Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उपमुख्यमंत्री अजित पवार पालखी सोहळ्यात सहभागी; बारामती ते काटेवडी वारकऱ्यांसोबत पायी वारी

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बारामतीमध्ये दाखल झाला आहे. अजित पवार यांनी सपत्नीक पालखीचे दर्शन घेतले. तसेच अजित पवार बारामती ते काटेवाडी अशी पायी वारी देखील करणार आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 07, 2024 | 12:38 PM
उपमुख्यमंत्री अजित पवार तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये सामील

उपमुख्यमंत्री अजित पवार तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये सामील

Follow Us
Follow Us:

बारामती: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सपत्नीक बारामती येथे पालखी सोहळ्याला भेट दिली.  यावेळी  जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यांनी बारामती ते काटेवडी वारकऱ्यांसोबत पायी चालत वारीत सहभाग घेतला. त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यादेखील सहभागी झाल्या.
डोक्यावर टोपी व हातात टाळ घेऊन वारकऱ्यांसमवेत उपमुख्यमंत्री पवार यांनी पायी वारीचा आनंद घेतला.
मुंबईहून विमानाने रविवारी (दि ७)सकाळी आठ वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती विमानतळावर दाखल झाले. यावेळी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केल्याबद्दल उपस्थित महिलांनी त्यांचे औक्षण केले, तसेच त्यांना पुष्पहार घालून त्यांचे आभार मानले. यानंतर मोटारीने ते संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात दाखल झाले.

दरम्यान जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ च्या जयघोषात, टाळ मृदंगाच्या गजरात, हाती दिंड्या-पताका, मुखी विठ्ठल नाम अशा भक्तिमय वातावरणात आज सकाळी काटेवाडीकडे प्रस्थान झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः या पालखी सोहळ्यात पायी चालत सहभागी झाल्याने वैष्णवांचा उत्साह दुणावला. यावेळी विविध पदाधिकारी व कार्यकर्ते देखील या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी खासदार सुनेत्रा पवार, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, उपमुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील, महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उप विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल आदी उपस्थित होते.

श्री. पवार यांनी पुष्पहार अर्पण करून संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यांनी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसोबत संवाद साधला आणि टाळाच्या साथीने विठूनामाचा गजर केला. पालखी मार्गावरील असलेल्या गावातील चौकात रांगोळी काढून, फुलांची उधळण करत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा आज इंदापूर तालुक्यातील सणसर येथे मुक्काम असणार आहे.

Web Title: Dcm ajit pawar participated in the sant tukaram maharaj palkhi sohala and walk in baramati to katewadi nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2024 | 12:37 PM

Topics:  

  • DCM Ajit Pawar
  • Palkhi Sohala 2024
  • Sant Tukaram Maharaj

संबंधित बातम्या

Ashadhi Wari Sohla 2026: पिंपरी-चिंचवड आयुक्तांकडून पालखी मार्गाची पाहणी; मेट्रोचे अडथळे दूर करण्याचे निर्देश
1

Ashadhi Wari Sohla 2026: पिंपरी-चिंचवड आयुक्तांकडून पालखी मार्गाची पाहणी; मेट्रोचे अडथळे दूर करण्याचे निर्देश

Sant Tukaram: ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी’ अभंगातील प्रत्येक ओळीचा काय आहे अर्थ, जाणून घ्या महाराजांच्या रचनेचा भावार्थ
2

Sant Tukaram: ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी’ अभंगातील प्रत्येक ओळीचा काय आहे अर्थ, जाणून घ्या महाराजांच्या रचनेचा भावार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.