Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • HSC Exam 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांचं निधन; 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

माजी खासदार, माजी कुलगुरू आणि थोर विचारवंत डॉ. जनार्दन माधवराव वाघमारे यांचे आज सकाळी साडेआठ वाजता निधन झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 02, 2026 | 05:30 PM
माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांचं निधन; 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांचं निधन; 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Follow Us
Close
Follow Us:
  • माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांचं निधन
  • 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • पार्थिवावर उद्या सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार
लातूर : माजी खासदार, माजी कुलगुरू आणि थोर विचारवंत डॉ. जनार्दन माधवराव वाघमारे यांचे आज सकाळी साडेआठ वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण, समाजकारण आणि सार्वजनिक जीवनातील एक ज्येष्ठ, अभ्यासू व वैचारिक नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. 11 नोव्हेंबर 1934 रोजी जन्मलेल्या डॉ. वाघमारे यांनी आयुष्यभर शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. शिक्षणतज्ज्ञ, साहित्य अभ्यासक आणि राजकारणी म्हणून त्यांनी राज्यात व देशात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

 

डॉ. जनार्दन वाघमारे यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९३४ रोजी लातूर जिल्ह्यात झाला. डॉ. वाघमारे यांनी आयुष्यभर शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. शिक्षणतज्ज्ञ, साहित्य अभ्यासक आणि राजकारणी म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. ते नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे (SRTMU) संस्थापक आणि कुलगुरू विद्यापीठाच्या स्थापनेपासून शैक्षणिक पायाभूत रचना उभारण्यापर्यंत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मराठवाड्यात उच्च शिक्षणाची दारे सर्वसामान्यांसाठी खुली करण्यामागे त्यांचा मोठा वाटा होता. इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक म्हणून त्यांनी दीर्घकाळ अध्यापन केले. निग्रो साहित्य, दलित साहित्य आणि पुरोगामी साहित्य चळवळीवर त्यांनी सखोल अभ्यासपूर्ण लेखन व संशोधन केले.

सामाजिक न्याय, समता आणि परिवर्तनवादी विचारसरणी यांवर त्यांनी परखड मांडणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेवर खासदार म्हणून गेले असताना शिक्षण, सामाजिक न्याय आणि वंचित घटकांच्या प्रश्नांवर म्हणून त्यांनी प्रभावी भूमिका मांडली. लातूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी प्रभावी कामगिरी केली होती. डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या पार्थिवावर लातूर जिल्ह्यातच औसा तालुक्यातील कवठा या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

डॉ. वाघमारे हे नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ (SRTMU) चे संस्थापक व पहिले कुलगुरू होते. विद्यापीठाच्या स्थापनेपासून शैक्षणिक पायाभूत रचना उभारण्यापर्यंत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मराठवाड्यात उच्च शिक्षणाची दारे सर्वसामान्यांसाठी खुली करण्यामागे त्यांचा मोठा वाटा होता. इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक म्हणून त्यांनी दीर्घकाळ अध्यापन केले. निग्रो साहित्य, दलित साहित्य आणि पुरोगामी साहित्य चळवळीवर त्यांनी सखोल अभ्यासपूर्ण लेखन व संशोधन केले. सामाजिक न्याय, समता आणि परिवर्तनवादी विचारसरणी यांवर त्यांनी परखड मांडणी केली. डॉ. वाघमारे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून राज्य सभेवर निवडून गेले होते. राज्यसभेतील कार्यकाळात त्यांनी शिक्षण, सामाजिक न्याय आणि वंचित घटकांच्या प्रश्नांवर प्रभावी भूमिका मांडली. तसेच लातूर नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.

डॉ. वाघमारे यांच्या पार्थिवावर त्यांचे मूळगाव कवठा (ता. औसा, जि. लातूर) येथे उद्या सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शिक्षण, समाजकारण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी केलेले भरीव व दूरदृष्टीपूर्ण कार्य समाजासाठी दिशादर्शक ठरले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या वैचारिक विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

हे सुद्धा वाचा : मध्यपूर्वेतील युद्ध आता निर्णायक वळणावर! इराणचा थेट नेतन्याहूंच्या कार्यालयावरच हल्ला, IRGC चा दावा

Web Title: Former mp dr janardan waghmare has passed away in latur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 05:29 PM

Topics:  

  • Death
  • Latur news
  • maharashtra

संबंधित बातम्या

Navi Mumbai : स्थायी समितीत 9.41 कोटींच्या नागरी कामांना मंजुरी; वाशी-शिरवणेतील रस्ते सुधारणा लागणार मार्गी
1

Navi Mumbai : स्थायी समितीत 9.41 कोटींच्या नागरी कामांना मंजुरी; वाशी-शिरवणेतील रस्ते सुधारणा लागणार मार्गी

Maharashtra HSC result 2026 :  बारावीचा निकाल १२ वाजताच पाहता येणार; कोकणची बाजी, लातूर तळाला, राज्याचा निकाल ८९.७९ टक्के
2

Maharashtra HSC result 2026 : बारावीचा निकाल १२ वाजताच पाहता येणार; कोकणची बाजी, लातूर तळाला, राज्याचा निकाल ८९.७९ टक्के

Maharashtra HSC result 2026 : विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम, एकूण निकाल 89.79 टक्के; पुन्हा मुलींची बाजी
3

Maharashtra HSC result 2026 : विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम, एकूण निकाल 89.79 टक्के; पुन्हा मुलींची बाजी

Vivah Muhurat: मुहूर्त बाजूला, ट्रेंडला प्राधान्य! हरवत चाललेला पारंपरिक लग्नसोहळा अन् चुकत असलेला मुहूर्त
4

Vivah Muhurat: मुहूर्त बाजूला, ट्रेंडला प्राधान्य! हरवत चाललेला पारंपरिक लग्नसोहळा अन् चुकत असलेला मुहूर्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.