
Dadar Kabutar Khana News Jain community vs marathi ekikaran samiti protest
Dadar Kabutar Khana News : मुंबई : दादरच्या स्टेशन परिसरामध्ये अतिशय प्रसिद्ध असा कबुतरखाना होता. अनेक वर्षांपासून लाखो कबुतर हे या ठिकाणी दाणा-पाणी खात होते. त्यांना बघण्यासाठी बघ्यांची देखील मोठी गर्दी होत होती. मात्र कबुतरांच्या वावरामुळे अनेक गंभीर आरोग्यसंबंधित प्रश्न आणि आजार होत असल्यामुळे याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले होते. त्यानंतर मुंबई पालिकेने हा कबुतरखाना बंद करण्याचे आदेश दिले होते. यामुळे दादर परिसरातील कबुतरखाना बंद करण्यात आला आहे. मात्र आता यावरुन जैन समाज आक्रमक भूमिका घेत आहे.
कबुतरखाना परिसरामध्ये ताडपत्री टाकून तो बंद करण्यात आला होता. पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये ही ताडपत्री टाकण्यात आली होती. मात्र यामुळे पक्ष्यांना खाद्य मिळत नसून त्यांना भुकेल्या पोटी राहवे लागत असल्याची भूमिका जैन समाजाकडून घेतली जात आहे. त्याआधी जैन समाजाकडून कबुतरखाना सुरु करण्यात यावा अशी विनंती करण्यात आली. आता मात्र कबुतरखान्यावरुन जैन समाज आक्रमक झाला आहे. या परिरामध्ये आक्रमक आंदोलकांनी जोरदार आंदोलन सुरु केले आहे. कबुतरखाना पुन्हा सुरु करण्यात यावा आणि हा निर्णय पक्ष्यांसाठी योग्य नसल्याची भूमिका जैन समाजाकडून घेतली जात आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पक्ष्यांच्या खाण्याचे हाल होऊ नये म्हणून कबुतरखाना बंद करण्याला जैन समाजाने विरोध केला आहे. यापूर्वी त्यांनी कबुतरखाना परिसरामध्ये प्रार्थना करणार असल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर जैन समाजाने आंदोलनाचा निर्णय घेतला. यानंतर पुन्हा एकदा आंदोलन रद्द करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. आज सकाळी प्रत्यक्षात जैन समाजाचे लोक मोठ्या संख्येने जमले आणि त्यांनी आंदोलन सुरु केले. कबुतरखाना परत सुरु करण्यासाठी घोषणा बाजी केली तसेच एकच हल्लाबोल केला. यावेळी पालिकेकडून कबुतरखान्यावर टाकण्यात आलेली ताडपत्री फाडली. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये बचाबाची देखील झाली. कबुतरखान्याची ताडपत्री जैन आंदोलकांनी फाडली. त्यांना अडवताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आक्रमक महिला आंदोलनकर्त्या या कबूतरखान्यामध्ये उतरल्या आहेत. पालिकेकडून बांधण्यात आलेली ताडपत्री काढून टाकण्यात आली असून या परिसरामध्ये मोठा गदारोळ सुरु असल्याचे दिसून येत आहे. याचबरोबर मोठा पोलिस बंदोबस्त देखील तिथे पोहोचला आहे. मात्र, या घटनेनंतर जैन समाजाच्या भावना या अधिक तीव्र होताना दिसत आहेत. पोलिसांकडून आंदोलकांना हटवण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र यामुळे कबुतरखाना परिसरातील वाहतूकीवर परिणाम झाला आहे. आंदोलकांनी वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली आहे.