Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘…तर त्यांना टायरात घालून मारा’; खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच दिला दम

मी जे करतो ते बारामतीकरांसाठी, सर्वांसाठी करतो. मी अनेक ठिकाणी झाडं लावली आहेत. तिथे कोणी पण येत आहे. जनावरे खात आहेत. पण, तसे चालणार नाही. जिथे माणसांना बसायला केले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 13, 2025 | 08:09 AM
Maratha Reservation:

Maratha Reservation:

Follow Us
Close
Follow Us:

बारामती : कधी-कधी मोटरसायकलवाले इकडे-तिकडे बघतात. हळूच ओव्हरटेक-राँग साईडने जाण्याचा प्रयत्न करतात. पण, आता असा माणूस सापडला तर तो मुलगा किंवा व्यक्ती कितीही मोठ्या बापाची असली तरी त्याला टायरमध्ये घेऊन असा झोडायला सांगणार आहे की त्याला दहा पिढ्या आठवल्या पाहिजे. अजिबात नियम कोणीही तोडू नका, मग तो अजित पवार असो किंवा अजित पवारचा कोणी नातेवाईक असेल. सर्वांना नियम सारखा आहे, असा दमच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीकरांना भरला.

उपमुख्यमंत्री पवार यांनी बेशिस्त वाहन चालवणाऱ्यांना चांगलेच फटकारले. ‘मी जे करतो ते बारामतीकरांसाठी, सर्वांसाठी करतो. मी अनेक ठिकाणी झाडं लावली आहेत. तिथे कोणी पण येत आहे. जनावरे खात आहेत. पण, तसे चालणार नाही. जिथे माणसांना बसायला केले आहे तिथे एकजण मोटरसायकल घालून निवांत मांडी घालून लोकांसोबत गप्पा मारतोय. कधी-कधी मोटरसायकलवाले इकडे-तिकडे बघतात. हळूच ओव्हरटेक-राँग साईडने जाण्याचा प्रयत्न करतात. पण, आता असा माणूस सापडला तर तो मुलगा किंवा व्यक्ती कितीही मोठ्या बापाची असली तरी त्याला टायरमध्ये घेऊन असा झोडायला सांगणार आहे की त्याला दहा पिढ्या आठवल्या पाहिजे.

हेदेखील वाचा : “…तर हे राज ठाकरेंना झेपणार नाही; हिंदी आणि मराठीच्या वादामध्ये बृजभूषण शरण सिंह यांची उडी

यातील काही लोकं तर रस्त्यावर कचरा टाकत आहेत. जनावरे चरायला सोडत आहेत. पण, आता मी त्यांना कृपा करून सांगतो आता ती जनावरं कोंडवड्यात घातली तर ठीक, नाही ऐकले तर त्यांना बाजार दाखवतो. आता जे मालक लोक आहेत, त्यांना निर्वाणीचा इशारा देतो. ऐकले तर ठीक, नाही ऐकले तर मालकांवर केसेस होतील, असे अजित पवार यांनी म्हटले.

तसेच, ज्यांची गाढव आहेत, जनावरं आहेत, ज्यांच्या गाई इकडे-तिकडे फिरत असतात. तुम्ही तुमच्या दारात बांधायचे ते बांधा, काय खायला-प्यायला घालायचे ते घाला. बारामती जी चांगली करतो ती काय सगळ्यांना मोकळी फिरण्याकरता नाही, असेही अजित पवारांनी म्हटले.

हेदेखील वाचा : Shrikant Shinde ED Notice : खासदार श्रीकांत शिंदेंना ईडीची नोटीस? मुलासाठी वडीलांनी अधिवेशन सोडत गाठली दिल्ली?

Web Title: Dcm ajit pawar aggressive on unruly driver gives warning of action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2025 | 08:03 AM

Topics:  

  • ajit pawar
  • baramati news

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
1

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश
2

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका
3

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Ajit Pawar : मला माझे मन सांगायचे की…; अजित पवारांकडून पुन्हा एकदा शरद पवारांचं कौतुक
4

Ajit Pawar : मला माझे मन सांगायचे की…; अजित पवारांकडून पुन्हा एकदा शरद पवारांचं कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.