांचे गंभीर आरोप

अजित पवार गटाचे उमेदवार संजय काका पाटील यांच्यासाठी आज अजित पवार यांनी तासगावमध्ये सभा घेतली. या सभेत बोलताना अजित पवारांनी दिवंगत आर. आर. पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 29, 2024 | 04:46 PM
Sangali News: आर. आर. पाटलांनी माझा केसाने गळा कापला; सिंचन घोटाळ्यावर भाष्य करत अजित पवारांचे गंभीर आरोप
Follow Us
Close
Follow Us:

सांगली: गेल्या काही वर्षांत सिंचन घोटाळ्यावरून विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अनेकदा गंभीर आरोप झाले. चौकशीचा ससेमिराही त्यांच्या मागे लागला, अनेकदा अडचणीतही आले. पण अजित पवारांनी या सिंचन घोटाळ्याचा उल्लेख करत आता दिवंगत माजी गृहमंत्री आरा. आर. पाटील यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत. सांगलीच्या तासगावमध्ये बोलताना अजित पवारांनी सिंचन घोटाळ्यासंबंधीच्या आरोपांवर भाष्य केलं आहे. आर. आर. पाटील यांनी केसाने माझा गळा कापला. असा आरोप अजित पवार यांनी केला आहे.

अजित पवार गटाचे उमेदवार संजय काका पाटील यांच्यासाठी आज अजित पवार यांनी तासगावमध्ये सभा घेतली. या सभेत बोलताना अजित पवारांनी दिवंगत आर. आर. पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.तासगावच्या सभेत बोलताना अजित पवार म्हणाले, ” सिंचन घोटाळ्यासंबंधी माझ्यावर 70 हजार कोटी रुपयांचे आरोप झाले. आरोप झाल्यावर कारवाई करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे फाईल गेली. त्यावेळी आर. आर पाटील यांनी माझी खुली चौकशी करण्याचे आदेश देत फाईल सही केली. पण त्यानंतर सरकार गेलं, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. पण राज्यपालांनी माझ्या त्या फाईलवर सही केली नाही. 2014 मध्ये भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री म्हणून माझ्यावर कारवाई करण्यासाठी फाईलवर सही केली.

हेही वाचा: Bus Accident : सुसाट बसची पुलाला धडक; १० प्रवाशांचा जागीच मृत्यू, ३० जण गंभीर जखमी

काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मला त्यांच्या बंगल्यावर बोलवून आर. आर. पाटील यांनीच तुमच्या चौकशीसाठी आदेश दिले, आणि फाईलवर सही केल्याचे दाखवले. ज्यांच्यावर एवढा विश्वास ठेवला, सहकार्य केलं. त्याच आर. आर. पाटील यांनी माझा केसाने गळा कापला होता, असा गंभीर आरोप अजित पवार यांनी केला.

धक्कादायक म्हणजे मुंबईत दहशतवादी हल्ले झाले. त्यावरही “बडे बडे शहरो मे छोटे-छोटे हातसे होते रहते है” असही त्यांनी म्हटलं होतं. आर. आर. पाटील यांना कोणीतरी राजीनाामा द्यायला सांगितला. तर त्यांनी राजीनामा देऊन थेट अंजनी गाठले. त्यांच्या राजीनाम्याची मला कल्पनाच दिली नाही. कितीदातरी त्यांना तंबाखू न खाण्याचा सल्ला दिला पण माझ्या माघारी ते हळूच तंबाखू खायचे, असंही अजित पवारांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा: क्रिकेटवरून एमएस धोनी आणि पत्नीमध्ये जुंपले भांडण; थर्ड अंपायरच्या निर्णयाने निवाडा; पाहा

2014 मध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल लागतात न लागतात तोच साहेबांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. विचारधारा सोडून भाजपला बिनशर्थ पाठिंबा कसा काय द्यायचा असं विचारलं तर, ” सरकार बदललं आहे, मदत केली पाहिजे, 1999मध्येही असंच झालं सोनिया गांधी यांना विरोध करायचा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. पण विधानसभा निवडणुका होताच, त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. तेव्हाही, सरकारमध्ये गेल्याशिवाय कामे होत नाहीत, असं म्हणाले, मग मी गेलो तर काय झालं, माझं काय चुकलं, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Web Title: Commenting on the irrigation scam ajit pawar makes serious allegations against r r patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2024 | 04:46 PM

Topics:  

  • ajit pawar

संबंधित बातम्या

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
1

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू : उपमुख्यमंत्री अजित पवार
2

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू : उपमुख्यमंत्री अजित पवार

सूरज चव्हाण ‘रिटर्न’! फ्री स्टाईल हाणामारीनंतर थेट मिळाली पदोन्नती; अजित पवारांच्या निर्णयावर टीका
3

सूरज चव्हाण ‘रिटर्न’! फ्री स्टाईल हाणामारीनंतर थेट मिळाली पदोन्नती; अजित पवारांच्या निर्णयावर टीका

Ajit Pawar on Meat ban: १५ ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी…! अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले श्रद्धेचा प्रश्न असल्यास..
4

Ajit Pawar on Meat ban: १५ ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी…! अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले श्रद्धेचा प्रश्न असल्यास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.