Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राहुल गांधी करणार हरि नामाचा गजर? शरद पवारांसोबत पायी करणार आषाढी वारी

राज्यामध्ये आषाढी वारी लवकरच होणार आहे. त्यामध्ये लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी हे देखील सामील होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 26, 2024 | 03:45 PM
आषाढी वारीमध्ये कॉंग्रेस नेते राहुल गांधी सामील होणार असल्याच्या चर्चा

आषाढी वारीमध्ये कॉंग्रेस नेते राहुल गांधी सामील होणार असल्याच्या चर्चा

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राज्यामध्ये लवकरच आषाढी वारी सुरु आहे. वैष्णवांच्या या मेळ्यासाठी राज्यभरामध्ये जोरदार तयारी केली जात आहे. देहू आणि आळंदीमध्ये प्रस्थानाची तयारी सुरु असून रथ व पालखी सजवल्या जात आहेत. दरम्यान, राज्यामध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका देखील होणार आहेत. त्यामुळे अनेक राजकारणी वारीमध्ये सहभाग घेणार आहे. जेष्ठ नेते शरद पवार देखील वारीमध्ये सहभाग घेणार आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेस नेते राहुल गांधी देखील वारीमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

राहुल गांधींना वारीत सामील होण्याची विनंती

महाराष्ट्रातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना आषाढी वारीमध्ये सहभागी होण्याची विनंती केली आहे. राज्यातील वारकरी संप्रदायासाठी हा अनोखा सोहळा असल्याने त्यामध्ये सामील व्हावे अशी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेससाठी ही महत्त्वाची संधी असणार आहे. त्यामुळे पदयात्रेनंतर राहुल गांधी यांनी पायी आषाढी वारीमध्ये सहभागी होण्याची विनंती केली आहे. त्यामुळे आता राहुल गांधी खरोखरच पंढरीच्या वारीत चालणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. राहुल गांधी हे 13 किंवा 14 जुलै रोजी पंढरपुरात येऊन विठुरायाचे दर्शन घेणार आहेत. याबाबत काँग्रेसच्या एका जेष्ठ नेत्याने दुजोरा देखील दिला आहे. दर्शनाबरोबर वारीमध्ये सहभागी होण्याची विनंती करण्यात येणार आहे.

शरद पवार पायी वारीत सहभागी होणार

दरवर्षी  आषाढी पालखी सोहळ्यात ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ हा उपक्रम राबवण्यात येतो. यामध्ये साहित्यिक, विचारवंत, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कलावंत यांचा या वारीत सहभाग असतो. यंदा शरद पवार या वारीत सहभागी होणार आहेत. बारामती ते इंदापूरच्या सणसरपर्यंतचे तब्बल 17 किलोमीटरचे अंतर शरद पवार पायी चालणार आहेत. संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात 7 जुलै रोजी ही मंडळी बारामती ते सणसर हे अंतर चालणार आहेत. शरद पवार यांच्यासोबत राहुल गांधी देखील वारीमध्ये सहभागी झाले तर महाविकास आघाडीसाठी हे मोठे शक्तीप्रदर्शन ठरु शकते.

Web Title: Congress leader rahul gandhi ashadhi vari palkhi sohala 2024 and walk with sharad pawar nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2024 | 03:45 PM

Topics:  

  • Palkhi Sohala 2024
  • Saint Tukaram Maharaj Palkhi

संबंधित बातम्या

तुकोबा पालखीचे आळंदीत उत्साहात स्वागत; फटाक्यांची आतिषबाजी, परिसर झाला भक्तिमय
1

तुकोबा पालखीचे आळंदीत उत्साहात स्वागत; फटाक्यांची आतिषबाजी, परिसर झाला भक्तिमय

Ashadhi Wari : पंढरीच्या वारीचा ‘असा’ आहे इतिहास; आळंदीहून वारीची परंपरा कशी झाली सुरु ?
2

Ashadhi Wari : पंढरीच्या वारीचा ‘असा’ आहे इतिहास; आळंदीहून वारीची परंपरा कशी झाली सुरु ?

Ashadhi Wari 2025: ‘ज्ञानोबा तुकाराम’चा जयघोष; श्री संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
3

Ashadhi Wari 2025: ‘ज्ञानोबा तुकाराम’चा जयघोष; श्री संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

पाऊले चालती पंढरीची वाट! जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्या प्रस्थान…
4

पाऊले चालती पंढरीची वाट! जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्या प्रस्थान…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.