
पुणे – काल (मंगळवारी) देशासह राज्यभरात गणेश चर्तुर्थीला सुरुवात झाली आहे. गणपती बाप्पाचे आगमन झाले. लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी गणेशभक्त वर्षभरापासून वाट पाहत होते. मुंबई, पुण्यात मोठे गणपती असतात. सार्वजनिक गणपती तसेच घरगुती गणपतीचे आगमन काल झाले आहे. दरम्यान, आज दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती हा प्रसिद्ध आहे. येथे प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात अथर्वशीर्ष पठण होत असते.
31 हजार महिलांनी अथर्वशीर्ष पठण
दरम्यान, आज पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर 31 हजार महिलांनी एकाचवेळी अथर्वशीर्ष पठण केलं. ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि.. असे 31 हजार महिलांच्या मुखातून अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर उमटले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ऋषिपंचमीनिमित्त पहाटे 31 हजार महिलांनी उत्सव मंडपासमोर अथर्वशीर्ष पठण केले. अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे यंदा 36 वे वर्ष होते. या सगळ्या महिलांच्या सुरांमुळे प्रसन्न वातावरण निर्माण झालं होतं. पहाटेपासून महिलांनी रांगा लावल्या होत्या.
ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि.. असे ३१ हजार महिलांच्या मुखातून अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर उमटले. ऋषिपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर यंदाच्या गणेशोत्सवात हा सोहळा गणेशभक्तांनी गुरुवारी सकाळी अनुभवला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ऋषिपंचमीनिमित्त पहाटे ३१ हजार महिलांनी उत्सव मंडपासमोर अथर्वशीर्ष पठण केले. त्यामुळं वातावरणात प्रसन्नता आली होती.