Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कल्याण रिंग रोडची उभारणी प्रगतीपथावर! प्रकल्पातील चार टप्प्यांचे काम पूर्ण

कल्याण रिंग रोड प्रकल्पाची उभारणी केली जात आहे. या प्रकल्प एकूण 8 टप्प्यांमध्ये पूर्ण केला जाणार आहे. या प्रकल्पाच्या सद्यस्थितिचा आढावा घेण्यासाठी नुकतीच एमएमआरडीए मुख्यालयात एक महत्वाची बैठक पार पडली. प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन देखील जलदगतीने करण्यात यावे आणि उर्वरित टप्प्यांचे काम जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना या बैठकीत खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिल्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 17, 2024 | 02:57 PM
खासदार श्रीकांत शिंदेंनी घेतला कल्याण रिंग रोड प्रकल्पाचा आढावा

खासदार श्रीकांत शिंदेंनी घेतला कल्याण रिंग रोड प्रकल्पाचा आढावा

Follow Us
Follow Us:

कल्याण – डोंबिवली आणि टिटवाळा या दोन्ही शहरांतील अंतर केवळ १५ ते २० मिनिटांत गाठता यावे यासाठी कल्याण रिंग रोड प्रकल्पाची उभारणी केली जात आहे. हा प्रकल्प एकूण ८ टप्प्यांमध्ये पूर्ण केला जाणार आहे. यापैकी टप्पा चार ते सात ( दुर्गाडी ब्रिज ते एसएच ३५-४० रोड जंक्शन ) अशा चार टप्प्यांचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे दुर्गाडी ब्रिज ते एसएच ३५-४० रोड जंक्शन हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या सर्व कामाचा आढावा घेण्यासाठी आज कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत एमएमआरडीए मुख्यालयात महत्वाची बैठक पार पडली. उर्वरित टप्प्यांचे काम देखील जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना या बैठकीत खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिल्या आहेत.

प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन देखील जलदगतीने करण्यात यावे, असे देखील खासदार डॉ.शिंदे यांनी या बैठकीवेळी सांगितलं. कल्याण लोकसभा मतदारसंघातील शहरी आणि ग्रामीण भागाच्या वाहतुकीला अधिक गती प्राप्त करून देणारा कल्याण रिंग रोड हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या मार्गाच्या उभारणीनंतर कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाहतुकीला एक नवा आयाम प्राप्त होणार आहे. हा प्रकल्प एकूण 8 टप्प्यांमध्ये पूर्ण केला जाणार आहे. यापैकी टप्पा चार ते सात ( दुर्गाडी ब्रिज ते एसएच ३५-४० रोड जंक्शन ) अशा चार टप्प्यांचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाच्या सद्यस्थितिचा आढावा घेण्यासाठी नुकतीच एमएमआरडीए मुख्यालयात एक महत्वाची बैठक पार पडली.

हा प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी, कल्याण डोंबिवली महानरपालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीवेळी खासदार डॉ.शिंदे यांनी दिल्या आहेत. कल्याण रिंग रोड प्रकल्पाची उभारणी ८ टप्प्यांमध्ये केली जाणार आहे.

यापैकी टप्पा – ४ (दुर्गाडी ब्रिज ते गांधारे ब्रिज), टप्पा – ५ (गांधारी ब्रिज ते मांडा जंक्शन), टप्पा – ६ (मांडा जंक्शन ते टिटवाळा जंक्शन), टप्पा – ७ (टिटवाळा जंक्शन ते एसएच ३५-४० रोड जंक्शन) या टप्प्यांचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे हे रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. टप्पा – ३ (मोठा गाव ब्रिज ते गोविंदवाडी रोड) या रस्त्याचे काम २०२६ पर्यंत ते पूर्ण करण्याचे ध्येय संबंधित अधिकाऱ्यांनी ठेवले आहे. तसेच टप्पा – १ (हेदुटणे ते शिळ रोड) आणि टप्पा – २ (शीळ रोड ते मोठागाव ब्रीज) या मार्गाच्या उभारणीसाठी लागणाऱ्या जागेचे भूसंपादन करून हे काम देखील २०२६ पर्यंत पूर्ण केलं जाणार आहे. त्यामुळे २०२६ पर्यंत संपूर्ण कल्याण रिंग रोड प्रकल्याची उभराणी पूर्ण होईल.

कल्याण रोड रिंग प्रकल्पाची उभारणी पूर्ण झाल्यानंतर काटई – टिटवाळा हे एक तासाचे अंतर अवघ्या १५ ते २० मिनिटांवर येणार आहे. अवजड वाहनांची वाहतूक देखील या मार्गावरून होणार आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर भार येणार नाही. कल्याण रोड रिंग प्रकल्पामुळे शहरांतर्गत वाहतुकीला गती मिळेल.

Web Title: Construction of kalyan ring road in progress four phases of the project have been completed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2024 | 02:53 PM

Topics:  

  • Marathi News
  • Shrikant Shinde

संबंधित बातम्या

UN 2026  :तुम्ही म्हणाल तेच कसं होईल ? इराण ,क्युबावर चीनचे अमेरिकेला आक्रमक उत्तर
1

UN 2026 :तुम्ही म्हणाल तेच कसं होईल ? इराण ,क्युबावर चीनचे अमेरिकेला आक्रमक उत्तर

World News : ‘संघर्ष चिघळवण्याचे कारणच नाही’; युरोपबाबत पुतिन यांचा स्पष्ट इशारा
2

World News : ‘संघर्ष चिघळवण्याचे कारणच नाही’; युरोपबाबत पुतिन यांचा स्पष्ट इशारा

Tata Motors: टाटा कार्सची मोठी घोषणा! ऑल-न्यू ‘टाटा एरिस’ लाँच; जाणून घ्या किंमत
3

Tata Motors: टाटा कार्सची मोठी घोषणा! ऑल-न्यू ‘टाटा एरिस’ लाँच; जाणून घ्या किंमत

Toyota Hiluxचं ‘रेस्क्यू व्हॅन’मध्ये रूपांतर! अहमदाबाद अग्निशमन दलाच्या ताफ्यात नवी भर
4

Toyota Hiluxचं ‘रेस्क्यू व्हॅन’मध्ये रूपांतर! अहमदाबाद अग्निशमन दलाच्या ताफ्यात नवी भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.