
Congress workers guard EVM strong room 24 hours after local body elections
Local Body Elections : देगलूर : देगलूर नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक दि. २ डिसेंबर रोजी शांततेत पार पडली. मतदान प्रक्रियेनंतर सर्व उमेदवार व मतदार आता मतमोजणीची आतुरतेने वाट पाहात आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने मात्र ईव्हीएम सुरक्षेबाबत विशेष खबरदारी घेतली आहे. शहरातील उपजिल्हाधिकारी कार्यालयात ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम स्ट्रॉगरूमच्या बाहेर काँग्रेस पदाधिकारी दिवस-रात्र पहारा देताना दिसत आहेत.
यंदाच्या नगरपरिषद निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील काही नगरपरिषदांची निवडणूक पुढे ढकलल्यामुळे सर्व नगरपरिषदांची मतमोजणी २१ डिसेंबर २०२५ रोजी एकत्रित ठेवण्यात आली आहे. निकालाची तारीख लांबणीवर गेल्याने निकालात छेडछाड तर होणार नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे. या मुळे राजकीय पक्ष पूर्ण प्रयत्न करत आहेत. प्रशासनाकडून EVM स्ट्राँगरूमच्या सुरक्षेची पूर्ण तयारी केली जाते. लष्कर आणि पोलिसांचा पहारा देखील असतो. त्याचबरोबर सीसीटीव्ही बसवले जातात. मात्र राजकीय पक्षाकडून कोणतीही रिक्स नको म्हणून पहारा दिला जात आहे. देगलूरमध्ये देखील हेच चित्र असून कॉंग्रेस पक्षाकडून पहारा दिला जात आहे.
हे देखील वाचा : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ‘या’ दिवशी पाणीपुरवठा बंद; उरणमध्येही होणार कपात, वाचा सविस्तर
स्ट्राँगरूमच्या सुरक्षेबाबत उमेदवार व कार्यकत्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. जीव तोडून प्रचार केल्यानंतर आणि अनेक वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पार पडल्या आहेत. यामुळे उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. याच कारणाने देगलूर शहरातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी ईव्हीएम स्ट्रॉगरूमसमोर थेट ‘पहारा आंदोलन’ सुरू केले आहे. कडाक्याच्या थंडीतही काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते सतरंज्या अंधरून, चादरी घेऊन परिसरात तंबू ठोकून बसले आहेत.
हे देखील वाचा : पवार कुटुंबामध्ये झाले मनोमीलन? वाढदिवसाच्या Pre-Dinner मध्ये काका पुतण्या दिसले एकत्र
कार्यकर्त्यांची वर्दळ
रात्र-दिवस आळीपाळीने पहारा देत स्ट्रॉगरुप्मवर लक्ष ठेवले जात आहे. यामध्ये माजी नगरसेवक रोख मीरा मोहियोडीन, माजी नगरसेवक रोख महमुद भाई, शेख मुजमिल, विकास नरचागे, अमोल यशगवार, फसद देशमुख आदी पदाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग आहे.या परिस्थितीमुळे स्ट्रॉगरूमजवळ नेहमीच कार्यकत्यांची वर्दळ दिसत आहे. काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे म्हणणे असे की, “मतमोजणीपर्यंत ईव्हीएम पूर्ण सुरक्षेत राहणे अत्यंत महत्त्वाचे असून पारदर्शकतेसाठी हा पहारा आवश्यक देगलूरमध्ये राजकीय वातावरण चांगलेच आहे. “एकूणच, मतमोजणीच्या तारखेपर्यंत तापले असून काँग्रेसचा हा २४ तासांचा पहारा चर्चेचा विषय ठरत आहे. उमेदवार व कार्यकल्पांमध्ये निर्माण झाली आहे. याच कारणाने देगलूर शहरातील काँग्रेस पदाधिकान्यांनी ईव्हीएम स्ट्रॉगस्मसमोर थेट ‘पहारा आंदोलन सुरू केले आहे. कडाक्याच्या थंडीतही काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते सतरंज्या अंधरून, चादरी घेऊन परिसरात तंबू ठोकून बसले आहेत.