यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले , राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, माळेगावचे अध्यक्ष अड. केशवराव जगताप, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, छत्रपतीचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, बाळासाहेब तावरे, विश्वास देवकाते आदींसह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
यशाने होरळून जायचं नसतं आणि अपयशाने खचून जायचं नसतं शेवटी आपण लोकांची कामे करणारे सहकारी आहोत. आपण सगळेजण एकत्र काम करत आहे ,हा कारखाना सुद्धा एकत्रच आलो आहोत, तर काहीतरी वाटाघाटी करावी असे मुख्यमंत्र्यांसमोर झाले .पण त्यांनी सांगताना असे सांगितले की, दहा आमचे दहा तुमचे आणि एक मी माझा उमेदवारी अर्ज असल्याने एक मी पहिले अडीच वर्षे तुमचे चेअरमन नंतर अडीच वर्षे तुम्ही सांगाल तो सहकार पॅनल चा चेअरमन असं त्यांनी सुचविले.
मोठी बातमी! माळेगाव कारखाना निवडणुकीचा सस्पेन्स संपला; चुरशीच्या लढतीनंतर दादाच ठरले ‘बॉस’
माळेगाव कारखान्याची जी काही परंपरा आहे, ती परंपरा टिकावी. शेंबेकर, मुळीक, कोकरे, जगताप, तावरे, पोदकुले या सर्व मान्यवरांना वाटले पाहिजेल की, आपण जी काही लावलेलं रोपट ते मिळून मिसळून करत आहोत. अशी भावना सभासदांमध्ये पण गेली पाहिजे. पण अडीच वर्षे तुमचे, अडीच वर्षे आमचे असे करून सुद्धा ते माणसं ऐकत नव्हती .त्यामुळे त्यात सुद्धा आम्हाला अपयश मिळाले. काही सहकार पॅनल मधील लोकांना वाटत होते. की एकत्र येऊन लढायला पाहिजे आणि त्यातही त्यांच्या प्रयत्नांना अपयश आले. सभासदांनी या निवडणुकीत दाखवलेल्या विश्वासाला पात्र राहून आपण दिलेला शब्दाची पूर्तता करून दाखवू, असा विश्वास अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.