
Conflict erupts between farmers and traders over price of papaya crop Jalgaon News
Jalgaon News: शहादा : पपई उत्पादक शेतकरी आणि व्यापारी यांच्या बैठकीत ठरलेल्या आठ रुपये ११ पैसे या दराप्रमाणे केवळ वरचे ११ पैसे अधिकचा भाव व्यापाऱ्यांनी नाकारला आहे. यामुळे शहादा तालुक्यात व्यापारी आणि पपई उत्पादक शेतकरी यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली आहे. परराज्यात पपईला २२ रुपये किलोचा दर असताना शहाद्यात ठरलेल्या कमी दराच्या प्रति आठ ऐवजी १४ रुपये किलोचा दर मिळाला पाहिजे यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.
मंत्री जयकुमार रावल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन या संदर्भातला तोडगा काढण्याची सूचना केली असली तरी देखील शहाद्यात शेतकऱ्यांनी पपई तोड बंदीचा निर्णय घोषित केला आहे. यामुळे जळगावमध्ये पपईच्या भावावरुन वाद पेटला आहे. जिल्ह्यातील पपईच्या खरेदीसाठी दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि पंजाब राज्यातील व्यापारी सध्या दाखल होत आहेत. या व्यापाऱ्यांनी ११ नोव्हेंबर रोजी पपई दर नियंत्रण समितीसोबत घेतलेल्या बैठकीत ८ रुपये ११ पैसे प्रतिकिलो दर देण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु १५ नोव्हेंबर रोजी दुसऱ्या फेरीतील चर्चेतून दर कमी करण्याची मागणी
केली होती.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पपईच्या दरामधील वरचे ११ पैसे नाकारले तालुक्यात पपई तोड बंद, लवकर तोडगा काढण्याची मागणी पपई दरांवरून शहाद्यात संघर्ष पेटला आहे. पणनमंत्री रावल यांची भेट घेत शेतकऱ्यांनी समस्या मांडली. पपई दरांचा तिढा सुटावा यासाठी शेतकऱ्यांनी रविवारी (दि.१६ नोव्हेंबर) रोजी पणनमंत्री जयकुमार रावल यांची भेट घेत समस्या मांडली होती. त्यावर मार्ग काढत जयकुमार रावल यांनी जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांना सोमवारी दुपारी शेतकरी व व्यापारी यांची बैठक घेत दर निश्चिती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे सोमवारी पपईचे दर निश्चित होणार की संघर्ष पुन्हा वाढणार याकडे लक्ष लागून आहे.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
पणनमंत्री रावल यांच्या सूचनेनुसार शेतकरी आणि व्यापारी यांची बैठक नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी दुपारी दोन वाजता होणार आहे. पपई उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने भाऊभाई पाटील, डॉ. प्रफुल्ल पाटील, सागर इंदानी, गौतम पाटील, संदीप पाटील, समाधान पाटील आदी पपई दर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पणनमंत्री जयकुमार रावल यांना निवेदन दिले होते. बैठकीत जिल्ह्यातील पपई उत्पादक उपस्थित राहणार असल्याची माहिती पपई दर नियंत्रण समितीच्यावतीने कळविण्यात आले आहे.
चार दिवसातच व्यापारीवर्गाने बदलला निर्णय
भारतात पपईची लागवडीत महाराष्ट्र तिसरा आहे. नंदुरबार जिल्ह्यात राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे पपई लागवडीचे क्षेत्र आहे. यंदा साडेसहा हजार एकरावर पपईची लागवड करण्यात आली आहे. या पपईचे उत्पादन निघण्यास प्रारंभ झाला असून, दरावरुन शेतकरी आणि व्यापारी यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे.