Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे राशन धान्य वाहतुकदार ठेकेदारांचे ३ कोटी थकीत

ऑनलाईल मोजणी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत सर्वसामान्य जनतेची लूट केली जात आहे अशी टीका माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 24, 2024 | 04:00 PM
सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे राशन धान्य वाहतुकदार ठेकेदारांचे ३ कोटी थकीत
Follow Us
Close
Follow Us:

कणकवली : लोकसभा निवडणुकीत मतदारांना वाटलेले पैसे आता संपले. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांकडे सत्ताधारी मंडळी दुर्लक्ष करताना दिसत आहेत. खऱ्या अर्थाने मतांसाठी मतदार पैसे घेतात त्यामुळे जनतेच्या प्रश्नांकडे लोकप्रतिनीधी दुर्लक्ष करत आहेत. रेशन दुकानदारांकडे मोफत धांन्यासाठी लोक जाऊन परत येत आहेत, कारण रेशन धान्य वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराचे 3 कोटी बिल शासनाकडे थकीत आहे. त्यामुळे रेशन धान्य दुकानावर धान्य उपलब्ध नाही. तसेच ऑनलाईल मोजणी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत जनतेची लूट होत असल्याचा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला.

कणकवली येथील मनसे कार्यालयात पत्रकारांशी ते बोलत होते, यावेळी ते म्हणाले की, रेशन धान्य पुरवठादारांना गेल्या ३ महिन्यांपासून पैसे मिळत नाहीत. याबाबत जिल्हाधिकारी यांनी ते बिल वर पाठवले आहे, असे सांगितले. जिल्हा पुरवठा अधिकारी बदलीच्या मार्गावर आहेत, कार्यालयात दुपारी १२ ते १ वाजता येतात, सकाळी लवकर येण्याची गरज असताना या महत्त्वाच्या पदावर असलेली व्यक्ती उशीरा येत असेल तर त्याला जबाबदार कोण, किती वेळ आहे? राज्य शासनाने मोफत धान्याची घोषणा केली मात्र, सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत आहेत. मतदार हे मतांसाठी पैसे घेतात. त्यामुळे धान्य मिळत नसल्याचे बोलता येत नाही. यापुढील काळात मतदारांनी मतांसाठी पैसे न घेता लोकशाही बळकट करावी असे आवाहन श्री. उपरकर यांनी केले.

मोजणी प्रक्रियेत सर्वसामान्यांची लुट

भूमि अभिलेखकडे ऑनलाईन मोजणी अर्ज भरताना सर्व्हर डाऊन, सर्व्हरमधुन कागदपत्र फाईल उडून जाणे अशी परिस्थिती आहे. भूमी अभिलेख विभागात पारदर्शक कारभार करण्यासाठी शासनासाठी योजना आणली. मात्र सर्वसामान्य लोकांना त्रास होत आहे. पूर्वी चारकरमानी आले, एका दिवसात मोजणी अर्ज भरण्याच काम होत होते, आता मोजणी अर्ज ऑनलाईन करण्यासाठी ऑनलाईन केंद्रांकडून 1 हजार ते 2 हजार घेतले जात आहेत. याबाबत भूमी अभिलेख संचालक श्री. निकम यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनीही मान्य केलं आहे. सर्वसामान्य जनतेची लूट थांबविण्यासाठी कंत्राटी कर्मचारी कार्यालयात बसवावा किंवा सेतू सुविधा केंद्राकडे अर्ज भरण्याचे काम करावे. त्याचा दर निश्चित करावा अशी मागणी केल्याचे श्री. उपरकर यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्रशासनात सावळा गोंधळ चालू आहे. कणकवलीत दाखले मिळतात. पण सावंतवाडी प्रांत कार्यालयात अनेक विद्यार्थी आणि नागरिक वंचित आहेत, 127 अर्ज पेंडींग आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना यांना कळवले आहे. पालक, विद्यार्थी कार्यालयात जात आहेत, याठिकाणी आर्थिक मागणी करणारे एजंट झाले आहेत. यासगळ्या प्रकाराकडे पालकमंत्री, खासदार, आमदार यांचे नियंत्रण नसल्याने अधिकारी राजा झाले आहेत. मनमानी कारभार करीत आहेत. कुडाळ प्रांत कार्यालयात होडी आणि वाळू डेपो मागे पैसे घेतले जात आहेत. पडवे माजगाव येथे खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणात झाले आहे, विनापरवाना उत्खनन होत असल्याचे तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांना लेखी कळवूनही दुर्लक्ष केले. तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांनी पैसे घेतले आहेत. मायनिंग अधिकारी कागदी घोडे नाचवत आहेत. कोणीही कारवाई करायला पुढे येत आहेत. त्या भागाचे आमदार देखील पुढे येत नाहीत, त्यामुळे अधिकाऱ्यांचे फावले आहेत. ज्या ठिकाणी विनापरवाना खनिज उत्खनन होत आहे. त्याठिकाणी संबंधित कंपनीने बोर्ड लावला. त्या मायनींग कंपनीला कुठलीही परवानगी देण्यात आलेली नाही. यासगळ्या उत्खन्नात सर्व अधिकारी मोठा भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप परशुराम उपरकर यांनी केला.

Web Title: Criticism of former mla parashuram uparkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2024 | 04:00 PM

Topics:  

  • kankavali
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

आपत्तीग्रस्तांना 3258 कोटींचा निधी मंजूर; मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांची माहिती 
1

आपत्तीग्रस्तांना 3258 कोटींचा निधी मंजूर; मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांची माहिती 

Maharashtra News: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! पुढील शैक्षणिक वर्षापासून…; शासनाची मान्यता
2

Maharashtra News: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! पुढील शैक्षणिक वर्षापासून…; शासनाची मान्यता

Flood Relief: राज्यातील ‘या’ पूरग्रस्त जिल्ह्यांना १३५६ कोटींची मदत; रक्कम वितरित करण्यास…
3

Flood Relief: राज्यातील ‘या’ पूरग्रस्त जिल्ह्यांना १३५६ कोटींची मदत; रक्कम वितरित करण्यास…

Devendra Fadnavis: “इलेक्ट्रिक ट्रक निर्मितीसाठी…”; CM देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
4

Devendra Fadnavis: “इलेक्ट्रिक ट्रक निर्मितीसाठी…”; CM देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.