court
लातूर : चेक न वटल्याप्रकरणी लातूर येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी (रा. लातूर) तिसरी न्यायालयाने (Court Orders) एकास दोन महिने सक्षम कारावास आणि पाच लाख रुपये व तीन लाख रुपये नुकसान भरपाईची शिक्षा सुनावली. नुकसान भरपाई न दिल्यास सहा महिने कारावास भोगण्याचा आदेशही न्यायालयाने दिला.
बाळासाहेब वामनराव देशमुख असे आरोपीचे नाव आहे. लातूर येथील बाळासाहेब अमराव देशमुख यांनी हनुमंत गुंडीबा चव्हाण यांच्याकडून आपल्या शेतात माती टाकण्यासाठी बाराशे रुपये ट्रीपप्रमाणे 620 टिप्पर्सने माती टाकण्याचा व्यवहार केला होता. परंतु, माती टाकण्याचे काम जेव्हा पूर्ण झाले. तेव्हा थकित पैशांची मागणी केली असता देशमुख यांनी चव्हाण यांना ४ लाख ७५ हजार व दोन लाख २९ हजार ७५० चे असे दोन धनादेश दिला. मात्र, वठलेच नाहीत.
त्यानंतर हनुमंत चव्हाण यांनी लातूर येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी तिसरे यांच्या न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. या प्रकरणात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्याय निवाड्याचे अवलोकन करून न्यायमूर्ती आरती शिंदे यांनी बाळासाहेब वामनराव देशमुख यांना दोन महिने सश्रम करावास पाच लाख व तीन लाख रुपये नुकसान भरपाईची शिक्षा सुनावली. नुकसान भरपाई न दिल्यास सहा महिने कारावास भोगण्याचा आदेश केला आहे.