प्रचाराच्या शुभारंभ वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून मी स्वतः इच्छुक असल्याचे जाहीर केले. त्यानुसार, त्यांनी कारखान्याची एखादी सत्ता सभासदांनी द्यावी, असे आवाहन केले होते.
माळेगाव कारखान्याचा अध्यक्ष मी स्वतः होणार असल्याचे अजित पवार यांनी भाषणात सांगितले होते. त्यानुसार, त्यांनी आभार मेळाव्यात देखील आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करत आपण कारखान्याचे अध्यक्ष होणार असल्याचे स्पष्ट केले होते.
नीलकंठेश्वर पॅनलला माझ्यासह उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून दिले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करण्याकरता व आभार व्यक्त करण्याकरता आज आलो आहे, असे पवार म्हणाले.
सलग दोन दिवस चाललेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीमध्ये सर्वच ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळाली, काही गटात पॅनल टू पॅनल, तर अनेक ठिकाणी क्रॉस वोटिंग झाल्याचे समोर आले.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 'ब' प्रवर्गातून ९१ मते मिळवून दणदणीत विजय झाला. त्यांच्या श्री निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार पहिल्या फेरीत आघाडीवर आहेत.