Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Breaking: पुण्यात काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमनेसामने; दगडफेकीत महिला पोलिस जखमी

हर्षवर्धन सपकाळ यांनी टीपू सुलतान याच्याबद्दल केलल्या वक्तव्यांवरून पुण्यात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यावरून काँग्रेस भवन परिसरात चांगलाच राडा झाला.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 15, 2026 | 02:13 PM
पुण्यातील राजकीय हिंसाचाराच्या घटनेनंतर काँग्रेस आक्रमक; शिष्टमंडळाची पोलिस आयुक्तांसोबत चर्चा

पुण्यातील राजकीय हिंसाचाराच्या घटनेनंतर काँग्रेस आक्रमक; शिष्टमंडळाची पोलिस आयुक्तांसोबत चर्चा

Follow Us
Follow Us:
  • पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी
  • हर्षवर्धन सपकाळांच्या विधानानंतर पुणे पेटले; काँग्रेस भवनाबाहेर दोन तास राडा
  • दगडफेकीत वाहनांचे नुकसान, पोलिसांसमोरच कार्यकर्त्यांची भिडंत
 

Pune BJP-Congress Clashes:  पुण्यातील काँग्रेस भवन परिसरात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने आल्याचा प्रकार घडला आहे.  भाजप  कार्यकर्त्यांनी काँग्रेसभवनावर दगडफेक केली, यावेळी एक महिला पोलिस कर्मचारी आणि काँग्रेस कार्यकर्ता जखमी झाल्याची माहिती  आहे.  काँग्रेस(Congress) कार्यकर्त्यांकडून पोलिसांसमोरच ही दगडफेक झाल्याचा आरोप केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल बुलढाण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मालेगाव महापालिकेच्या उपमहापौरांनी त्यांच्या कार्यालयीन कक्षात टिपू सुलतानाची प्रतिमा लावण्यात आल्याबद्दल विचारण्यात आले. त्यावर बोलताना सपकाळ म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर टिपू सुलतान याने  इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारला. टिपू सुलतान एक शौर्य गाजवणारा योद्धा होता.  शौर्याचे लक्षण म्हणून टिपु सुलतान याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघायला पाहिजे, असे सपकाळ म्हणाले होते, त्यावरून भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे.

टिपू सुलतान हा पाकिस्तानचा नायक तर क्रिकेटचा सामना कशाला? खासदार संजय राऊतांची मॅचवरुन राजकीय टीका 

हर्षवर्धन सपकाळांविरोधात काँग्रेस भवनासमोर भाजपने आंदोलन सुरू करत हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागण्याची जोरदार मागणी केली. त्यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. काँग्रेस भवन परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत जवळपास दीड ते दोन तास जोरदार निदर्शने केली. मात्र, या आंदोलनाला हिंसक वळण लागले. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

भाजप (bjp) कार्यकर्त्यांच्या गर्दीतून दगडफेक सुरू झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. दरम्यान, काँग्रेस भवनाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात होता. गर्दीतून कुणीतरी जोरदार दगड भिरकावल्याने एक महिला पोलिस कर्मचारी जखमी झाली. त्यानंतर काँग्रेसचा कार्यकर्त्यालाही दगड लागल्याने रक्तस्त्राव सुरू झाला. तसेच, परिसरातील काही वाहनांनाही दगडफेकीचा फटका बसला आहे.

NCP Merger Updates: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम? दोन्ही पक्षांकडून चर्चा 

तर काँग्रेसकडूनही दगडफेक झाल्याचा आरोप भाजप आंदोलकांकडून करण्यात आला. काँग्रेस कार्यकर्त्यांनीच दगडफेक करण्यास सुरुवात केल्याचा पलटवार भाजपकडून करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे, पोलिसांसह तीन पत्रकारदेखील यात जखमी झाले आहेत. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटेंना अटक करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

भाजप कार्यकर्त्यांचा काढता पाय

काँग्रेस कार्यकर्त्याचे डोके फुटल्याचे समजताच आणि काँग्रेस गोटातूनही आक्रमक प्रत्युत्तर मिळायला लागताच, भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनासमोरून काढता पाय घेतला. या घटनेनंतर काँग्रेसचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते प्रचंड संतापले असून त्यांनी भाजपच्या या कृत्याचा निषेध केला आहे. परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जखमी कार्यकर्त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, पोलीस आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेत आहेत.

 

 

Web Title: Pune politics bjp congress protest in congress bhavan area in pune female police officer injured in stone pelting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 01:28 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Pune

संबंधित बातम्या

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’
1

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल
2

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल

भोर नगरपरिषदेची सभा वादळी, नगरसेविकांच्या आरोपानंतर नगराध्यक्षांचा लेखी माफीनामा; नेमकं काय घडलं?
3

भोर नगरपरिषदेची सभा वादळी, नगरसेविकांच्या आरोपानंतर नगराध्यक्षांचा लेखी माफीनामा; नेमकं काय घडलं?

‘तुमच्या पक्षात असतील तर वाघ, दुसरीकडे गेले की वेश्या?’; राज ठाकरेंच्या टीकेला संजय शिरसाट यांचा पलटवार
4

‘तुमच्या पक्षात असतील तर वाघ, दुसरीकडे गेले की वेश्या?’; राज ठाकरेंच्या टीकेला संजय शिरसाट यांचा पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.