
Nashik News: सिंहस्थाच्या महत्त्वाच्या कामांचे क्लब टेंडरिंग, तसेच स्थानिक भाजप आमदार आणि शिंदे गटाने घेतलेला आक्षेप यामुळे नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दोषारोपांचा भडिमार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना क्लीन चीट दिली. फडणवीस म्हणाले की सिंहस्थाची कामे पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने सुरू असून नेते आणि माध्यमांनी अनावश्यक वादात पडू नये. त्यांच्या या भूमिकेमुळे, “एका दगडात दोन पक्षी मारल्याची” भावना राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कोट्यवधी रूपयांच्या कामांचे टेंडर ठराविक म्हणजेच नागपुर, मुंबई व गुजरातच्या कंपन्यांना दिले जात असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. त्यासाठी मनपा प्रशासनाकडून ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून निविदेतील आरोप जाहीरपणे केली गेली आहेत. मोठ्या कंपन्यांना कामांचे ठेके देऊ स्थानिक छोट्या ठेकेदारांना दूर सारल जात आहेत. मोठ्या कंपन्यांच्या मर्यात पाहता सिंहस्थाची कामे दर्जेदा होण्याविषयी संशय व्यक्त केला जात आहे. अशा परिस्थितीत शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे, महानगरप्रमुख बंटी तिदमे यांनी या संदर्भात मनपाकडून दिल्या जाणाऱ्या २८ ठिकाणच्या पार्किंग निविदेला हरकत घेतली होती.
तसेच सीसीटीव्ही आणि ड्रोन प्रकल्पाच्या निविदेत त्रुटी,नियमभंग व पक्षपात झाल्याचा आरोपही केला होता. या शिवाय मुकणे जलपुरवठा योजना वाढविणे, जलशुद्धीकरण प्रकल्प, विल्होळी ते गांधीनगर, साधुग्राम व निलगिरी बाग पर्यंत गुरुत्ववाहिनी संदर्भात काढलेल्या निविदेलाही आक्षेप घेतले होते. सिंहस्थाची कामे काही ठराविक कंपन्यांना देण्याच्या प्रश्नावर भाजपाच्या शहरातील तिन्ही आमदारांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. त्यामुळे वृत्तपत्रातून वेळोवेळी सिंहस्थाच्या कामांविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आल्याने सरकारची प्रतिमा मलीन होत असल्याची भावना अधिकाऱ्यांमध्ये व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर सिंहस्थाच्या पहिल्या टप्प्यातील कामांच्या शुभारंभप्रसंगी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात त्याचा उल्लेख केला.
Sanjay Raut on Bihar Election: ‘१० हजारात लोकशाही विकली जाते…’; बिहारच्या निकालावर संजय
मुख्यमंत्री म्हणाले, सिंहस्थाचे कामे योग्य व पारदर्शीपणे केले जात आहे. परंतु वृत्तपत्रातून या संदर्भात वारंवार प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यासाठी काही नेते देखील या बाबत वृत्तपत्रांकडे धाव घेत आहेत. सरकारचे या सर्व कामांकडे व राबविण्यात येणाऱ्या प्रक्रीयेकडे पुर्णतः लक्ष असून, नेते व वृत्तपत्रांनी या भानगडीत पड नये असे सांगतांनाच मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना एकप्रकारचे क्लीन्न चिट देवून सिंहस्थाची कामे दर्जेदार व पारदर्शी होतील असे आश्वासीत केले आहे. विशेष म्हणजे, फडणवीस यांच्याकडून हे सल्ले दिले जात असतांना व्यासपीठावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपाचे आमदार देखील उपस्थित होते.