Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nana Patole : ‘ब्लू फिल्मचं काम चालणारी बदलापूरची ती शाळा RSS शी संबंधित’ : नाना पटोलेंचा गंभीर आरोप

बदलापुराता मुलींवर अत्याचार झाले त्या शाळेत ब्ल्यू फिल्म बनवल्या जात होत्या, असा गंभीर आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज नांदेडमध्ये केला.

  • By संदीप गावडे
Updated On: Nov 08, 2024 | 08:41 PM
'ब्लू फिल्मचं काम चालणारी बदलापूरची ती शाळा RSS शी संबंधित' : नाना पटोलेंचा गंभीर आरोप

'ब्लू फिल्मचं काम चालणारी बदलापूरची ती शाळा RSS शी संबंधित' : नाना पटोलेंचा गंभीर आरोप

Follow Us
Close
Follow Us:

विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्याआधी काही दिवस बदलापूरच्या एका नामांकीत शाळेत दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाला होता. त्याचे पडसाद राज्यभर उमटले होते. आता निवडणुकीतही महाविकास आघाडीने हा मुद्दा पुन्हा उपस्थित केला असून ज्या शाळेत मुलींवर अत्याचार झाले त्या शाळेत ब्ल्यू फिल्म बनवल्या जात होत्या, असा गंभीर आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज नांदेडमध्ये केला.

हेही वाचा-Maharashtra Election 2024: महाराष्ट्राला डावलून गुजरातच्या कांद्यांच्या निर्यातीला प्राधान्य का? काँग्रेसचा मोदींना खडा सवाल

महायुती सरकारच्या काळातील राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर बोलताना, नाना पटोलेंनी बदलापूरमधील शाळेत घडलेल्या प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. बदलापूरमधील शाळेत ‘ब्ल्यू फिल्म’ तयार केल्या जायच्या असा दावा त्यांनी केला आहे. तसेच या शाळेत अवयव विक्रीचं काम देखिल चालायचं आणि ती शाळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

नाना पटोले नक्की काय म्हणाले?

बदलापूरमधील त्या नामांकीत शाळेत लहान मुलींच्या अश्लील चित्रफिती बनवल्या जात होत्या आणि अवयव विक्रीही केली जात असे. बदलापूरमधील ही शाळा आरएसएसशी संबंधित असल्याने सरकारनं या शाळेवर मेहेरबानी केली आहे. बदलापुरातील या शाळेत केवळ चार-पाच वर्षांच्या दोन मुलींवरच नाही तर अनेक मुलींवर अत्याचार झाले आहेत. न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देखिल दिले आहेत. मात्र राज्य सरकारने शाळा आरएसएसशी संबंधित असल्याने संचालक मंडळावर कारवाई केली नाही. माहितीच्या अधिकारातून एका व्यक्तीने माहिती मागितली आहे. ब्ल्यू फिल्म आणि अवयव विक्रीसंदर्भात एक जनहित याचिका दाखल करण्यात आल्याचं पटोलेंनी सांगितलं.

हेही वाचा–Ajit Pawar : ‘… ते तर आता शक्यच नाही’; लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांचं मोठं विधान

विधानसभा निवडणुकीच्या आचासंहिता लागण्याआधी बदलापूरमधील एका नामांकीत शाळेत दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाले होते. या घटनेने महाराष्ट्र हादरला होता पीडित मुलीचे कुटुंबीय तक्रार देण्यासाठी गेले होत मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यात विलंब केला. त्यामुळे आंदोलनाचा भडका उडाला होता.  बदलापूरमध्ये उग्र आंदोलन छेडण्यात आलं. बदलापूर स्टेशनवर चक्काजाम करण्यात आल्यामुळे मुंबईच्या लोकलसेवा कोलमडली होती.

आरोपीला फाशी देण्याची मागणी केली जात होती. दरम्यान काही दिवसांपूर्वी पोलीस आरोपीला कोर्टात हजर करण्यासाठी घेऊन जात असताना पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांवर गोळीबार केला. यात त्याचा एन्काऊंट झाला. दरम्यान आज नाना पटोले यांनी निवडणूक प्रचारात सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. आता भाजप आणि महायुती यालाी काय उत्तर देणार हे महत्त्वाचं आहे.

 

Web Title: Congress maharashtra chief nana patole serious allegation on badlapur case school on mahayuti in assembly election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2024 | 08:41 PM

Topics:  

  • Badlapur case
  • Maharashtra Assembly Elections 2024
  • Nana patole

संबंधित बातम्या

Sharad Pawar: विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची ऑफर; शरद पवारांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
1

Sharad Pawar: विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची ऑफर; शरद पवारांच्या दाव्याने राजकारणात खळबळ

Devendra Fadnavis:  “ना हनी आहे…”; फडणवीसांनी नाकारले ‘हनी ट्रॅप’चे प्रकरण; म्हणाले, “नाना भाऊ नीट पुरावे…”
2

Devendra Fadnavis: “ना हनी आहे…”; फडणवीसांनी नाकारले ‘हनी ट्रॅप’चे प्रकरण; म्हणाले, “नाना भाऊ नीट पुरावे…”

“हनी ट्रॅपमध्ये महाराष्ट्रातले मंत्री, अधिकारी”; नाना पटोलेंच्या दाव्याने खळबळ, थेट पेन ड्राइव्ह दाखवला
3

“हनी ट्रॅपमध्ये महाराष्ट्रातले मंत्री, अधिकारी”; नाना पटोलेंच्या दाव्याने खळबळ, थेट पेन ड्राइव्ह दाखवला

शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला, तर निलंबनाचे…; पटोलेंनी ठणकावून सांगितलं
4

शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला, तर निलंबनाचे…; पटोलेंनी ठणकावून सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.