
प्रतिस्पर्धी उमेदवारांना आवश्यक तेवढी मते मिळवण्यात अपयश आल्याने त्यांचे डिपॉझिट निवडणूक कार्यालयाने जप्त केले, असे पॅनेल प्रमुख गिरीष जाधव यांनी सांगितले. प्रतिस्पर्धी उमेदवारांना संधी देऊनही, त्यांनी पतसंस्थेचे हित न जोपासता हट्टापोटी निवडणूक लढविली, असेही ते म्हणाले.
याबाबत बोलताना रणजीत घोडके यांनी सांगितले की, विरोधी उमेदवारांचे अनामत रक्कम जप्त होण्यासोबतच, त्यांना पोलिंग एजंटही मिळाले नाहीत, यावरून त्यांच्या तयारीचा अभाव स्पष्ट दिसून आला. ( Solapur Election News)
गिरीश जाधव, सुधाकर माने देशमुख, श्रीकांत धोत्रे, श्रीकृष्ण घंटे, शशिकांत साळुंखे, यादव मोहन, अंकुश कोळेकर, दिनेश बनसोडे,समीर शेख, भीमाशंकर वाले.
भटक्या विमुक्त मतदार संघातून रणजीत घोडके
ओबीसी मतदारसंघातून शिवाजी कांबळे
महिला मतदारसंघातून राणी सुतार, संगीता हंडे
बिनविरोध प्रदीप सकट
असे एकूण 15 उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले
सदर पॅनलचे महेश जाधव, राजेंद्र माशाळ, रामस्वामी मनलोर, सिद्धाराम बोरुटी, अविनाश गोडसे, रवी कोरे, आदी नेते मंडळींनी निवडून येण्यासाठी प्रयत्न केले. पॅनल प्रमुख महेश जाधव, रणजीत घोडके प्रचार प्रमुख गिरीश जाधव, शिवाजी कांबळे यांचा विजयासाठी मोठा प्रयत्न राहीला . सहकार विभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी गजानन वडेकर यांनी निवडणूकीचे कामकाज पाहीले.निवडणूक दरम्यान पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता .
Ans: सत्ताधारी कर्मचारी विकास आघाडीने दणदणीत विजय मिळवत प्रतिस्पर्धी उमेदवारांचा मोठ्या फरकाने पराभव केला.
Ans: प्रतिस्पर्धी उमेदवारांना आवश्यक तेवढी मते मिळाली नाहीत. काहींना पॉलिंग एजंटही मिळाले नाहीत, त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांचे अनामत रक्कम जप्त केली.
Ans: एकूण 15 उमेदवार विजयी झाले. यात सर्वसाधारण, भटक्या विमुक्त, ओबीसी आणि महिला मतदारसंघातील उमेदवारांचा समावेश आहे.