Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IUCAA Pune: नऊ महिन्यांच्या दुर्मीळ ‘तारकीय ग्रहणाचा’ शोध; विशाल रिंग प्रणालीमुळे ताऱ्याची चमक कमी

संशोधकांच्या मते, ही वस्तू बहुधा ‘ब्राउन ड्वार्फ’ प्रकारातील असून तिच्याभोवती प्रचंड आणि दाट वलयांची प्रणाली आहे. या वलयांचा बाहेरील भाग पातळ असल्याने सुरुवातीला प्रकाश कमी झाल्याचे जाणवले नाही

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 15, 2026 | 11:18 AM
IUCAA Pune: Rare nine-month 'stellar eclipse' discovered; Star's brightness reduced due to huge ring system

IUCAA Pune: Rare nine-month 'stellar eclipse' discovered; Star's brightness reduced due to huge ring system

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘एएसएएसएसएन-२४एफडब्ल्यू’ ताऱ्याचे दुर्मीळ ग्रहण
  • ‘ब्राउन ड्वार्फ’ आणि वलय प्रणालीचा शोध
  • ४३ वर्षांचे चक्र आणि ऐतिहासिक नोंदींचे महत्त्व
Sub-stellar Object Ring System Around Star: सुमारे ३,००० प्रकाशवर्ष अंतरावर असलेल्या ‘एएसएएसएसएन-२४एफडब्ल्यू’ या ताऱ्याबाबत खगोलशास्त्रज्ञांनी एक अत्यंत दुर्मीळ घटना नोंदवली आहे. जवळपास नऊ महिन्यांच्या कालावधीत या ताऱ्याची चमक हळूहळू कमी होत गेली आणि नंतर पुन्हा पूर्ववत झाली. या महत्त्वपूर्ण संशोधनात पुण्यातील इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स (आयुका) येथील वैज्ञानिकांचा सहभाग असून हा अभ्यास मंथली नोटिसेस ऑफ द रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी या वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.

World Hippo Day : दिसायला गोंडस पण वाघापेक्षाही घातक! जाणून घ्या पाणघोड्याला का म्हटले जाते King of River

या संशोधनात डॉ. सारंग शाह, जोनाथन मार्शल (अकॅडेमिया सिनीका संलग्न) तसेच आशिष महाबळ (कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) यांनी सहभाग घेतला. वैज्ञानिकांच्या मते, हा तारा सूर्यापेक्षा थोडा जड आणि जवळपास दुप्पट आकाराचा आहे. २०२४ च्या शेवटापासून ते २०२५ च्या मध्यापर्यंत सुमारे २०० दिवस हा तारा मंदावत राहिला. त्याची चमक सुमारे ९७ टक्क्यांपर्यंत घटली होती. सुरुवातीला ताऱ्यात काही बदल झाला असावा असा अंदाज होता; मात्र अभ्यासातून तारा स्थिर असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ही घटना ताऱ्यामुळे नव्हे, तर त्याच्या समोरून गेलेल्या एका मोठ्या उप-तारकीय वस्तूमुळे घडल्याचे निष्पन्न झाले.

संशोधकांच्या मते, ही वस्तू बहुधा ‘ब्राउन ड्वार्फ’ प्रकारातील असून तिच्याभोवती प्रचंड आणि दाट वलयांची प्रणाली आहे. या वलयांचा बाहेरील भाग पातळ असल्याने सुरुवातीला प्रकाश कमी झाल्याचे जाणवले नाही; पण घन भाग समोर आल्यावर ताऱ्याची चमक स्पष्टपणे घटली. अशा प्रकारचे ग्रहण घडण्यासाठी तारा, त्याचा साथीदार आणि पृथ्वी यांची अचूक सरळ रेषा तयार होणे आवश्यक असते, त्यामुळे अशा घटना अत्यंत क्वचित दिसतात.

Dinvishesh : इटालियन शास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली यांचा जन्मदिन; जाणून घ्या 15 फेब्रुवारीचा इतिहास

इतिहासातील नोंदी तपासल्यावर हा तारा १९३७ आणि १९८१ मध्येही मंदावल्याचे आढळले. ही माहिती ‘डिजिटल ॲक्सेस टू अ स्काय सेंच्युरी’ या प्रकल्पातून मिळाली असून तो हार्वर्ड कॉलेज वेधशाळा येथील जुन्या छायाचित्रफलकांचे डिजिटायझेशन करतो. यावरून सुमारे दर ४३ वर्षांनी अशी घटना घडत असल्याचे संकेत मिळतात आणि जुन्या वैज्ञानिक नोंदी जतन करण्याचे महत्त्वही अधोरेखित होते.

या ताऱ्यातील बदल प्रथम ‘ऑल-स्काय ऑटोमेटेड सर्व्हे फॉर सुपरनोव्हा’ या आकाश सर्वेक्षणातून आढळला. हा उपक्रम ओहायो स्टेट विद्यापीठ चालवते. तसेच ‘ॲस्टरॉइड टेरेस्ट्रियल-इम्पॅक्ट लास्ट अलर्ट सिस्टिम’ या प्रणालीनेही निरीक्षणात मदत केली. शास्त्रज्ञांच्या मते, या शोधामुळे उप-तारकीय वस्तू, त्यांच्याभोवती निर्माण होणारी वलये आणि अशा प्रणाली कशा तयार होतात याबाबत अधिक माहिती मिळू शकते. भविष्यात मोठ्या दुर्बिणींच्या साहाय्याने या ताऱ्याचा अधिक सखोल अभ्यास केला जाणार असून खगोलशास्त्रातील अनेक गूढ प्रश्न उलगडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

Web Title: Iucaa pune rare nine month stellar eclipse discovered stars brightness reduced due to huge ring system

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 11:18 AM

Topics:  

  • Marathi News
  • Pune
  • science news

संबंधित बातम्या

Pune Crime: चारित्र्यावर संशय, पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं, 15 दिवस घरात कोंडलं आणि…; पुण्यात संतापजनक घटना
1

Pune Crime: चारित्र्यावर संशय, पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं, 15 दिवस घरात कोंडलं आणि…; पुण्यात संतापजनक घटना

Maharashtra Govt Scheme : पुरस्कार विजेत्यांसाठी एसटी प्रवास पूर्ण मोफत; पुणे विभागातून २०१ जणांनी घेतला लाभ
2

Maharashtra Govt Scheme : पुरस्कार विजेत्यांसाठी एसटी प्रवास पूर्ण मोफत; पुणे विभागातून २०१ जणांनी घेतला लाभ

Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी देखील CNG गॅसचा तुटवडा
3

Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी देखील CNG गॅसचा तुटवडा

Chiplun : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक
4

Chiplun : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.