Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: नागरिकांसाठी दिलासा! पालिका रुग्णालयांत सुरू होणार डिजिटल पेमेंट सुविधा, लांबच लांब रांगा

महापालिकेच्या रुग्णालयात मोबाईलद्वारे डिजिटल पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. याचा फायदा नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. कारण नागरिकांना मोठ्या रांगेत थांबून पैसे भरण्याची वाट पाहावी लागणार नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 10, 2026 | 01:44 PM
Mumbai News: नागरिकांसाठी दिलासा! पालिका रुग्णालयांत सुरू होणार डिजिटल पेमेंट सुविधा, लांबच लांब रांगा
Follow Us
Close
Follow Us:
  • रोख रकमेऐवजी डिजिटल माध्यमातून शुल्क भरण्याची सुविधा
  • निविदा सादर करण्याची अंतिम तारीख २४ फेब्रुवारी
  • मुंबई महापालिकेच्या वित्त विभागाने ‘डिजिटल पेमेंट कलेक्शन सेवा प्रणाली’ उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू
मुंबई: ऑनलाईन पेमेंट सध्याच्या काळाची गरज बनली आहे. सुट्टे पैसे, वेळ वाचवणे आणि सुरक्षित व्यवहार या सर्व कामांसाठी ऑनलाईन पेमेंट फायदेशीर ठरतात. पैसे बाळगणे, सुट्ट्या पैशांसाठी वाद घालणं, तसेच चोरांपासून तुमचे पैसे सुरक्षित ठेवणं हे अत्यंत कठीण काम आहे. याच सर्वापासून सुटका मिळवण्यासाठी ऑनलाईन पेमेंट पद्धती उपयोगी ठरते. तुम्ही केवळ क्यूआर कोड स्कॅन करून काही क्षणातच पेमेंट करू शकता. ऑनलाईन पेमेंट पद्धती अप्ताकालीन परिस्थितीत अतिशय महत्त्वाची ठरते, विशेषत: जेव्हा रुग्णालयातील व्यवहार करायचे असतील. रुग्णालयात पैशांची जुळवाजुळव करताना ऑनलाईन पेमेंट पद्धती अतिशय फायदेशीर ठरते. हाच विचार करून महापालिकेने देखील आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Rohit Pawar News: ‘अजितदादांच्या निधनाबाबत माझ्याही मनात शंका…’; रोहित पवारांना नेमकं सांगायचंय काय?

आता महापालिकेच्या कोणत्याही रुग्णालयात गेल्यावर मोबाईलद्वारे डिजिटल पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध असल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण राहणार नाही. महापालिकेची रुग्णालयेच नव्हे, तर इतर कार्यालयांमध्येही नागरिकांना रोख रकमेऐवजी डिजिटल माध्यमातून शुल्क भरण्याची सुविधा देण्याच्या दिशेने ठोस पावले उचलली जात आहेत. केंद्र सरकारच्या ‘डिजिटल उपक्रमाच्या इंडिया’ पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या वित्त विभागाने ‘डिजिटल पेमेंट कलेक्शन सेवा प्रणाली’ उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली असून, या निविदा सादर करण्याची अंतिम तारीख २४ फेब्रुवारी असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.  (फोटो सौजन्य – Pinterest)

समस्या होणार कमी; प्रशासनाने केला दावा

सध्या महापालिकेच्या विविध रुग्णालये व कार्यालयांमध्ये उपचार शुल्क, प्रमाणपत्रे, नोंदणी तसेच अन्य सेवासाठी नागरिकांना रोख रक्कम भरावी लागते. त्यामुळे खिडक्यांवर मोठ्या रांगा लागतात, वेळेचा अपव्यय होतो आणि व्यवहारांची अचूक नोंद ठेवताना अडचणी निर्माण होतात. अनेकदा सुट्टया पैशांचा प्रश्नही उपस्थित होतो. डिजिटल पेमेंट प्रणाली कार्यान्वित झाल्यास या समस्या मोठ्या प्रमाणात कमी होतील, असा प्रशासनाचा दावा आहे.

निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर टप्याटप्प्याने ही सुविधा महापालिकेच्या सर्व रुग्णालये आणि कार्यालयांमध्ये लागू करण्यात येणार आहे. सध्या संपत्ती कर, पाणीपट्टी यांसारखे काही व्यवहार ‘माय बीएमसी अ‍ॅपवरून ऑनलाइन करता येतात, मात्र रुग्णालयांमधील अनेक सेवा तसेच काही कार्यालयीन व्यवहारांसाठी अजूनही रोख व्यवहारांची गरज भासते. ही उणीव भरून काढण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे.

Yavatmal Rabbi Crop Area: यवतमाळमध्ये अतिवृष्टी ठरली शेतकऱ्यांसाठी वरदान, रब्बी पिकांना मिळाले जीवनदान

तांत्रिक अडचणींमुळे प्रकल्पाची रखडपट्टी

२०१९ मध्येही डिजिटल पेमेंट सुविधा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र तांत्रिक अडचणींमुळे तो प्रकल्प रखडला होता. यावेळी निविदा प्रक्रियेतून निवडल्या जाणाऱ्या एजन्सीकडून यूपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड तसेच क्यूआर कोडआधारित पेमेंट सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या व्यवस्थेमुळे नागरिकांचा वेळ वाचण्याबरोबरच व्यवहारांतील पारदर्शकता वाढेल, अशी अपेक्षा महापालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Big relief for citizens as bmc hospitals plan digital payments to cut long queues mumbai news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 01:44 PM

Topics:  

  • BMC
  • Digital Transaction
  • Mumbai News

संबंधित बातम्या

मुंबईची तहान भागणार! समुद्राचे पाणी गोड होणार; मनोरी समुद्रजल निःक्षारीकरण प्रकल्पाला अखेर CRZ ची मंजुरी
1

मुंबईची तहान भागणार! समुद्राचे पाणी गोड होणार; मनोरी समुद्रजल निःक्षारीकरण प्रकल्पाला अखेर CRZ ची मंजुरी

Mumbai News : भाभा रुग्णालयात प्रसूतीनंतर महिलेचा वेदनेतून मृत्यू; डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्याचा नातेवाईकांचा आरोप
2

Mumbai News : भाभा रुग्णालयात प्रसूतीनंतर महिलेचा वेदनेतून मृत्यू; डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्याचा नातेवाईकांचा आरोप

मुंबईत ‘मराठी पाटी’ सक्तीचा शेवटचा इशारा; महिनाभरात अंमलबजावणी न केल्यास BMC करणार मोठी कारवाई
3

मुंबईत ‘मराठी पाटी’ सक्तीचा शेवटचा इशारा; महिनाभरात अंमलबजावणी न केल्यास BMC करणार मोठी कारवाई

BMC School : पालिकेच्या विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी! गुणवंतांचा भव्य सत्कार; आयुक्त अश्विनी भिडे यांचा विद्यार्थ्यांशी संवाद
4

BMC School : पालिकेच्या विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी! गुणवंतांचा भव्य सत्कार; आयुक्त अश्विनी भिडे यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.