Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे जिल्ह्यात FDA ची पुन्हा मोठी कारवाई; भेसळयुक्त अन्नसाठ्यांवर कारवाईचा बडगा

खेड तालुक्यातील महालक्ष्मी महिला गृहउद्योग संस्थेकडे आढळलेल्या ७७८ किलो व्हाईट वाटाण्याचा साठाही अवमानक असल्याचा संशय आढळला आहे. या सर्व प्रकरणांमध्ये अन्न सुरक्षा व मानके अधिनियम आणि संबंधित नियमांनुसार पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 25, 2026 | 01:09 PM
पुणे जिल्ह्यात भेसळयुक्त, अवमानक अन्नसाठ्यांवर कारवाईचा बडगा

पुणे जिल्ह्यात भेसळयुक्त, अवमानक अन्नसाठ्यांवर कारवाईचा बडगा

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने विविध ठिकाणी केलेल्या तपासण्यांमध्ये अवमानक आणि असुरक्षित अन्नपदार्थांचा साठा, लेबलिंगमधील त्रुटी तसेच परवान्याविना अन्न व्यवसाय सुरू असल्याचे प्रकार समोर आले आहेत. इंदापूर येथील दूध प्रकल्पातील ३३७० लिटर संशयित अवमानक गायीचे दूध, मार्केट यार्डातील मोठ्या प्रमाणातील चणा, खारीक, मोहरी, जवस आणि जिऱ्याचा साठा जप्त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. तर वारजे येथील मोरया मिसळचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासनाने २१ ते २३ ऑगस्टदरम्यान जिल्ह्यातील विविध अन्न व्यवसायांची तपासणी केली. इंदापूर तालुक्यातील मौली मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स येथे गायीच्या दुधाच्या दोन टाक्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ३३७० लिटर दूध, सुमारे १ लाख ३१ हजार ५६० रुपये किमतीचे, आढळले. दुधाची आम्लता तपासणी सकारात्मक आल्याने ते अवमानक असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, संबंधित साठ्यावर कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, वारजे येथील मोरया मिसळच्या तपासणीत खाद्यपदार्थांमध्ये कृत्रिम रंगाचा वापर आणि मुदतबाह्य खाद्यपदार्थांचा साठा आढळून आला. त्यामुळे संबंधित आस्थापनाचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला.

मार्केटयार्डात मोठ्या साठ्यांची तपासणी

मार्केटयार्डातील धनश्री सेल्स येथे १० हजार २०० किलो चणा आणि ३३ हजार ६०० किलो खारीक आढळून आली. या खाद्यपदार्थांच्या लेबलिंगमध्ये त्रुटी आढळल्याने ते अवमानक किंवा असुरक्षित असल्याचा संशय आहे. त्याच परिसरातील लेकसिटी या आस्थापनाकडे ८१५८ किलो मोहरी, ५६३८ किलो जवस आणि ३१९६ किलो जिरे आढळले. मात्र, संबंधित आस्थापना आवश्यक परवान्याविना व्यवसाय करत असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. याशिवाय, विक्रेता व वाहतूकदाराकडील ३९८५.४ किलो सैल हरभऱ्यात बाह्य पदार्थ आढळल्याने त्यावरही कारवाई करण्यात आली.

खेड तालुक्यातील महालक्ष्मी महिला गृहउद्योग संस्थेकडे आढळलेल्या ७७८ किलो व्हाईट वाटाण्याचा साठाही अवमानक असल्याचा संशय आढळला आहे. या सर्व प्रकरणांमध्ये अन्न सुरक्षा व मानके अधिनियम आणि संबंधित नियमांनुसार पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. नागरिकांना सुरक्षित व गुणवत्तापूर्ण अन्न उपलब्ध व्हावे यासाठी जिल्ह्यातील दूध संकलन केंद्रे, प्रक्रिया केंद्रे, खाद्यपदार्थ विक्रेते आणि अन्य अन्न व्यवसायांची तपासणी सुरूच राहणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Devendra Fadnavis : ‘२०२९ पूर्वी फडणवीसांनी पंतप्रधान व्हावं’; विजय वडेट्टीवारांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण

Web Title: Crackdown on adulterated food stocks in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 01:09 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.