Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर साई रिसॉर्टवर हातोड; किरीट सोमय्या यांचे टीकास्त्र म्हणाले, ‘हिसाब तो देना पड़ेगा !’

खेट येथील साई रिसॉर्टचे बांधकाम मागील अनेक महिन्यांपासून वादग्रस्त ठरत आहेत. अखेर या वादग्रस्त साई रिसॉर्ट  पाडण्याचे काम सुरू झाले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 03, 2024 | 03:25 PM
अखेर साई रिसॉर्टवर हातोड; किरीट सोमय्या यांचे टीकास्त्र म्हणाले, ‘हिसाब तो देना पड़ेगा !’
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : माजी मंत्री आणि  उबाठा गटाचे नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सदानंद कदम यांच्या मालकीच्या खेट येथील साई रिसॉर्टचे बांधकाम मागील अनेक महिन्यांपासून वादग्रस्त ठरत आहेत. अखेर या वादग्रस्त साई रिसॉर्ट  पाडण्याचे काम सुरू झाले आहे. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याबद्दलचा व्हिडिओ एक्स वर टाकला आहे. रिसॉर्टचे पाडकाम करत असतानाच अनिल परब आणि सदानंद कदम यांच्यावर फौजदारी कारवाईदेखील होणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.

अनिल परब चा दापोली साई रिसॉर्ट वर हातोडा
तोडकाम सुरू….

साई रिसॉर्ट अनधिकृत बांधकाम विरोधात अनिल परब आणि सदानंद कदम वर फौजदारी कारवाई प्रक्रिया ही सुरू आहे सध्या दोघे जामीनावर आहे

हिसाब तो देना पड़ेगा@BJP4India @mieknathshinde @Dev_Fadnavis pic.twitter.com/uzbnrcfTC4

— Kirit Somaiya ( Modi ka Pariwar) (@KiritSomaiya) April 3, 2024

किरीट सोमय्या यांनी दोन दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दोन दिवसांमध्ये साई रिसॉर्ट पाडणार असल्याची माहिती दिली होती. यानंतर आता रिसॉर्ट पाडण्याचे काम सुरु झाले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना लिहिले आहे की,  साई रिसॉर्टचे बांधकाम सीआरझेडच्या नियमाचे उल्लंघन करून बांधण्यात आले आहे. याबद्दल परब यांच्यावर गुन्हा दाखल असून ते जामिनावर बाहेर आहेत. काही दिवसांपूर्वीच उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असताना अनधिकृत आणि अतिरिक्त बांधकाम स्वखर्चाने पाडू, असे प्रतिज्ञापत्र सदानंद कदम यांनी दिले होते.

अनिल परब चा दापोली साई रिसॉर्ट तोडण्याचे काम दोन दिवसात सुरू होणार

आज रत्नागिरी येथे जिल्हाधिकारी, SP पोलिस, पर्यावरण विभाग अधिकाऱ्यांशी विस्तृत चर्चा केली

अनधिकृत रिसॉर्ट बांधकाम आणि CRZ ना बांधकाम विभागात बांधकाम केले म्हणून परब वर गुन्हा दाखल झाला आहे परब जामिनावर बाहेर आहे pic.twitter.com/nu3L8obtNV

— Kirit Somaiya ( Modi ka Pariwar) (@KiritSomaiya) April 1, 2024

जानेवारी महिन्यात ईडीने साई रिसॉर्टची १० कोटींची मालमत्ता जप्त केली होती. याप्रकरणी सदानंद कदम आणि अनिल परब यांच्याविरोधात मनी लाँडरिंगचाही गुन्हा ईडीने दाखल केला होता. केंद्रीय पर्यावरण आणि वन खात्याने दाखल केलेल्या तक्रारीनंतर ईडीने या प्रकरणात हस्तक्षेप केला. या प्रकरणाची चौकशी करत असताना ईडीने सदानंद कदम आणि जयराम देशपांडे यांना अटक केली होती. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने कदम यांना जामीन दिला होता.

Web Title: Dapoli resort ed case anil parab aide starts demolishing illegal portion of resort nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2024 | 03:25 PM

Topics:  

  • Anil Parab
  • kirit somaiya
  • Poltical News

संबंधित बातम्या

Kirit Somaiya: भाजप नेते किरीट सोमय्यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट
1

Kirit Somaiya: भाजप नेते किरीट सोमय्यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

‘हिंमत असेल तर राजीनामा घेऊन दाखव’; डान्सबारवरून रामदास कदमांचं अनिल परबांना खुलं आव्हान
2

‘हिंमत असेल तर राजीनामा घेऊन दाखव’; डान्सबारवरून रामदास कदमांचं अनिल परबांना खुलं आव्हान

Pankaja Munde: अनिल परबांच्या लक्षवेधीनंतर पंकजा मुंडे ॲक्शन मोडमध्ये; कांदळवनाच्या कत्तलीची दखल घेत दिले ‘हे’ महत्वाचे आदेश
3

Pankaja Munde: अनिल परबांच्या लक्षवेधीनंतर पंकजा मुंडे ॲक्शन मोडमध्ये; कांदळवनाच्या कत्तलीची दखल घेत दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

खोटी कागदपत्र दाखवून माझ्या आईची बदनामी; डान्सबारवरील आरोपांवर गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं स्पष्टीकरण
4

खोटी कागदपत्र दाखवून माझ्या आईची बदनामी; डान्सबारवरील आरोपांवर गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं स्पष्टीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.